इंटरव्ह्यू टिप्स मराठी Interview Tips in Marathi

interview tips in marathi – interview meaning in marathi मुलाखत देताना वापरल्या जाणाऱ्या टिप्स, आज आपण या लेखामध्ये मुलाखत कशी द्यायची आणि ते चांगल्या प्रकारे देण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरू शकतो ते पाहूया. आपल्याला कोणत्याही प्रकारची नोकरी मिळवण्यासाठी सर्वप्रथम मुलाखतीला सामोरे जावे लागते आणि एक मुलाखत चांगल्या प्रकारे उतीर्ण होण्यासाठी आपल्याला त्या संबधित कामाविषयी सर्व काही माहिती असणे खूप गरजेचे असते. जर तुमची मुलाखत हि नोकरीसाठी असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाखतीमध्ये न घाबरता तसेच आत्मविश्वासाने मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे खूप गरजेचे असते कारण आपण कश्या प्रकारे सर्व प्रश्नाची उत्तरे देतो यावर आपली निवड हि अवलंबून असते.

जर तुम्हाला मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारलेल्या एकाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तुम्ही त्या बद्दल माफी मागा आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जा. कोणत्याही मुलाखतीला जाताना आपल्याला आपली भाषा बदलावी लागते किंवा मग आपण मुलाखतीमध्ये बोलताना खूप विचार करून बोलावे लागते तसेच आपली ड्रेसअप स्टाईल देखील फॉर्मल असावी लागते अश्या अनेक गोष्टी आपल्याला मुलाखतीला ( interview ) जाताना पाळाव्या लागतात.

परंतु अनेक लोकांना माहित नसते कि मुलाखतीला कसे जायचे किंवा मुलाखतीमध्ये कसे बोलायचे आणि प्रश्नाची उत्तरे चांगल्या प्रकारे कशी द्यायची या बद्दल अनेक जणांना माहित नसते. म्हणून आज आपण या लेखामध्ये खाली मुलाखती विषयी काही टिप्स पाहणार आहोत.

interview tips in marathi
interview tips in marathi

इंटरव्ह्यू टिप्स मराठी – Interview Tips in Marathi

इंटरव्ह्युव म्हणजे काय – interview meaning in marathi

इंटरव्ह्युव  म्हणजे मराठी मध्ये मुलाखत आणि हि मुलाखत एकाद्या व्यक्तीला नोकरी देण्यासाठी घेतली जाते आणि या मुलाखतीमध्ये त्याची पात्रता, गुणवत्ता आणि क्षमता तपासली जाते. जेणेकरून तो त्या संबधित कंपनी मध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकेल.

मुलाखत कशी द्यायची यावर टिप्स – interview questions in marathi

जर आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर मुलाखत हि एक महत्वाची प्रक्रिया असते. कारण जर आपण मुलाखत चांगल्या प्रकारे उतीर्ण होऊ शकलो तर आपल्या नोकरी मिळू शकते त्यामुळे मुलाखत हि चांगल्या प्रकारे देणे खूप गरजेचे असते. पण अनेकांना माहित नसते कि मुलाखत देताना कोणते नियम वापरायचे, कसे बोलायचे, कसा ड्रेसअप करायचा, कशी प्रश्नाची उत्तरे द्यायची अश्या सर्व लोकांच्यासाठी खाली आपण मुलाखत देण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरू शकतो ते पाहणार आहोत.

