भारतीय दंड संहिता कायदा Indian Penal Code Bare Act in Marathi

indian penal code bare act in marathi – indian penal code in marathi भारतीय दंड संहिता कायदा, आज आपण या लेखामध्ये भारतीय दंड संहिता कायदा या विषयी म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कसा काम करतो या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारतीय दंड संहिता कायदा हा कायदा १८६० मध्ये मंजूर झाला आणि १८६२ मध्ये संपूर्ण भारतामध्ये हा लागू झाला आणि हा कायदा विशेषता ब्रिटीश राजवटी मध्ये म्हणजेच ज्यावेळी भारतात ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी लागू करण्यात आला होता. भारतीय दंड सहिता हि भारतीय प्रजासत्ताकची अधिकृत फौजदारी संहिता आहे.

जुअवेली भारतामध्ये ब्रिटीशांचे आगमन व्हायचे होते त्यापूर्वी दंड कायदा हा मुहम्मद कायदा म्हणून ओळखला जात होता. आपल्या प्रशासनाच्या सुरुवातीच्या काही वर्षानंतर ईस्ट इंडिया कंपनीने देशाच्या फौजदारी कायद्यामध्ये मध्ये हस्तक्षेप केला नाही. पण १७७२ च्या काळामध्ये वॉरण हेस्टिंग्ज कारकिर्दीत कंपनीने या कायद्यामध्ये लक्ष घातले आणि मग ब्रिटीश सरकारने १८६० ते १८६१ च्या कालावधी मध्ये मुहम्मद कायद्यामध्ये अनेक बदल घडवले आणि तो भारतीय दंड संहिता कायदा बनला.

भारतीय दंड संहिता कायदा याला फौजदारी संहिता कायदा किंवा फौजदारी कायदा म्हणून देखील ओळखले जाते आणि हा कायदा १८६० मध्ये मंजूर झाल्यामुळे या कायद्याला भारतीय दंड संहिता कायदा १८६० म्हणून देखील ओळखले जाते. हा कायदा एक सर्वसमावेशक संहिता आहे ज्याचा मुख्य उद्देश हा फौजदारी कायद्याच्या सर्व मुलभूत गोष्टींचा समावेश आहे. चला तर आता आपण भारतीय दंड संहिता कायदा या विषयी आणखीन माहिती खाली जाणून घेवूया.

indian penal code bare act in marathi
indian penal code bare act in marathi

भारतीय दंड संहिता कायदा – Indian Penal Code Bare Act in Marathi

कायद्याचे नावभारतीय दंड संहिता कायदा (Indian penal code bare act )
केंव्हा मंजूर झालाहा कायदा १८६० मंजूर झाला
केंव्हा लागू झालाहा कायदा १८६२ मध्ये लागू झाला
कोणी लागू केलाब्रिटिशांनी (ईस्ट इंडिया कंपनीने)

भारतीय दंड कायदा म्हणजे काय ? –  ipc 1860 in marathi

भारतीय दंड सहिता कायदा हा १८६० मध्ये मंजूर झाला आणि हा कायदा १८६२ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू केला. हा कायदा एक सर्वसमावेशक संहिता आहे ज्याचा मुख्य उद्देश हा फौजदारी कायद्याच्या सर्व मुलभूत गोष्टींचा समावेश आहे.

भारतीय दंड सहिता कायद्याचा इतिहास – history of ipc in marathi

भारतीय दंड संहिता कायदा हा ब्रिटीश राजवटीमध्ये लागू झाला आहे आणि या कायद्याला भारतीय फौजदारी संहिता कायदा म्हणून देखील ओळखले जाते. १७७२ मध्ये हा कायदा मुहम्मद कायदा म्हणून ओळखला जात होता आणि काही काळासाठी ब्रिटिशांनी म्हणजेच ( ईस्ट इंडिया कंपनी ) या मध्ये लक्ष घातले नव्हते.

पण ज्या वेळी वॉरण हेस्टिंग्ज हे राजकीय कारकिर्दीत होते त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने या कायद्यामध्ये लक्ष घातले आणि हा कायदा १८६० मध्ये मंजूर केला आणि १८६२ मध्ये अंमलात आणला. मुहम्मद कायदा हे नाव बदलून त्यांनी या कायद्याला भारतीय संहिता कायदा असे नाव दिली. भारतीय दंड संहिता कायद्यामध्ये २०१८ मध्ये देखील काही दुरुस्ती करण्यात आली होती.

