बाल न्याय कायदा JJ Act 2015 in Marathi

jj act 2015 in marathi बाल न्याय कायदा २०१५ माहिती, आज आपण या लेखामध्ये बाल न्याय कायदा या विषयी म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कसा काम करतो या बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जेजे कायदा म्हणजे juvenile justice act आणि या कायद्याला मराठीमध्ये बाल न्याय कायदा म्हणून ओळखले जाते आणि हा कायदा ३१ डिसेंबर २०१५ मध्ये या कायद्याला संमत्ती मिळाली आणि हा कायदा १५ जानेवारी २०१६ मध्ये संपूर्ण देशामध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे लागू करण्यात आला. बाल न्याय कायदा हा २०१५ मध्ये सुरु झाला म्हणून ह्या कायद्याला बाल न्याय कायदा २०१५ (juvenile justice act 2015) असे देखील म्हंटले जाते आणि हा कायदा अनेक गोष्टींच्या पासून मुलांचे संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी सुरु केला आहे.

पूर्वी या कायद्याचे नाव अल्पवयीन न्याय कायदा असे होते ते २०१५ मध्ये बाल न्याय कायदा म्हणून केले. जो व्यक्ती मुलांच्यावर हल्ला करतात, मुलांच्यासोबत दुर्व्यवहार करतात किंवा त्यांना सोडून देतात किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तन करतात अश्या मुलांच्यावर केलेल्या अत्याचाराबद्दल त्या संबधित व्यक्तीला या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते या शिक्षेमध्ये दंडात्मक शिक्षा होऊ शकते किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो. चला तर आता आपण बाल न्याय कायदा २०१५ या विषयी आणखीन माहिती खाली घेवूया.

jj act 2015 in marathi
jj act 2015 in marathi

बाल न्याय कायदा 2015 – JJ Act 2015 in Marathi

कायद्याचे नावबाल न्याय कायदा
कायद्याला संमती केंव्हा मिळाली३१ डिसेंबर २०१५
केंव्हा लागू झाला१५ जानेवारी २०१६
कोणी लागू केलामहिला आणि बालविकास मंत्रालय

बाल न्याय कायदा म्हणजे काय ? – what is mean by juvenile justice act 

 • बाल न्याय कायदा हा लहान मुलांचे संरक्षण आणि काळजीसाठी सुरु केलेला एक महत्वाचा कायदा आहे ज्याला जेजे कायदा म्हणून देखील ओळखले जाते.
 • बाल न्याय कायदा हा भारतामध्ये असणाऱ्या गरजू मुलांचे संरक्षण, सुरक्षा, शिक्षण आणि कल्याण करण्याची हमी देतो आणि हा कायदा भारतामधील बाल संरक्षणावरील एक प्रमुख कायदा आहे.

बाल न्याय कायद्याचे पूर्ण स्वरूप काय आहे – what is full form of jj 

जेजे कायद्याला मराठीमध्ये बाल न्याय कायदा २०१५ म्हणून ओळखले जाते आणि जेजे (JJ) चे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप juvenile justice असे आहे.

बालकल्याण समितीचे काय काम आहे ?

बालकल्याण समिती या कायद्यानुसार एक महत्वाची भूमिका बजावते आणि हि समिती मुलांची आणि कौटुंबिक परिस्थितीची चौकशी करते आणि जर त्या संबधित मुलाला खरोखर संरक्षणाची आणि काळजीची आवश्यकता असेल तर या समिती बाल न्याय कायद्यामार्फत तिला किंवा त्याला बालगृहात ठेवण्याची मागणी करतो.

बाल न्याय कायद्यातील तत्वे  

 • या कायद्यानुसार असुरक्षित असलेल्या मुलांना बालगृहामध्ये ठेवलेले असते आणि या मुलांचे समक्ष आणि प्रशिक्षित व्यक्तींच्या द्वारे २४ तास पर्यवेक्षण केले जाते.
 • रात्रीच्यावेळी देखील मुलांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचारी नेमलेले असतात हे कर्मचारी मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवतात.
 • बालगृहामध्ये ठेवलेली आणि राहिलेली मुले प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या कुटुंबियांना भेटू शकतात आणि ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी आठवड्यातून एकदा घरी फोन करू शकतात.
 • तेथील मुले एका समर्पित बॉक्स मध्ये आपल्या सर्व तक्रारी आणि सुचना जमा करतात आणि त्या तक्रारींचा आणि सूचनांचा आढावा हा बाल प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्टाफ मिटिंग दरम्यान घेतला जातो.
 • मुलींच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान एक महिला कर्मचारी नेमलेली असते.

बाल न्याय कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about juvenile justice act 2015 

 • बाल न्याय कायदा २०१५ हा गुन्हेगारीची जबाबदारी प्रधान करतो आणि गुन्हेगारीसाठी बहुसंख्य वय हे १६ ते १८ वयोगटापासून सुरु होतो जो कोणी गंभीर गुन्हा करतो आणि या साठी ७ वर्षाचा तुरुंगवास देखील असू शकतो.
 • बाल न्याय कायद्या अंतर्गत कोणत्याही मुलाला मृत्यदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.
 • कलम १५ अन्वये १६ ते १८ वयोगटातील मेळाव्यात गंभीर गुन्ह्यासाठी दोषी पक्षकारांना कसे हाताळावे या साठी व्यवस्था करण्यात आली आहे.
 • कोणताही अधिकारी जो २४ तासाच्या आत अडकून पडलेल्या तरुणाची तक्रार करत नाही त्याला दीड वर्षापर्यंत नजरकैदेत ठेवण्याची किंवा १० हजार रुपये दंड होण्याची किंवा काही केसेस मध्ये दोन्ही शिक्षा होण्याची शक्यता असते.
 • हा कायदा ३१ डिसेंबर २०१५ मध्ये या कायद्याला संमत्ती मिळाली आणि हा कायदा १५ जानेवारी २०१६ मध्ये संपूर्ण देशामध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे लागू करण्यात आला.
 • या कायद्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समित्या स्थापन करणे अनिवार्य आहे.
 • या कायद्यामध्ये लहान मुलांच्या विरुध्द केलेल्या अनेक नवीन गुन्ह्यांचा समावेश आहे जसे कि अतिरेकी गटाद्वारे मुलांचा वापर करणे, बेकायदेशीर पणे दत्तक घेणे, आपण मुलांच्या विरुध्दचे गुन्हे असे अनेक गुन्हे जे इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत पुरेशा प्रमाणात समाविष्ट नाहीत.
 • बाल न्याय कायदा २०१५ हा कायदा महिला आणि बालविकास मंत्रालयाने भारतामध्ये लागू केला आहे.

आम्ही दिलेल्या jj act 2015 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बाल न्याय कायदा 2015 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या juvenile justice act 2015 pdf in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!