केदारनाथ मंदिर माहिती मराठी Kedarnath Information in Marathi

Kedarnath Information in Marathi – kedarnath temple history in marathi केदारनाथ मंदिर माहिती मराठी, भारतामधील उत्तराखंड राज्यामध्ये केदारनाथ हे एक छोटेसे गाव आहे ज्या ठिकाणी एक एक प्राचीन शिव किंवा महादेव मंदिर आहे ज्या मंदिराशी एक पौराणिक कथा जोडलेली आहे आणि ह्या मंदिरामध्ये देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात तसेच भारताबाहेरील पर्यटक देखील या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. केदारनाथ या ठिकाणाला केदारनाथ धाम म्हणून देखील ओळखले जाते आणि हे भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये आहे. हे धाम हिमालयामध्ये ३५८४ फुट उंचीवर आहे आणि हे मंदाकिनी नदीच्या उगमस्थानाजवळ वसलेले आहे.

केदारनाथ मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे जे भगवान शिव यांचे आहे आणि हे भगवान शिव यांच्या बारा ज्योतीर्लींगापैकी एक आहे. केदारनाथ मंदिर हे आदी शंकराचार्य यांनी सन ८ व्या शतकामध्ये बांधले होते असे म्हटले जाते आणि या मंदिराच्या आसपासचा परिसर हा मंत्रमुग्ध करणारा आहे म्हणजेच या मंदिराच्या बाजूला मंदाकनी नदी वाहत आहे तसेच मंदिराच्या पाठीमागे आणि मंदिराच्या बाजूने बर्फाच्छदित प्रदेश तसेच रोडोडेंड्रॉनाची जंगले आहे आणि हे सर्व पाहण्यासाठी नयनरम्य वाटत असते.

केदारनाथ मंदिर हे उंचीवर आहे आणि त्याच्या उंचीमुळे आणि भौगोलिक स्थितीमुळे केदारनाथ मंदिर हे सहा महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांच्यासाठी खुले असते. ह्या मंदिराची मुख्य आख्यायिका हि आपल्याला महाभारतातील पांडवांच्या काळाकडे नेते कारण त्यांनी आपल्या सावत्र भावाला मारल्यानंतर त्यांनी श्री कृष्ण भगवान यांच्या सल्ल्यानुसार भगवान शिव यांच्याकडे क्षमा मागितली आणि त्यांना गुप्तकाशीमध्ये भगवान शिव हे नंदीच्या रुपामध्ये दिसले होते.

आणि हे फक्त पाच पांडवांच्यामधील भीम यांना दिसले होते आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्या नंदीची शेपूट पकडली त्यावेळी नदीची शेपूट फक्त वर राहिली आणि शरीर जमिनीमध्ये गुप्त झाले असे म्हंटले जाते आणि मग त्या ठिकाणी आदि शंकराचार्यांनी म्हणजेच महाभारतातील कीर्तीच्या पांडवांनी त्या ठिकाणी मंदिर बांधले.

kedarnath information in marathi
kedarnath information in marathi

केदारनाथ मंदिर माहिती मराठी – Kedarnath Information in Marathi

ठिकाणाचे नावकेदारनाथ
ओळखकेदारनाथ धाम, भगवान शिव यांचे १२ शिवलिंगापैकी एक ठिकाण
ठिकाणभारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये आहे
स्थापना८ व्या शतकामध्ये
कोणी बांधलेआदि शंकराचार्य

मंदिराबद्दलची आख्यायिका – kedarnath temple history in marathi

महाभारतातील पांडवांच्या काळाकडे नेते कारण त्यांनी आपल्या सावत्र भावाला मारल्यानंतर त्यांनी श्री कृष्ण भगवान यांच्या सल्ल्यानुसार भगवान शिव यांच्याकडे क्षमा मागितली परंतु भगवान शिव यांना पांडवांना सहजपणे माफ करायचे नव्हते म्हणून ते पांडवांना लवकर सापडत नव्हते आणि ते गडवाल हिमालयामध्ये म्हणजेच ज्याला गुप्तकाशी म्हणून देखील ओळखले जाते.

या ठिकाणी नंदीच्या रुपामध्ये फिरत होते त्यामुळे पाडवांना भगवान शिव यांना खूप अवघड जात होते परंतु पांडवांच्यामधील भीम यांना नंदी रूपातील भगवान शिव ओळखले आणि त्यामुळे ते भगवान शिवांना पकडण्यासाठी पळत होते आणि त्यांनी भगवान शिवाच्या शेपटीला पकडले त्यावेळी भगवान शिव यांनी जमिनीमध्ये डुबकी घेतली.

आणि ते जमिनीमध्ये गुप्त झाले परंतु असे म्हटले जाते कि नंदी रूपातील भगवान शिव यांचे अवयव वेगेवगळ्या ठिकाणी आले होते. केदारनाथ मध्ये कुबडी, तुग्नाथ या ठिकाणी दोन पुढचे पाय, कल्पेश्वर या ठिकाणी केस, मध्य महेश्वर याठिकाणी नाभी आणि रुद्रनाथ या ठिकाणी चेहरा आणि या पाच ठिकाणांना पंच केदार असे म्हटले जाते.  

केदारनाथ मंदिराविषयी माहिती – information about kedarnath in marathi

केंदारनाथ मंदिर हे हिमालय पर्वतामध्ये वासालेके प्राचीनमंदिर आहे आणि हे मंदिर उत्तराखंड मधील ऋषिकेश्वर पासून २०० किलो मीटर लांब आहे. केंदार्नाथ मंदिर हे भगवान शिव यांचे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचे बांधकाम हे राखाडी रंगाच्या दगडांच्यापासून केले आहे. मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे.

जी मंदिराकडे टक लाऊन पाहत आहे आणि मंदिरामध्ये एक गर्भगृह आहे ज्या गृहामध्ये भगवान शिव यांची प्राथमिक मूर्ती आहे. त्याचबरोबर मंदिराच्या मंडप विभागामध्ये श्री कृष्ण, पांडव, कुंती, द्रौपदी यांच्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या बाजूला मंदाकनी नदी वाहत आहे तसेच मंदिराच्या पाठीमागे आणि मंदिराच्या बाजूने बर्फाच्छदित प्रदेश तसेच रोडोडेंड्रॉनाची जंगले आहे.

आणि हे सर्व पाहण्यासाठी नयनरम्य वाटत असते. या मंदिराने हजारो वर्षापेक्षा अधिक काळ भूकंप, हिमस्खलन, भूकंप आणि पूर या सारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत हे मंदिर आजदेखील मजबूतपणे उभे आहे आणि आजही हे मंदिर दिसण्यास देखील शोभिवंत दिसते. हिवाळा सुरु झाल्यानंतर हे मंदिर बंद असते आणि या मंदिरातील एक शिवाची मूर्ती हलवली जाते आणि ती उखिमठ या ठिकाणी असणारे ओंकारेश्वर या ठिकाणी ठेवली जाते आणि नंतर एप्रिल किंवा मे मध्ये मूर्ती केदारनाथ मंदिर मध्ये ठेवली जाते आणि भाविकांच्या साठी देखील मंदिर खुले होते.

केदारनाथ मंदिराला भेट देण्याची उत्तम वेळ – best time to visit 

केंदारनाथ धाम किंवा केंदारनाथ मंदिर हे भाविकांच्यासाठी किंवा यात्रेकरूंच्यासाठी सहा महिन्यासाठी उघडे असते आणि सहा महिने खुले असते कारण त्यांच्या उंचीमुळे आणि तेथील स्थानिक वातावरणातील बदलामुळे असे केले जाते. केदारनाथ मंदिर हे भाविकांच्यासाठी एप्रिल किंवा मी महिन्यामध्ये उघडलेले असते आणि हे मंदिर भाविकांच्यासाठी एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत खुले असते.

केदारनाथ पाहाण्यासारखी ठिकाणे – what to see near kedarnath 

  • गौरीकुंड हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी देवी पार्वती यांनी भगवान शिव यांच्याशी लागण करण्यासाठी या ठिकाणी ध्यान धारणा केली होती. यात्रेकरू केदारेश्वराच्या दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाण स्नान करून जातात. तसेच गौरीकुंडा जवळ देवीचा सन्मान करणारे एक प्राचीन मंदिर देखील आहे.
  • केंदारनाथ मंदिराच्या परिसरामध्ये काही अंतरावर आणखीन एक मंदिर आहे ते म्हणजे भैरव मंदिर जे खूप प्राचीन आणि महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भैरव या देवांना समर्पित आहे आणि हे मंदिर देखील हिवाळ्याच्या काळामध्ये बंद असते.
  • ओंकारेश्वर मंदिर हे केदारनाथ मंदिरापासून ५९ किलो मीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर उत्तराखंड मधील सर्वात पवित्र मंदिरांमधील एक आहे. ज्यावेळी हिवाळ्यामध्ये केदारनाथ मंदिर बंद झाल्यानंतर मंदिरामधील भगवान शिव यांची मूर्ती या मंदिरामध्ये हलवली जाते आणि मग हिवाळा संपल्यानंतर परत हि मूर्ती केदारनाथ मंदिरामध्ये प्रस्थापित केली जाते.

आम्ही दिलेल्या kedarnath information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केदारनाथ मंदिर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kedarnath temple history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kedarnath in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kedarnath temple information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!