भारतीय दंड सहिता कायद्याची रचना – structure of Indian penal code bare act 

आता आपण कलमांच्या नुसार भारतीय दंड कायद्याची राचा कशी आहे आणि प्रत्येक कलमामध्ये काय काय तरतुदी दिल्या आहेत ते पाहणार आहोत.

  • या कायद्याच्या कलम १ ते ५ यामध्ये या कायद्याबद्दल परिचय आणि या कायद्याविषयी काही माहिती दिली आहे.
  • सामान्य सपष्टीकरण हे या कायद्याच्या कलम ६ ते ५२ व्या कलमापर्यंत दिले आहे.
  • भारतीय दंड संहिता कायद्यामध्ये कलम ५३ ते ७५ मध्ये जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्याला कोणकोणत्या शिक्षा केल्या पाहिजेत या विषयी शिक्षांची माहिती दिली आहे.
  • कलम ७६ ते १०६ मध्ये खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचे सामान्य अपवाद आहेत.
  • कलम १०७ ते १२० मध्ये प्रलोभन आणि कलम १२० च्या ए आणि १२० च्या बी मध्ये गुन्हेगारी कट या गुन्ह्यांचा समावेश आहे.
  • कलम १२१ ते १३० मध्ये राज्याविरुध्दच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
  • तसेच या कायद्यामधील कलम १३१ ते १४० या कलमामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी संबधित या कायद्यानुसार काय गुन्हे मानले जातात ते दिले आहे.
  • कलम १४१ ते कलम १६० मध्ये सार्वजनिक शांतात या विषयाचे गुन्हे समाविष्ट आहेत.
  • भारतीय दंड संहिता कायद्यामध्ये कलम १६१ ते १७१ मध्ये सार्वजनिक सेवकाद्वारे किंवा त्यांच्याशी संबधित गुन्हे दिलेले आहेत आणि कलम १७१ ए आणि कलम १७१ आय मध्ये निवडणुकीशी संबधित गुन्हे दिलेले आहेत.
  • कलम १७२ ते कलम १९० मध्ये सार्वजनिक सेवकांचा अधिकार काय आहे ते स्पष्ट केले आहे.
  • या कायद्यातील कलम १९१ ते २२९ नुसार खोटे पुरावे आणि सार्वजनिक न्यायविरुध्द गुन्हे दिलेले आहेत.
  • २३० ते २६३ या कलमांच्यामध्ये नाणे आणि सरकारी शिक्यांच्या संबधित गुन्हे हे दिलेले आहेत.
  • २६४ ते २६७ या काळामध्ये वजन आणि मापाशी संबधित गुन्हे आहेत आणि २६८ ते २९४ मध्ये सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, सुविधा आणि नैतिकता या गोष्टींच्यावर परिणाम करणारे गुन्हे दिलेले आहेत. तसेच कलम २९५ ते २९८ मध्ये धरमशी संबधित गुन्हे दिलेले आहेत.
  • कलम २९९ ते ३७७ मध्ये मनुष्याच्या शरीरावर परिणाम करणारे सर्व गुन्हे दिलेले आहेत.
  • कलम ३७८ ते कलम ४८९ मध्ये मालमत्ते विरुध्द गुन्हे तर कलम ४९० ते ४९२ मध्ये सेवाच्या कराराच्या गुन्हे समविष्ट आहेत. तसेच कलम ४९३ ते ४९८ यामध्ये विवाहाशी संबधित सर्व गुन्हे दिलेले आहेत आणि कलम ४९८ ए मध्ये पत्नी किंवा पतीच्या नातेवाईकांच्या कडून होणाऱ्या क्रूरतेविषयक गुन्हे दिलेले आहेत.
  • या कायद्यामधील ४९९ ते ५०२ या कलमामध्ये बदनामीचे गुन्हे समाविष्ट आहेत तर कलम ५०३ ते ५१० मध्ये अपमान, चीड किंवा धमकी देणे या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे तसेच कलम ५११ मध्ये गुन्हा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यासाठी काही गोष्टी समाविष्ट आहेत.

आम्ही दिलेल्या indian penal code bare act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय दंड संहिता कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian penal code in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ipc in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!