iti fitter trade information in marathi आयटीआय फिटर कोर्स, सध्या आपण पहिले तर अनेक विद्यार्थी हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये चांगले शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्याने आयटीआय फिटर हा कोर्स केला ते त्याला फायद्याचे ठरेल कारण हा कोर्स कमी खर्चीक जरी असला तर हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला चांगली नोकरी मिळू शकते किंवा मग तो व्यक्ती आपला छोटा मोठ्या व्यवसाय देखील सुरु करू शकतो.
चला तर आज आपण या लेखामध्ये आयटीआय फिटर (ITI fitter) विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया. जर एखादा विद्यार्थी फिटर कोर्स करत असेल तर त्याला या कोर्समध्ये मशीन फिटिंग, पाईप फिटिंग आणि स्ट्रक्चर फिटिंग या सारखे फिटिंग करतो आणि हा कोर्स एक एक व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम आहे.
जो विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या फिटिंग विषयी शिकवतो. आयटीआय कार्सकरण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने १० वीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि हा कोर्स २ वर्षाचा असून प्रत्येक वर्षामध्ये एकूण २ सेमिस्टर असतात आणि अश्या प्रकारे हा ४ सेमिस्टरचा कोर्स आहे.
काही विद्यापीठे या कोर्ससाठी थेट प्रवेश देतात तर काही विद्यापीठे या कोरासाला प्रवेश देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतात आणि हा कोर्स करण्यासाठी २००० ते २५००० पर्यंत प्रवेश शुल्क आहे आणि हा कॉलेज नुसार बदलत असतो.
आयटीआय फिटर कोर्स – ITI Fitter Trade Information in Marathi
कोर्सचे नाव | आयटीआय फिटर |
पूर्ण स्वरूप | industrial training institutes (Fitter) |
कोर्सचा कालावधी | २ वर्ष (४ सेमिस्टर) |
पात्रता | १० वी पूर्ण |
प्रवेश शुल्क | २००० ते २५००० |
प्रशिक्षण | मशीन फिटिंग, पाईप फिटिंग आणि स्ट्रक्चर फिटिंग |
आयटीआय म्हणजे काय ?
आयटीआय हा कोर्स दहावी नंतर २ वर्ष करता येतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग संबधित शिक्षण दिले जाते. दहावी वी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षणाऐवजी काही तांत्रिक ज्ञान मिळवण्यात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक माहिती देण्यासाठी या संस्था स्थापन केल्या आहेत.
आयटीआय फिटर चे पूर्ण स्वरूप
आयटीआय या कोर्सला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (फिटर) असे म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये आयटीआय चे पूर्ण स्वरूप हे industrial training institutes (Fitter) असे आहे.
आयटीआय फिटर म्हणजे काय – iti fitter meaning in marathi
आयटीआय फिटर या कोर्समध्ये त्या संबधित विद्यार्थ्याला मशीन फिटिंग, पाईप फिटिंग आणि स्ट्रक्चर फिटिंग या सारखे फिटिंग या सारखे फिटिंगचे प्रकार शिकवले जातात आणि हा एक एक व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या फिटिंग विषयी शिकवतो.
आयटीआय फिटरचे प्रकार – iti fitter types in marathi
आयटीआयच्या फिटर कोर्सेस मध्ये आयटीआय हे प्रामुख्याने प्रमाणपत्र आणि डिप्लोमा प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. आयटीआय फिटरसाठी सोन प्रकारचे प्रमाणपत्र कोर्स आहेत ते म्हणजे एनसीव्हीटी (NCVT) आणि एससीव्हीटी (SCVT).
एनसीव्हीटी (NCVT)
एनसीव्हीटी ( NCVT ) म्हणजे नॅशणल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग हे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्थरावरील प्रमाणपत्र आहे जे संपूर्ण देशामध्ये वैध मानले जावू शकते. जर तुम्हीं आयटीआय फिटर कोर्स करत असाल तर तुम्ही एनसीव्हीटी ( NCVT ) प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करा.
एससीव्हीटी (SCVT)
एससीव्हीटी ( SCVT ) म्हणजे स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग हे प्रमाणपत्र राज्य स्तरीय प्रमाणपत्र आहे जे फक्त राज्यामध्ये वैध मानले जाते आणि जर तुम्ही एनसीव्हीटी ( NCVT ) मध्ये नसाल तर तुम्ही एससीव्हीटी ( SCVT ) सामील व्हावे.
आयटीआय फिटरसाठी पात्रता निकष – eiligibility
कोणताही शैक्षणिक कोर्स करण्यासाठी त्या संबधित संस्थेचे काही ठरवलेले पात्रता निकष असतात आणि तसेच आयटीआय फिटर हा कोर्स करण्यासाठी देखील इच्छुक व्यक्तींना काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण आता खाली पाहूया.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटीआय फिटर हा कोर्स करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याने कमीत कमी १० किंवा १२ वी चे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेले असले पाहिजे.
- त्या इच्छुक विद्यार्थ्याला १० मध्ये किंवा १२ वी मध्ये ५० टक्के किंवा ५० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटीआय फिटर हा कोर्स करायचा असल्यास त्याचे वय कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त ४० पर्यंत असले पाहिजे.
- त्या संबधित विद्यार्थ्याला थोडे तरी इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
- काही संस्था ह्या कोर्ससाठी थेट प्रवेश देतात परंतु काही विद्यापीठे ह्या कोर्ससाठी प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि विद्यापीठामार्फत घेतलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये उतीर्ण होणे आवश्यक आहे.
आयटीआय फिटर ट्रेड साठी प्रवेश कसा मिळवायचा ?
जर तुम्हाला आयटीआय फिटर हा कोर्स करायचा असल्यास तुम्ही या कोर्ससाठी दोन प्रकारे प्रवेश मिळवू शकता ते म्हणजे प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश आणि गुणवत्तेद्वारे प्रवेश अश्या दोन प्रकारे प्रवेश मिळवू शकता. काही विद्यापीठे या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी थेट प्रवेश देतात तर काही विद्यापीठे हा अभ्यासक्रम देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात.
आयटीआय फिटर पदवीसाठी अर्ज करणाऱ्या निवडलेल्या विद्यापीठांनी अनिवार्य केलेल्या कोणत्याही संबधित प्रवेश परीक्षा मदलाकडून त्यांचे निकाल आवश्यक असू शकतात.
आयटीआय फिटर कोर्ससाठी अर्ज कसा करावा ?
आयटीआय फिटर या कोर्सचे सर्व तपशील आणि माहिती म्हणजेच अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज सबमिट करण्याचे मोड इत्यादी हे सर्व विद्यापीठाच्या वेबसाईटवर असते किंवा मग ऑफलाईन विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या कोर्ससाठी ऑनलाइन मोद्दवारे किंवा ऑफलाइन मोदाद्वारे अर्ज करू शकता.
आयटीआय फिटरसाठी काही प्रसिध्द प्रवेश परीक्षा – entrance exams
जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटीआय फिटर साठी कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवायचा असल्यास त्याला काही प्रवेश परीक्षा द्यावे लागते आणि त्यामधील काही प्रसिध्द परीक्षा खाली आपण पाहूया.
- राज्यस्तरीय परीक्षा.
- AIE CET परीक्षा.
- खाजगी संस्था स्तरावरील परीक्षा.
आम्ही दिलेल्या iti fitter trade information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आयटीआय फिटर कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या iti fitter meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about iti fitter trade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट