Jativad Essay in Marathi – Essay On Indian Caste System in Marathi जातिवाद निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये जातीवाद या विषयावर निबंध लिहिणार आहोत. सर्वप्रथम आपण जातीवाद म्हणजेच काय हे जाणून घेवूया. जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत आणि लोक आपली जात कशी शश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी भांडत आहेत आणि यालाच जातीवाद किंवा जातीयवाद म्हणतात. आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये अनेक जातीचे आणि धर्माचे लोक अगदी आनंदाने एकत्र राहतात. भारतामध्ये एकूण २८ राज्ये आहेत आणि या २८ राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात.
जातिवाद निबंध मराठी – Jativad Essay in Marathi
Caste System Essay in Marathi
हिंदु, बौद्ध, जैन, इस्लाम, शीख, ख्रिश्चन हे भारतातील मुख्य धर्म आहेत म्हणजेच भारत देशामध्ये सर्व धर्माचे बांधव अगदी आनंदाने राहतात म्हणजेच हे सर्व धर्म आणि संस्कृती एकोपा आणि शांततेत राहतात. भारत हा देशामध्ये जरी विविध धर्माचे लोक राहत असले तरी हिंदू धर्म हा भारतातील बहुसंख्य धर्म आहे आणि भारतातील प्रबळ धर्म म्हणून हिंदू धर्म मनाला जातो तेथे ८० टक्के भारतीय हिंदू आहेत.
त्यामुळे भारतामध्ये हिंदू धर्माविषयी खूप चाली रिती आहेत. ‘जात’ म्हणजे आर्थिक आणि सामाजिक संबंधांशी निगडित असलेला समुदाय आणि ‘वाद’ म्हणजे कोणत्याही गोष्टीवर आपले मत, विचार किंवा तत्त्व मांडणे. माणसाला जन्मापासूनच आपल्या जातीचा अभिमान असतो, त्यामुळे तो आपल्या जातीच्या भक्तीत इतका रमून जातो की तो मानवतेची सर्व प्रतिष्ठा विसरतो आणि मग या प्रकारचे लोक शोषकांचा वर्ग म्हणून काम करतात. मानव म्हणून जन्माला येऊन आपली काय कर्तव्ये आहेत ते समजत नाही आहे.
जिकडे तिकडे बघेल तिकडे लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी झगडत आहेत जसे कि लोक सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात भांडत आहे तसेच आपल्याला सत्ता मिळावी म्हणून एकमेकांच्या मध्ये भांडण लावून आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच काही लोक आपला धर्म श्रेष्ठ म्हणून भांडत आहेत अश्या प्रकारे जगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी अनेक ठिकाणी भांडण चालूच आहेत.
भारतामध्ये जरी पूर्वीच्या काळी अनेक धर्म आणि जाती अगदी आनंदामध्ये राहत असल्या तरी सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद विषयी दंगली होत आहेत तसेच वेगवेगळ्या जातीचे गट एकमेकांना मारण्याच्या भाषा करत आहेत तसेच दंगलींच्या मुळे जाळपोळ होत आहे आणि त्यामुळे यामध्ये अनेक निरोश लोकांचे नुकसान होत आहेत तसेच या जातीयवादाचा फायदा अनेक राजकारणी लोक घेतात तसेच जातीयवादाचा फायदा दुसरे देश देखील घेवू शकतात.
जातीवाद होण्याची अनेक करणे आहेत जसे कि एकाद्या व्यक्तीला त्याच्या जन्मापासूनच त्याच्या जातीचा आणि धर्माचा खूप अभिमान असतो आणि तो जर आपल्या जातीच्या भक्तीमध्ये रमून गेला तर तो शोशाकांच्या वर्गामध्ये सामील होऊ शकतो. तसेच भारतामध्ये अनेक जाती आहेत आणि भारतामध्ये ज्या जातीचे लोक आहेत त्यांना असे वाटते कि आपली जात खूप श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे ते इतर जातींना कमी लेखतात तसेच इतर जातींच्या पासून अंतर ठेवतात त्यामुळे सामाज्यामध्ये अस्पृश्यता आणि जातीबद्दलची विषमता वाढण्यास उधान मिळते आणि त्यामुळे जाती विषयक वाद वाढतात.
