सोन्याची माहिती Information about Gold in Marathi

information about gold in marathi सोन्याची माहिती, अनेक वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत आणि त्यामधील सोने (gold) हा एक महत्वाचा धातू आहे आणि आज आपण या लेखामध्ये सोने या मौल्यवान धातू विषयी माहिती पाहणार आहोत. सोने हा जगातील मौल्यवान धातुपैकी एक आहे आणि हे एक चमकदार, मऊ आणि लवचिक असा धातू आहे जो किंचित लालसर पिवळ्या रंगाचा असतो आणि या मऊ धातूचा मोठा साठा हा खणून काढला जातो. चला तर खाली आपण सोने या धातुविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.

information about gold in marathi
information about gold in marathi

सोन्याची माहिती – Information about Gold in Marathi

सोने या धातूचा शोध आणि इतिहास – history

सोने हा असा धातू आहे ज्याचा वापर हा खूप पूर्वीपासून केला जातो म्हणजेच हा धातू खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा धातू आहे. सोने या धातूचा वापर हा पाच हजार वर्षापासून केला होता आणि हा धातू पूर्वीपासूनच एक मौल्यवान धातू आहे.

सोने या धातूचे गुणधर्म – features

  • सोने या धातूला अनेक अधिक लवचिक बनवण्यासाठी त्यामध्ये आणखीन एक मऊ धातू मिश्रित केला जातो ज्यामुळे सोन्याला लवचिकता चांगली येते.
  • सोने हा धातू वीज आणि उष्णता यांचा चांगला वाहक आहे त्यामुळे या धातूवर हवेचा परिणाम होत नाही.
  • सोने हा धातू गंज प्रतिरोधक आहे म्हणजेच काही इतर धातूंच्यासारखे यावर गंज पडत नाही.
  • सोने हा धातू प्रकाश देखील चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करू शकतो.  

सोने या धातूचा वापर – use

आपल्या सर्वांना माहीतच आहे कि सोने या धातूचा वापर हा मोठ्या प्रमाणात दागिने बनवण्यासाठी केला जातो परंतु या धातूचा वापर हा काही इतर कारणांच्यासाठी देखील केला जातो आणि खाली आपण सोन्याचे वेगवेगळे वापर पाहणार आहोत.

  • सोने हा धातू तसा सर्वांच्या परिचयाचा आहे कारण ह्या धातूपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवले जातात जसे कि गळ्यातील हार, बांगड्या, कानातले, कमरपट्टा, बाजूबंद, अंगठी असे अनेक वेगवेगळे दागिने बनवले जातात.
  • सोन्याच्या धातूपासून धागा किंवा रेशीम बनवले जाते आणि तो धागा भरतकामासाठी वापरला जातो किंवा  रेशीम कामासाठी देखील वापरले जाते.
  • सोने या धातू उष्णता आणि विजेचा चांगला वाहक आहे आणि म्हणून या धातूचा वापर हा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्यामध्ये विविध भाग तयार करण्यासाठी वापरला जातो.
  • सोने या धातूचा वापर काही औषधे बनवण्यासाठी देखील वापरला जातो.
  • सोने हे तपमानांचे नियमन करण्यासाठी उपग्रहांच्यावर आणि संरक्षण देण्यासाठी स्पेस सुटच्या व्हीझरवर काम करतात आणि काही मोठ्या इमारतींच्यावर तपमानांचे नियमन करण्यासाठी खिडक्यांच्यावर याचा पातळ थर असतो.
  • सोन्याचा वापर पुरातन काळामध्ये नाणी तयार करण्यासाठी देखील केला जात होता आणि हि नाणी चलन म्हणून वापरली जात होती.
  • सोन्याचा वापर हा इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल वायरिंग, औषध, दंतचीकीस्ता, कलरिंग ग्लासमध्येअ नि रेडीएशन शिल्डींगसाठी केली जाऊ शकते.

सोने या धातूविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • सोने हा धातू सगळयांच्या परिचयाचा धातू आहे आणि हा खूप पूर्वीपासून वापरला जातो.
  • मधल्या काळामध्ये श्रींमंत लोकांच्या जेवणावर अधूनमधून सोन्याचे तुकडे शिंपडले जात होते.
  • जगभरामध्ये अनेक खडकांच्यामध्ये सोने असते आणि काही वेळा ते खूप कमी असते आणि खडकांच्यामधून सोने काढणे हे खूप अवघड असते.
  • सोन्याचा शोध हा वारंवार खडकांच्यामध्ये आढळतो आणि त्यामध्ये शिसे आणि तांबे देखील आढळू शकते.
  • दक्षिण आफ्रिका हे पूर्वी जगासाठी सोने हा धातू पुरवणारे मुख्य स्त्रोत होता म्हणजेच या देशामध्ये खडकामध्ये सोने खूप सापडत होते आणि ता ऑस्ट्रेलिया आणि चीन हे दोन देखील सर्वाधिक सोने उत्पादन करणारे देश म्हणून ओळखले जातात.
  • सोने हा जगातील मौल्यवान धातुपैकी एक आहे आणि हा खूप लवचिक असल्यामुळे त्याला कसाही आकार देता येतो.
  • पृथ्वीवरील सर्व सोने हे उल्कापिंडातून आले आणि ज्याने ग्रह तयार झाल्यानंतर २०० दशलक्ष वर्षाहून अधिक वर्षांनी ग्रहावर भडीमार केला.
  • जरी सोने हा धातू जड, दाट असा धातू जरू असला तरी ते सामान्यता विषारी मानले जात नाही म्हणून या धातूचा आहारामध्ये, काही खाद्यपदार्थ्यांच्यामध्ये, पेयांच्यामध्ये आणि काही औषधांच्या मध्ये निसंकोचपणे वापरला जातो.
  • उच्च शुध्दतेचे सोने हे चवहीन आणि गंधहीन असते.
  • शुध्द सोने हे इतके मऊ असते कि त्या सोन्याला आपण हाताने आकार देऊ शकतो.
  • शुध्द मौलिक सोने हे २४ कॅरेटचे असते आणि १८ कॅरेटचे सोने हे ७५ टक्के शुध्द सोने असते तसेच १४ कॅरेटचे सोने हे ५८ टक्के शुध्द सोने असते आणि १० कॅरेटचे सोने हे ४० ते ४२ टक्के शुध्द असते.
  • सोन्यापासून अनेक दागिने बनवले जातात परंतु सोन्याचा धातू हा दागिने बनवण्यासाठी अधिक मऊ असणे आवश्यक असतो आणि सोने या धातूला अधिक मऊ बनवण्यासाठी त्यामध्ये अनेक धातू मिश्रित केला जातात आणि यामध्ये प्लॅटीनम, नेकेल, तांबे, लोह, कॅडमियम, पॅलेडीयम या सारखे धातू मिसळेले असतात.
  • भूकंपामुळे सोने तयार होऊ शकते असते शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
  • सध्या चीन हा देश जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश मानला जातो.

आम्ही दिलेल्या hallmark gold information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सोन्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gold meaning in marathi या information about gold weight in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gold in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!