कावेरी जातीची कोंबडी Kaveri Hen Information in Marathi

kaveri hen information in marathi कावेरी जातीची कोंबडी माहिती, सध्या आपण बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कोंबड्याचे प्रकार पाहतो आणि कावेरी कोंबडी हा एक त्यामधील प्रकार आहे आणि आज आपण या लेखामध्ये कावेरी कोंबडी (kaveri hen) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कावेरी कोंबडी हा एक देशी प्रकार आहे आणि ह्या प्रकारच्या कोंबड्या ह्या मुक्त पध्दतीमध्ये किंवा शेतामध्ये पाळता येतात आणि या कोंबडीच्या प्रकारचा शोध हा बेंगलोर मधील सीपीडीओ सेंट्रल पोल्ट्री डेव्ह्लोपमेंट ऑर्गनायझेशनने लावला आहे.

जर या कोंबडीची चांगल्या प्रकारे देखभाल आणि काळजी घेतली तर या कोंबडीची वाढ हि चांगल्या प्रकारे होते. चला तर खाली आपण कावेरी कोंबडी विषयी सविस्तर माहिती घेवूया.

kaveri hen information in marathi
kaveri hen information in marathi

कावेरी जातीची कोंबडी माहिती – Kaveri Hen Information in Marathi

प्रकार कावेरी कोंबडी
वजन२ किलो ते ४ किलो
रंगवेगवेगळ्या रंगामध्ये (बहुरंगी)
कोंबडीचा शोधसीपीडीओ सेंट्रल पोल्ट्री डेव्ह्लोपमेंट ऑर्गनायझेशनने लावला आहे.

कावेरी कोंबडी विषयी महत्वाची माहिती – information about kaveri hen in marathi

कावेरी कोंबडी हा देशी कोंबडीचा एक प्रकार असून हि कोंबडी दिसायला उंच असते परंतु या कोंबडीची शेपूट हि लहान असते आणि हि कोंबडी वजनाने २ किलो ते ४ किलो च्या आसपास असते. जर या कोंबडीच्या रंगाविषयी बोलायचे म्हटले तर हि कोंबडी वेगवेगळ्या रंगामध्ये असू शकते म्हणजेच पांढरा, तपकिरी, काळा आणि इतर रंगामध्ये असू शकते आणि हि कोणत्याही वातावरणामध्ये राहण्यास सक्षम असते जसे कि उष्ण किंवा थंड हवामान.

या कोंबडीचे व्यावसायिक दृष्ट्या फायदे म्हणजे हि कोंबडी वर्षामध्ये २१० पेक्षा अधिक अंडी घालू शकते त्याचबरोबर या कोंबडीचे मांस हे देसी कोंबडीसारखे कडक असल्यामुळे हे चवदार लागते आणि या कोंबडीचे मांस हे ३०० ते ३५० रुपये किलो इतके आहे. या कोंबड्यांच्या अंड्याचे वजन ४५ ते ५० ग्रॅम पर्यंत असते आणि पिल्ले ३० ते ३५ ग्रॅम ची असतात आणि ६० दिवसामध्ये पिल्लाचे वजन १ किलो पर्यंत वाढू शकते.

कावेरी कोंबडीचा आहार – food

कावेरी कोंबड्यांना त्यांच्या वयानुसार अन्न घातले जाते म्हणजेच या कोंबड्यांना पहिल्या सहा आठवड्यामध्ये ओट्स, गहू, भात आणि बार्ली या सारखे अन्न घातले जाते आणि पुढे त्यांना हाच आहार वाढवला तरी चालतो आणि या प्रकारच्या कोंबड्यांना दिवसातून ५ लिटर पाण्याची गरज असते त्याचबरोबर हि कोंबडी कीटक आणि दिमक देखील खाऊन आपले पोट भरते.

