कुस्ती खेळाची माहिती Kushti Information in Marathi

Kushti Information in Marathi कुस्तीविषयी माहिती कुस्ती हा महाराष्ट्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रसिध्द खेळांपैकी एक आहे. कुस्ती kushti in marathi हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच महाराज्यांच्या काळा पासून खेळला जाणारा खेळ आहे बहुतेक हा खेळ मुघलांचे राज्य होते तेव्हापासून आज तागायत हा खेळ महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खेळला जातो. पूर्वीच्या काळी हा खेळ फक्त पुरूषाच खेळायचे पण आत्ताच्या काळामध्ये हा खेळ महिलाही खेळतात आणि त्याच्यावर ‘दंगल’ हा चित्रपट सुध्दा चित्रित केला आहे ज्यामध्ये फोगट परिवारातल्या मुलींनी आपले नाव कुस्तीमध्ये कसे मोठे केले. पूर्वीच्या काळामध्ये कुस्ती या खेळाला मल्ल युध्द या नावाने संबोधले जायचे तसेच कुस्ती हा खेळ कुश्ती या पार्शी शब्दापासून आला आहे.

हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूला पैलवान म्हंटले जाते आणि कुस्ती हा खेळ खेळण्यासाठी पैलवाणाची शरीरयष्टी चपळ आणि बुध्दी तेज असावी लागते. या खेळाचे मैदान चौरस किवा वर्तुळाकार असू शकते आणि ते लाल मातीपासून बनवले जाते. कुस्ती (Indian wrestling) हा खेळ भारत तसेच भारताच्या शेजारील देशामध्ये हि खूप प्रसिध्द आहे पण या खेळाचे महत्व आत्ताच्या काळामध्ये खूप कमी होत चालले आहे.

kushti information in marathi
kushti information in marathi / hind kesari kushti

कुस्ती खेळाची माहिती – Kushti Information in Marathi

कुस्तीबद्दल महत्वाची माहिती – important information about kusti 

कुस्ती या खेळामध्ये २ प्रतिस्पर्धी असतात आणि ते एकमेकांविरोधी खेळतात त्यांना ‘पैलवान’ म्हणतात. कुस्ती या खेळाचे मैदान चौरस किवा गोल आकाराचे असते आणि ते लाल मातीचे किवा त्यावर लाल रंगाचे मऊ मॅट असते. कुस्तीच्या मैदानाला आखाडा किवा तालीम म्हणतात. कुस्तीचा अभ्यास करण्यासाठी जी जागा वापरली जाते त्या जागेला कुस्तीची शाळा किवा कुस्तीची तालीम म्हंटले जाते आणि जो तालमीमध्ये कुस्ती शिकवतो त्याला औस्ताद किवा वस्ताद म्हंटले जाते. कुस्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाव असतात आणि ते म्हणजे एक पट, दुहेरी पट, गदालोट, मोळी, धोबीपछाड, कलाजंग आणि एकचाक.

व्यावसायिक कुस्तीचे नियम – professtional rules for wrestling

  • कुस्तीचा मुख्य आणि महत्वाचा नियम म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा जमिनीवर किवा मॅटवर पिन करून ठेवणे. प्रतीस्पर्ध्याच्या खांद्याचा भाग जमिनीच्या किवा मॅटच्या संपर्कात २ सेकंदासाठी ठेवला तर तो बाद होईल.
  • जर तसे होऊ शकले नाही तर ज्याने संबधित सामन्यामध्ये जास्त गुण मिळवले आहेत तो पैलवान विजेता पैलवान म्हणून घोषित केले जाते.

कुस्ती डाव: कुस्ती या खेळामध्ये गुण मिळवण्याचे मार्ग

  • टेकडाउन : टेकडाउन हा एक गुण मिळवण्याचा मार्ग आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला जमिनीकडे किवा मॅटकडे नेण्यासाठी आणि तिथे त्याला नियंत्रित करण्यासाठी २ गुण मिळत असतात
  • सुटका : जर प्रतिस्पर्ध्याने एक खेळाडूला जमिनीकडे किवा मॅटकडे नेले असेल आणि तेथे नियंत्रित केले असेल आणि त्यामधून जर सुटका करता आली तर १ गुण मिळू शकतो.
  • उलट : जेव्हा प्रतिस्पर्ध्याने जमिनीकडे किवा मॅटकडे नेले असेल पण तुम्ही त्याला उलटून जमिनीकडे किवा मॅटकडे नेले आणि नियंत्रित केले तर त्याचे २ गुण मिळू शकतात.
  • पेनल्टी पॉइंट्स : जर खालील नियमांचे उल्लंघन केल्यास प्रतिस्पर्ध्याला १ किवा २ गुण दिले जातात.
  • बेकायदेशीर होल्ड्स – शे अनेक नियम आहे जेथे रेफरी आपल्याला चेतावणी न देता दंड लावेल.
  • तांत्रिक उल्लंघन – कुस्ती टाळण्यासाठी जमिन किवा मॅट सोडून किवा आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिन किवा मॅटच्या बाहेर नेले तर प्रतिस्पर्ध्याला त्याचे गुण मिळतात तसेच रेफरीच्या परवानगी शिवाय मॅट सोडले तर त्याचे गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतात.
  • चुकीची सुरुवात केली तर गुण गमाण्याची शक्यता असते.