त्याच बरोबर भारतामध्ये प्रत्येक जातीमध्ये असा नियम किंवा परंपरा आहे कि एकाद्या व्यक्तीने आपल्या समाजातील किंवा आपल्या जातीच्या व्यक्तीशीच लग्न करायचे आणि जर एकाद्या व्यक्तीने जर अंतरजातीय विवाह केला तर ते त्या समाज्याच्या विरोधात असते आणि त्यामुळे देखील जातीयवाद निर्माण होण्याची शक्यता असते.
जातीय वादाची सुरुवात हि सामाजी स्थार्वरून झाली म्हणजेच ज्यावेळी समाजामध्ये जातीचे किंवा धर्माचे दोन गट बनले आणि ज्या गटामध्ये जातीची मोठी संख्या असेल तो गट प्रबळ बनला आणि त्यामुळे दुसऱ्या गटावर शोषण होऊ लागले आणि त्यामधून सामाजिक स्तरावरील जातीयवाद निर्माण झाला.
जोपर्यंत सामाजिक स्तरावर जातीय वाद होता त्यावेळी त्या वादाशी संबधित असणाऱ्या समस्या ह्या निश्चत आणि मर्यादित होत्या म्हणजेच या सामाजिक पातळीवर सोडवण्यात येत होत्या परंतु ज्यावेळी देशातील राजकारणामध्ये जातीयवाद होऊ लागला त्यावेळी देशाचे विभाजन होऊ लागले आणि त्यामुळे त्याचा फायदा इतर देश देखील घेवू लागले त्याचबरोबर याच कारणामुळे देशावर आतंकवाद्यांचा हल्ला होऊ लागला आणि अश्या प्रकारे देशामध्ये वेगवेगळ्या कारणांच्यामुळे जातीवाद वाढला.
सध्या जातीय वादामुळे देशामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि लोक आपल्या जाती प्रेमासाठी दुसऱ्या जातीच्या लोकांना मारहाण करत आहेत तसेच त्यांच्या जातीविषयक असणाऱ्या गोष्टींची जाळपोळ करत आहेत आणि आपल्या सध्या भारतामध्ये भीषण दंगली पाहायला मिळत आहेत आणि हे रोखणे देखील खूप अशक्य झाले आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर लोकांना आपले जीवन शांतपणे आणि आनंदाने जगणे खूप मुश्कील होईल आणि जर जातीवाद असाच वाढत गेला तर सर्व ठिकाणी आपल्याला विध्वंस झालेला पाहायला मिळेल.
त्याचबरोबर समाजातील प्रत्येक गटाने जातीय वाद केला आणि आपल्या धर्माच्या किंवा जातीच्या हिताचा विचार केला तर समाजामध्ये खूप गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण होईल तसेच जातीय वाद करून कधीही एका जातीच्या गटाला न्याय मिळू शकतो आणि त्यामुळे एकाच जातीचे हित होते त्यामुळे समाजातील प्रत्येक जातीने जातीय वाद / जातीवाद न करता आपली मते किंवा विचार सामाज्यापुढे मांडून त्यामधून काही मार्ग काढून जाती साठी होणारी छोटी मोठी कारणे तिथल्या तिथे दबवली पाहिजेत तसेच प्रत्येक व्यक्तीने जातीय वादाला फाटे फुटणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे आणि जातिवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जगातील प्रत्येक मानवाने असे मानले पाहिजे कि मानवता हाच आपला धर्म आणि जात आहे आणि आपली आपल्या सामाज्यालेखी काही कर्तव्ये आहेत ती आपण पूर्ण केली पाहिजेत म्हणजे जगातील प्रत्येक लोकांनी आपला जात, धर्म न पाहता मानवता जपली पाहिजे आणि मानवतेची जागृकता वाढवली पाहिजे.
मानवाने हि एकमेकांच्या मनामध्ये असणारी धर्माची, जातीचे, भाषेची विषमतेची म्हणजेच जातीयवादाची / जातीवादाची भावना नष्ट केली पाहिजे आणि मानवता धर्म पाळला पाहिजे आणि देशामध्ये सर्व जातीच्या लोकांनी अगदी गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे. जर आपण मानवता हाच खरा धर्म आणि जात आहे असे मानून जर पुढे जगू लागलो तर आपण आनंदाने आणि समृध्द जीवन जगू शकतो आणि म्हणून शेवटी मला असे म्हणावे वाटते कि ‘खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे.’
आम्ही दिलेल्या jativad essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जातिवाद निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या caste system essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay On Indian Caste System in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Jatiche fayde va tote dyayla have hote … Jati kiti prakarchya ahe te pn