information about starfish in marathi तारामासा माहिती, जगामध्ये पाण्यामध्ये आणि मोठ्या महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वेगवेगळ्या जातीचे माश्यांचे प्रकार पहायला मिळतात आणि त्यामधील काही इतके सुंदर असतात कि त्यांना पाहताच राहावे आणि काही खूप भयानक देखील असतात. खाली आपण आज या लेखामध्ये स्टारफिश (starfish) ज्याला मराठी मध्ये तारामासा म्हणून ओळखले जाते. तारामासा हा समुद्रा मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा माश्याचा प्रकार आहे.
जो ताऱ्या सारख्या आकाराचा असतो आणि ह्या माश्याच्या जगभरामध्ये २ हजार पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या माश्याला वेगवेगळ्या भुजा असतात आणि ह्या भुजांची संख्या हि त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते आणि त्याच्या प्रत्येक भूजला दोन छोटे डोळे असतात आणि या माश्यांच्या रंगामध्ये जरी विविधता असली तरी या माश्यांचा सामान्य प्रकार हा तपकिरी किंवा पिवळ्या रंगाचा असतो.
आणि त्यांना गिल, खवले आणि पंख नसतात. स्टारफिश या माश्यांचे अस्तित्व हे १७५ दशलक्ष वर्षापासून आहे आणि हे ज्युरासिकाच्या उत्तरार्धात होते आणि ते आज विपुल प्रमाणात महासागरामध्ये आढळतात. चला तर आपण आता खाली स्टारफिश म्हणजेच तारामासा या माश्याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.
तारामासा माहिती – Information About Starfish in Marathi
स्टारफिश कोठे आढळतात – habitat
स्टारफिशच्या वेगवेगळ्या अश्या २००० प्रजाती आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच समुद्राच्या तळावर आणि उष्ण कटिबंधीय वातावरणापासून ते बर्फाळ ध्रुवीय पाण्यापर्यंत जगातील सर्व मोठ्या आणि विशाल महासागरामध्ये स्टारफिश आढळतात.
स्टारफिशचे प्रकार – types
स्टारफिशचे एकूण २ हजार पेक्षा अधिक प्रजाती आहेत आणि त्यामधील काही लोकप्रिय आणि सामान्य प्रकार खाली आपण पाहणार आहोत.
सुर्यफुल स्टारफिश
सुर्यफुल स्टारफिश हे महासागरातील सर्वात लोकप्रिय आणि सामान्य स्टारफिश प्रजाती आहे आणि त्यांचे १६ ते २४ इतके हातपाय असतात आणि १६ ते २४ हातपाय असल्यामुळे हा प्रकार शिकारीसाठी प्रभावी असतो. सुर्यफुल स्टारफिश हा त्यांच्या प्रभावी आर्म स्पॅनसाठी व्यापकपणे ओळखला जातो.
रॉयल स्टारफिश
रॉयल स्टारफिश या माश्याचे नाव हे त्याच्या भव्य सोनेरी आणि जांभळ्या रंगावरून पडले आहे आणि या प्रकारचे स्टारफिश हे ७०० फुटापर्यंत डुबकी मारू शकतात आणि ते ७० ते १०० फुट खोलवर लटकू देखील शकतात. रॉयल स्टारफिश उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतो.
काट्यांचा मुकुट असणारा स्टारफिश
काट्यांचा मुकुट असणारा स्टारफिश याला द क्राउन ऑफ थोर्न्स असे म्हणतात आणि हा स्टारफिश जगातील मोठ्या स्टारफिशपैकी एक आहे आणि हा फिश इतर प्राणी आणि मानवांच्यासाठी विषारी मानले जातात.
पॅसिफिक ब्लड स्टारफिश
पॅसिफिक ब्लड स्टारफिशला त्याच्या लाल आणि केशरी रंगाचे नाव दिले आहे आणि हा उत्तर अमेरिकेच्या पॅसिफिक किनारपट्टी वर मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हे समुद्रामध्ये १००० फुट खोलीवर आढळतात.
स्टारफिश विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- स्टारफिशची जीवाश्म नोंद हि सुमारे ४५० दशलक्ष वर्षापासून ऑर्डव्हिजन काळातील आहे परंतु ते विरळ आहे कारण स्टारफिश हे मृत्यूनंतर विघटीत होतात.
- स्टारफिश हे त्यांच्या आकारासाठी तर लोकप्रिय आहेतच परंतु हे त्यांच्या शरीररचनेसाठी देखील ओळखले जातात म्हणजेच त्यांच्यामध्ये रक्त आणि मेंदू नसतो.
- या माश्यांच्या प्रकाराला हाडे आणि पाठीचा कणा नसतो.
- या माश्यांच्या संरक्षणासाठी हे हात वारंवार मनक्याने झाकलेले असतात काही समुद्रातील ताऱ्यांच्यावर मोठे मणके आढळतात जसे कि काटेरी ताऱ्यांचा मुकुट.
- स्टारफिश हे गोड्या पाण्यामध्ये राहत नाहीत तर ते आकर्षक मासे सागरी खोलीला प्राधान्य देतात आणि ते शेवाळ, वालुकामय भागात आणि खड्कामधील चिखल भागामध्ये चिकटून राहतात.
- समुद्र पाण्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर स्टारफिशला त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन पुरवणे खूप कठीण होते.
- स्टारफिश या माश्याला सागरी मासा म्हणून देखील ओळखले जाते.
- स्टारफिश हे प्रामुख्याने शिकारी असतात आणि ते क्लॅम, ऑयस्टर आणि इतर लहान समुद्री प्राणी खातात.
- तारामासा किंवा स्टारफिश हे त्यांनी गमावलेले त्यांचे अवयव हे पुन्हा वाढवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांचे गमावलेले अवयव परत येतात.
- जज्यावेळी स्टारफिश हे शिकार पकडतात त्यावेळी ते त्यांच्याकडे अन्न पकडण्यासाठी लहान सक्शन कप असतात आणि शिकार घेण्यासाठी त्यांचे पोट बाहेर येते आणि एकदा शिकार घेतल्यानंतर ते परत पोट आतमध्ये घेतात.
- स्टारफिश मधील नर आणि मादी यांच्यामधील फरक ओळखणे खूप कठीण आहे कारण नर आणि मादी हे दोघेही दिसायला एकसारखे असतात.
- स्टारफिश माश्यांना हात असतात आणि हातांची संख्या हि त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते म्हणजेच काही प्रजातीमध्ये १४ ते २५ हात असतात तर काही प्रजातीमध्ये ४० हात असतात.
- स्टारफिश हा मासा ३० ते ३५ वर्षापर्यंत जगू शकतो परंतु हे मासे गोड्या पाण्यामध्ये जगू शकत नाहीत हे खाऱ्या पाण्यामध्ये जगतात म्हणून ह्या माश्याच्या वेगवेगळ्या प्रजाती ह्या मोठ्या प्रमाणात महासागरामध्ये आढळतात.
- सर्वच स्टारफिश किंवा तारामासा हा ताऱ्यांचासारखा दिसत नाही तर तो ताऱ्यांच्या पेक्षा वेगळा दिसणारा देखील असतो.
- स्टारफिश या माश्याविषयी एक मनोरंजक तथ्य म्हणजे या माश्याचे पोट हे त्याच्या शरीराबाहेर असते.
- स्टारफिशला सी फिश (sea fish) म्हणून देखील ओळखले जाते.
आम्ही दिलेल्या information about starfish in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तारामासा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या starfish meaning in marathi या starfish information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि Information about starfish in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Information about starfish in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट