कीबोर्डची माहिती Keyboard Information in Marathi

Keyboard Information in Marathi कीबोर्ड चे प्रकार किबोर्ड संगणकासह वापरल्या जाणार्‍या प्राथमिक इनपुट साधनांपैकी एक आहे. इलेक्ट्रिक टाइपराइटर प्रमाणेच कीबोर्ड अक्षरे, संख्या आणि चिन्हे तयार करण्यासाठी आणि अतिरिक्त कार्ये करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बटणावर बनलेला असतो त्याचबरोबर यामध्ये विंडोज आणि ऑल्ट की सारख्या विशेष की देखील कार्य करतात. कीबोर्ड एक प्राथमिक इनपुट डिव्हाइस असल्यामुळे वापरकर्त्यांना संगणक किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये मजकूर इनपुट करण्यास अनुमती देते.

keyboard information in marathi

 

कीबोर्डची माहिती मराठी – Keyboard Information in Marathi

कीबोर्डची रचना टाइपराइटर कीबोर्डवरून आली आहे आणि कीबोर्डवर अशा प्रकारे क्रमांक आणि अक्षरे व्यवस्थित आहेत ज्यामुळे आपल्याला जे करायचे आहे पटकन टाइप करण्यास मदत करते. बर्‍याच कीबोर्डमध्ये एक समान रचना असते कारण अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांसाठी असलेल्या वैयक्तिक कींना एकत्रितपणे वर्ण की म्हणतात.

या की चा आराखडा टाइपरायटर वरील की च्या मूळ आराखड्या मधून आला आहे. इंग्रजी भाषेत सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या लेआउटला क्व्वर्टी म्हणतात, ज्याला डावीकडील पहिल्या सहा अक्षराच्या अनुक्रमे नाव देण्यात आले आहे. कीबोर्ड चा वापर हा संगणकाला माहिती पुरवण्यासाठी केला जातो. आपण जसे किबोर्ड वर टाइप करू तशी अक्षरे, चिन्हे आणि अंक आपल्या संगणकाच्या स्क्रीन वर दिसत असतात.

कीबोर्ड म्हणजे काय ? 

संगणक कीबोर्ड एक इनपुट डिव्हाइस आहे ज्यावर बटणे किंवा की दाबून संगणकावर अक्षरे आणि कार्ये प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते. मजकूर प्रविष्ट करण्यासाठी वापरलेले हे प्राथमिक डिव्हाइस आहे आणि कीबोर्डमध्ये विशेषत: वैयक्तिक अक्षरे, अंक आणि विशेष अक्षरासाठी कीबोर्डवरील बटणे कार्य करत असतात त्याचबरोबर या बोर्डवर काही विशिष्ठ कार्य करणारी बटणे देखील असतात.

कीबोर्ड इनपुट डिव्हाइस का आहे?

संगणक कीबोर्डला इनपुट डिव्हाइस मानले जाते कारण ते केवळ संगणकावर डेटा पाठवते आणि त्यामधून कोणतीही माहिती प्राप्त करत नाही. आपण कीबोर्डवर टाइप करता तेव्हा आपण संगणकात माहिती इनपुट करत असतो.

कीबोर्ड चे प्रकार – Computer Keyboard Information in Marathi

संगणक कीबोर्डचे बरेच प्रकार आहेत त्यामधील काही खाली दिलेले आहेत.

लवचिक कीबोर्डचे – flexible keyboard 

हा एक प्रकारचा कीबोर्ड आहे जो अंत्यत पोर्टेबल मऊ सिलीकॉनने बनलेला असतो. हा कीबोर्डचे पाणी आणि धूळ प्रतिरोधक असतो आणि या वैशिष्ट्या मुळे हा कीबोर्ड सतत साफ करावा लागत नाही. हा कीबोर्ड युएसबी चा वापर करून संगणकाशी जोडला जातो. हा कीबोर्ड लवचिक असल्यामुळे आपण हा कीबोर्ड कोठेही घेवून जावू शकतो.

एर्गोनोमिक कीबोर्ड

एर्गोनोमिक कीबोर्ड हे एक असे डीझाईन आहे कि जे वापरण्यास सुलभ आहे आणि या प्रकारच्या कीबोर्ड मुळे कंटाळा येत नाही. या प्रकारचा कीबोर्ड वापरला तर आपल्या खूप वाकावे लागत नाही आपण आपले हात सरळ रेषेत करून टाईप करू शकतो. त्याचबरोबर या कीबोर्ड मध्ये सामान्य कीबोर्डच्या तुलनेत स्पेस बार चे बटन मोठे असते आणि या कीबोर्ड मुळे वेगवान टायपिंग होते.

वायरलेस कीबोर्ड – wireless keyboard 

वायरलेस कीबोर्ड हा एक असा कीबोर्ड आहे जो कोणत्याही केबल शिवाय संगणक, लॅपटॉप किवा टॅब्लेट ला जोडता येतो. या प्रकारच्या कनेक्शन साठी ब्लूटूथ, इन्फ्रारेड किवा रेडीओ वारंवारता या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

मेकॅनिकल कीबोर्ड – mechanical keybord 

मेकॅनिकल कीबोर्ड हे उच्च गुणवत्ते सह बनवलेला आहे आणि याचा उपयोग घरामध्ये तसेच कार्यालयामध्ये वापरले जातात. हे कीबोर्ड गेमिंग कार्य प्रदर्शनासाठी उत्तम कार्य करतो.

व्हरचुअल कीबोर्ड – virtual keybaord 

व्हरचुअल कीबोर्ड हा एक सॉफ्टवेयर आधारित कीबोर्ड आहे म्हणजेच जो आपल्या मोबाईलवर टायपिंग साठी वापरला जातो. या कीबोर्ड मध्ये डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर इमोजी, स्टिकर्स तसेच अॅनिमेटेड जीआयएफ या प्रकारचे पर्याय समाविष्ट असतात.

गेमिंग कीबोर्ड – gaming keyboard 

काही कीबोर्ड हे गेम खेळण्यासाठी वापरले जातात त्याला गेमिंग कीबोर्ड म्हणतात. या प्रकारामध्ये डब्ल्यु, डी, ए, आणि एस हे कीबोर्ड गेमिंगसाठी वापरले जातात.

कीबोर्ड ला किती बटणे असतात – keyboard keys information in marathi

उच्च प्रतीच्या कीबोर्ड वर १०१ बटन असतात ज्यामध्ये काही अक्षरे, चिन्ह, संख्या आणि काही विशीष्ट कार्य करणारे बटन असतात.

  • कंट्रोल कि
  • फंक्शन कि
  • एलईडी इंडिकेटर
  • व्रीस्ट पॅड
  • एरो की
  • टायपिंग कि मध्ये (numeric keys) अंक आणि (alphabet keys) अक्षरे या बटनांचा समावेश होतो.
  • कंट्रोल कि मध्ये ctrl, alt, shift, pageup (pgup), page down (pgdn), home (pause), end (break), escape, windows इत्यादी बटनांचा (keys) समावेश असतो.
  • इंडिकेटर कि मध्ये number lock (num lock) आणि caps lock (caps lk) ह्या बटनांचा समावेश असतो.
  • नंबर कि हे संगणकावर वेगवेगळ्या प्रकारची गणिते करण्यासाठी वापरली जातात आणि त्यामध्ये गणिती चिन्हे देखील वापरली जातात. यामध्ये (०, १, २, ३, …………… ९) हे अंक असतात.
  • फंक्शन कि म्हणजे F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12 ह्या कि कीबोर्डच्या वरच्या लाईनमध्ये असतात आणि अॅपल संगणकामध्ये F19 पर्यंत फंक्शन कि असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच किबोर्ड काय आहे त्याचे प्रकार किती आहेत व ते कसे चालते. keyboard information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा information of keyboard in marathi लेख कसा वाटला व अजून काही याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या computer marathi keyboard माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!