कोंबडीसाठी आवश्यक असणारे वातावरण – environment

कोंबडीचे असे काही प्रकार आहेत जे उष्ण हवामानामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकतात तसेच काही असे प्रकार आहेत जे फक्त थंड वातावरणामध्ये जगू शकतात, परंतु कावेरी कोंबडी हा असा कोंबडीचा प्रकार आहे. जो कोणत्याही वातावरणामध्ये म्हणजे उष्ण, थंड किंवा पावसाळी वातावरणामध्ये जगू शकतात.

कावेरी कोंबडीची वैशिष्ठ्ये – features

  • कावेरी कोंबड्यांच्या काही वैशिष्ट्यपैकी एक म्हणजे हि कोंबडी लवकर अंडी घालते त्यामुळे लवकर पिल्ले जन्माला येतात.
  • या कोंबड्यांचा कळप हा दिसायला एकसारखा असतो.
  • कावेरी कोंबड्यांचा प्रकार हा लैंगिक दृष्ट्या लवकर परिपक्व होतात.
  • अनेक कोंबड्यांचे प्रकार पांढऱ्या रंगाची अंडी देतात परंतु या कोंबड्या तपकिरी रंगाची अंडी घालतात.

कावेरी कोंबडीविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • कावेरी कोंबडीविषयी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ह्या कोंबड्या भांडखोर स्वभावाच्या असतात.
  • पहिल्या आठवड्यामध्ये कावेरी कोंबडीचे वजन हे १५० ते २०० ग्रॅम इतके असते.
  • भारतामध्ये या कोंबड्यांची खरेदी विक्री होते आणि प्रत्येक राज्यामध्ये या कोंबडीचे दर बदलतात आणि ते २५० ते ३५० पर्यंत असू शकतात.
  • या प्रकारची कोंबडी हि चार ते पाच महिन्याची झाल्यानंतर अंडी घालण्यास सक्षम ठरते.
  • कावेरी कोंबडीचा रोजचा आहार हां ११० ग्रॅम किंवा त्या पेक्षा अधिक असू शकतो.
  • जर एक कोंबडीचे वजन १ किलो पर्यंत होण्यासाठी त्या कोंबडीने ठराविक काळामध्ये ४ किलो अन्न खाल्ले पाहिजे.
  • कावेरी या कोंबडी प्रकाराचे वजन ५५ ते ६० दिवसामध्ये १ किलो इतके वाढत.
  • या कोंबडीच्या एक दिवसाच्या पिल्लाचे वजन ३० ते ३५ ग्रॅम असते.
  • कावेरी कोंबड्या ह्या वजनाने १.५ किलो पेक्षा जास्त झाल्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करते.
  • या कोंबडीचा प्रकार हा दिसायला देसी कोंबडीसारखा असतो.
  • कावेरी कोंबडीचा प्रकार हा मुक्त पध्दतीमध्ये पाळला जाऊ शकतो त्यामुळे हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे आणि खूप सोपा देखील आहे.
  • या कोंबडीचा प्रकार असा आहे कि ह्या दोन ते अडीच महिन्यानंतर अंडी घालू शकतात आणि या कोंबड्यांचा अंडी उबवण्याचा दर हा सरासरी ८० ते ८५ टक्के इतका असतो.
  • या कोंबड्यांची पिल्लानचा मृत्यू दर हा १० टक्के पेक्षा अधिक असू शकतो परंतु जर पिल्लांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर ती १० ते १२ टक्के पिल्ले जगू शकतात.
  • कावेरी कोंबड्या ह्या वर्षभरामध्ये वर सांगितल्याप्रमाणे २०० अंडी घालू शकते आणि हा कोंबडीचा प्रकार २० ते २५ दिवसामध्ये ९ ते १० अंडी घालते.
  • थंडीच्या काळामध्ये कोंबड्यांची मागणी वाढते त्यावेळी कावेरी कोंबडीची किंमती मध्ये देखील वाढ होते कारण या प्रकारची देखील थंडीच्या काळामध्ये मागणी वाढते.

आम्ही दिलेल्या kaveri hen information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कावेरी जातीची कोंबडी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kaveri hen information in marathi wikipedia या kaveri hen information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kaveri hen in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!