  • तुम्हाला जर वाटत असेल कि तुमची मुलाखत चांगली व्हावी असावी तर तुम्हाला आधी मुलाखतीचा सराव करणे खूप गरजेचे असते.
  • तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाणार आहात त्या कंपनी विषयीची सर्व माहिती जाणून घ्या तसेच ज्या पोस्ट साठी तुम्ही अर्ज केला आहे अश्या त्या पोस्ट विषयी देखील चांगली माहिती असणे देखील आवश्यक असते त्यामुळे आपली मुलाखत चांगली होण्यास मदत होते.
  • तुम्हाला अनेक सामान्य ज्ञान माहित असणे खूप गरजेचे असते आणि तसेच तुम्हाला अनेक चालू घडामोडींच्या विषयी माहित असणे देखील अवश्यकत असते कारण मुलाखती मध्ये अनेक चालू घडामोडींच्यावर देखील काही प्रश्न विचारले जावू शकतात.
  • तुम्ही कोणत्याही मुलाखतीला जात असाल तर तुम्ही फॉर्मल ड्रेसअप मध्ये जा या मुळे तुम्हाला ड्रेसअप साठी देखील गुण मिळण्यास मदत होईल.
  • मुलाखतीमध्ये तुमची बौध्दिक दक्षता, तुमच्या आवडी निवडी, तुमची सामाजिक क्षमता, बौध्दिक बांधिलकी, परीक्षणातील समतोल, तुमचा गोष्टींच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सारख्या गोष्टीच्या कडे खूप बारकाईने पहिले जाते त्यामुळे या सर्व गोष्टींच्याकडे देखील तुमचे लक्ष असणे खूप गरजेचे असते.
  • मुलाखतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि ज्यावेळी आपण प्रश्नाचे उत्तर देत असतो त्यावेळी आपण प्रश्नाचे उत्तर हे कमी शब्दामध्ये योग्य उत्तर दिले पाहिजे तसेच ते योग्य पध्दतीने देणे देखील खूप महत्वाचे असते.
  • जर तुम्हाला मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तुम्ही त्या बद्दल माफी मागा आणि मग पुढच्या प्रश्नासाठी तयार व्हा.
  • ज्यावेळी तुम्ही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असता त्यावेळी तुम्ही तुमचे उत्तर देताना प्रथम महत्वाचे जे मुद्दे आहेत ते सांगा आणि मग कमी महत्वाचे मुद्दे सांगा असे केल्यामुळे मुलाखत घेणारा खुश होवून तुम्हाला त्यासाठी गुण देवू शकतो.
  • ज्यावेळी आपल्या मुलाखती मध्ये असा प्रश विचारला जातो कि तुम्ही तुमच्या बद्दल काही तरी सांगा त्यावेळी तुम्ही तुमचे नाव, शैक्षणिक माहिती, तसेच नोकरी संबधित माहिती तसेच तुमचा अनुभव असेल तर त्या संबधित माहित सांगा त्यामुळे मुलाखत घेणारा तुमच्यावर इम्प्रेस होईल. काही जन हा प्रश्न विचारल्यानंतर आपली आपले नाव, आपली कौटुंबिक माहिती, आपले आवड आणि छंद या विषयी माहिती सांगतात पण मुलाखत घेणाऱ्याला या प्रकारची माहिती गरजेची नसते.
  • तसेच तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जाता त्यावेळी तुमचा रेझुमे देखील चांगला असला पाहिजे म्हणजेच त्यामध्ये इतर माहिती घालण्यापेक्षा महत्वाची माहिती घालणे खूप गरजेचे असते. कारण रेझुमे ( resume ) मुळे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे अर्धे काम सोपे होते.
  • तुम्ही कधीही मुलाखतीला जात असताना चांगला आत्मविश्वास ठेवून आणि चांगल्या तयारीने जा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही.
  • मुलाखतीमध्ये स्वताबद्दल सांगा हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाची तयारी पूर्वी पासूनच करून ठेवा त्यामुळे तुम्हाला मुलाखती मध्ये उत्तर देणे खूप सोपे जाईल आणि तुम्ही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला इम्प्रेस देखील करू शकाल.
  • तुम्ही तुमची मुलाखत असताना मुलाखतीला अर्धा तास अगोदर जाणे हे फायद्याचे ठरू शकते.
  • जर तुम्ही या अगोदर कोणत्या ठिकाणी नोकरी केली असेल तर तुम्ही त्या विषयी किंवा तुमच्या चांगल्या अनुभवाविषयी माहिती सांगा त्यामुळे ते फायद्याचे ठरू शकते.
  • कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही घाबरू नका नाही तर तुम्हाला उत्तर माहित असून देखील तुमचे उत्तर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तर देताना शांतपण, न घाबरता आणि आत्मविश्वासाने उत्तर द्या.

आम्ही दिलेल्या interview tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इंटरव्ह्यू टिप्स मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या interview meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि interview questions in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!