कोल्हापुरी कुस्ती – Kolhapuri kusti 

मर्दानी कुस्ती हा कोल्हापुरातील एक महत्वाचा, पारंपारिक आणि लोकप्रिय खेळ आहे जो खूप पूर्वीच्या काळापासून राजे तसेच महाराज लोक खेळत होते. कोल्हापुरातील एक नावलौकिक महाराज म्हणजे शाहू महाराज होय आणि हे देखील कुस्ती खेळायचे आणि त्यांनी कोल्हापुमध्ये कुस्ती खेळण्यासाठी एक मैदान बांधले होते त्याला खासबाग मैदान या नावाने ओळखले जाते आणि हे भारतातील एकमेव कुस्तीचे मैदान आहे. कोल्हापुरातील राजे स्वताच चांगले पैलवान असल्यामुळे पूर्वीच्या काळी कोल्हापूरमध्ये आठवड्यातून एका दिवशी कुस्तीचे नियोजन केले जायचेच. खासबाग मैदानाच्या बरोबर मध्यभागी एक हौदा आहे त्यामध्ये कुस्त्या लढवल्या जायच्या आणि त्या कुस्त्या ५० ते ६० हजार लोक कोणत्याही अडथळ्या शिवाय बघता यायची.

भारतातील काही लोकप्रिय पैलवान – popular Indian wrestlers 

भारतामध्ये प्राचीन काळापासून म्हणजे १००० वर्षापासून खेळला जातो आणि या खेळामध्ये अनेक लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडू होवून गेले आणि आत्ताच्या काळामध्ये हि अनेक यशस्वी पैलवान होत आहे त्यामध्ये महिला देखील सामील आहेत. काही यशस्वी खेळाडूंची नावे आणि माहिती खाली दिली आहे.

गीता फोगट :

गीता फोगट हे आपल्या वडिलांचे स्वप्न करणारी एक भारतीय महिला पैलवान आहे आणि हि भारताच्या कुस्तीच्या इतिहासातील रत्नच आहे. तिचे वडील पैलवान होते आणि त्यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला होता. गीता फोगट हिने २०१० मध्ये महिलांच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवले होते ज्या दिल्ली मध्ये झाल्या होत्या.

सुशील कुमार सोलंकी :

सुशील कुमार सोलंकी हा एक प्रसिध्द भारतीय कुस्तीपट्टु होता ज्याने वयाच्या १४ व्या वर्षी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये प्रवेश घेतला आणि १९९८ मध्ये वल्ड कॅडेट कुस्तीमध्ये त्याला पहिले सुवर्ण पदक मिळाले. पद्मश्री आणि रत्न मिळवणारा सुशील कुमार सोलंकी हा पहिला खेळाडू आहे.

दारा सिंग :

दारा सिंग हा भारतातील लोकप्रिय आणि खूप लोकांचा आवडता कुस्तीपट्टु होता. हे १९५४ मध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दाखल झाले होते. पैलवानी सोबत हे एक सुप्रसिध्द राजकारणी आणि अभिनेता देखील होते.

साक्षी मलिक :

साक्षी मलिक हि आणखी एक भारतीय महिला कुस्तीपट्टु आहे आणि हिने वयाच्या १२ व्या वर्षी कुस्तीचे प्रशिक्षण सुरु केले होते. साक्षी मलिक या कुस्तीपट्टुने कास्यपदक तसेच पद्मश्री मिळवले होते त्याच बरोबर पहिले ऑलम्पिक पदक मिळवणारी हि पहिली महिला आहे.

हिंद केसरी कुस्ती – Hind Kesari Kushti

लवकरच याबद्दल आम्ही माहिती घेऊन येऊ.

कुस्तीविषयी काही अनोखी तथ्ये – facts about kusti 

  • महाराष्ट्र केसरी कुस्तीची राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आयोजित केली जाते.
  • खाशाबा जाधव हे भारतातील पहिले ऑलम्पिक पदक मिळवणारे पैलवान होते.
  • कुस्ती खेळण्यासाठी लागणाऱ्या मैदानाला आखाडा म्हणतात आणि हा आखाडा १ मीटर खोल आणि ५ मीटर लांबी-रुंदीचा असतो.
  • कुस्ती या खेळाला मल्लयुध्द, बाहूयुध्द किवा अंगयुध्द या नावांनी हि ओळखले जायचे.
  • इंग्रजीमध्ये या खेळाला रेसलिंग आणि हिंदी मध्ये या खेळाला दंगल म्हणतात.
  • कुस्ती शिकवणाऱ्या प्रशिक्षकाला वस्ताद म्हंटले जाते.
  • या खेळामध्ये पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो.
  • कुस्ती २ पैलवानांमध्ये लढवली जाते.

आम्ही दिलेल्या kushti information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर कुस्ती या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about kushti in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि kushti game information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!