खादी ग्रामोद्योग माहिती KVIC Information in Marathi

kvic information in marathi खादी ग्रामोद्योग माहिती, भारतामध्ये अनेक प्रकारचे छोटे आणि मोठे असे बरेच उद्योग केले जातात आणि खादि आणि ग्रामोउद्योग आयोग हे एक त्यामधील क्षेत्र आहे ज्या विषयी आज आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. केव्हीआयसी चे पूर्ण स्वरूप khadi and village industries commission (खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन) असे आहे आणि हि एक वैधानिक संस्था आहे, ज्याची स्थापना १९५७ मध्ये झाली आहे.

भारत सरकारने ग्रामोउद्योगांना चालना देण्यासाठी आणि खादीचे उत्पादन आणि बाजारपेठ वाढवण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.

उत्पादकांना पुरवठा करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रक्रियेसाठी कच्या मालाचे साठे करण्यासाठी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी भारत सरकारने खादी आणि ग्राम आयोगाची स्थापना केली होती.

kvic information in marathi
kvic information in marathi

खादी ग्रामोद्योग माहिती – KVIC Information in Marathi

आयोगाचे नावखादि आणि ग्रामोउद्योग आयोग (केव्हीआयसी)
पूर्ण स्वरूपkhadi and village industries commission (खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन)
स्थापना१९५७

खादी आणि ग्रामोउद्योग आयोगाची उदिष्ठ्ये – objectives

कोणताही आयोग हा कोणतेतरी उदिष्ट ठेऊन स्थापन झालेला असतो आणि तसेच खादी आणि ग्रामोउद्योग आयोग हा देखील समोर काही उदिष्ट ठेवून स्थापन झाला आहे आणि त्या मुख्य उदिष्ठ्ये काय आहेत ते खाली आपण पाहूया.

  • ग्रामीण समुदायांच्यामध्ये स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता निर्माण करणे.
  • ग्रामीण भागामध्ये खादीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि त्याच्या विक्रीला देखील प्रोत्साहन देणे.
  • त्याचबरोबर मजबूत आणि भरवश समुदायाची निर्मिती करणे.
  • विक्रीयोग्य वस्तूंचे उत्पादन आणि ग्रामीण किंवा स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे.

खादी आणि ग्रामोउद्योग आयोगाची कार्ये – responsibilities

  • ग्रामोउद्योग क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या उद्योग संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि संबधित उत्पादन तंत्र आणि उपकरणे पुरवणे.
  • खादी आणि ग्रामोउद्योगाच्या विकासासाठी आणि कार्यासाठी व्यक्ती आणि बिगर व्यक्तींना आर्थिक साहाय्य प्रदान करते.
  • हस्तकला यांच्या विक्री आणि विपननाला प्रोत्साहन देणे.
  • उत्पादकांना पुरवठ्यासाठी कच्च्या मालाचे राखीव आणि त्यानंतरचे वितरण तयार करणे.
  • ग्रामोउद्योग क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणे संबधित उत्पादन तंत्र आणि उपकरणे.
  • उत्पादकांना पुरवठ्यासाठी कच्च्या मालाचे राखीव आणि त्यानंतरचे वितरण तयार करणे.

खादी आणि ग्रामोउद्योग आयोगामार्फत कर्ज हवे असल्यास पात्रता निकष – eiligibility

कोणतीही व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी बँकांचे काही ठरलेले पात्रता निकष असतात आणि तसेच खादी आणि ग्रामोउद्योग आयोगामार्फत कर्ज घेण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत. ते खाली आपण पाहूया.

  • ज्या संस्था उत्पादन कार्यामध्ये गुंतलेल्या असतात अश्या सहकारी संस्थाना या आयोगामार्फत कर्ज मिळते.
  • सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्थांना देखील या आयोगामार्फत कर्ज मिळते.
  • धर्मादाय ट्रस्टना देखील या आयोगामार्फत कर्ज मिळू शकते.
  • बचत गटांना देखील या आयोगामार्फत कर्जमिळते.
  • १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती आणि किमान ८ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेली व्यक्ती या कर्जासाठी पात्र ठरू शकते.

खादी आणि ग्रामोउद्योग आयोगासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – documents

खादी आणि ग्रामोउद्योग आयोगामध्ये जर एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज मिळवायचे असल्यास त्या संबधित व्यक्तीला किंवा संस्थेला काही कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण पाहूया.

  • अर्जाची श्रेणी परीभाषित करण्यासाठी किंवा सत्यापित करण्यासाठी जात प्रमाणपत्र किंवा समुदाय प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
  • ओळखीचा पुरावा आणि अर्जदाराच्या पत्याच्या पुराव्यासाठी काही केवायसी कागदपत्रे लागतात( पॅन कार्ड, मतदान ओळखपत्रे आणि आधार कार्ड ).
  • बँकेच्या कार्यालयाकडून मंजुरी पत्र किंवा प्रमाणपत्र लागते.
  • शेड किंवा व्यवसायाच्या जागेसाठी भाडे किंवा लीज दीडची प्रत जी ३ वर्षापेक्षा जुनी असू नये.

केव्हीआयसी आयोगामार्फत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया – process

जर एखाद्या व्यक्तीला केव्हीआयसी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या व्यक्तीला एका विशिष्ट ऑनलाईन प्रक्रिया पार करावी लागते आणि ती आपण खाली पाहुया.

  • केव्हीआयसी आयोगामार्फत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम केव्हीआयसी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज मिळेल आणि त्या अर्जावर क्लिक करा.
  • तुम्ही तुमच्या अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये सर्व माहिती भरा जसे कि नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, पत्ता व्यवसाय तपशील या सारखी सर्व माहिती भरा.
  • आता फोरम भरल्यानंतर सेव्ह या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
  • शेवटी प्रायोजक एजन्सीकडे अर्जाचे अंतिम सबमिशन बटनावर क्लिक करा. अंतिम सबमिशन केल्यानंतर तुमचा आरजे आयडी तयार केला जाईल आणि तो तुमच्या नोंदणीकृत इमेल आयडीवर पाठवला जाईल.

केव्हीआयसी विषयी विशेष तथ्ये – facts

  • खादी आणि ग्रामोउद्योग आयोग हे असे आयोग आहे ज्यामुळे लाभार्थींना ४ टक्के अनुदानित व्याजदर मिळतात आणि शिल्लक व्याजदर हा खादी आणि ग्रामोउद्योग आयोग मार्फत वहन केला जातो.
  • कर्जाच्या ३ ते ७ वर्षाच्या कालावधीव्यतिरिक्त, परतफेडीवर ६ महिन्यांचा अधिस्थगन प्रदान केला जातो.
  • खादी आणि ग्रामोउद्योग आयोग हि एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना १९५७ मध्ये झाली आहे.
  • केव्हीआयसी चे पूर्ण स्वरूप khadi and village industries commission (खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन) असे आहे.
  • विक्रीयोग्य वस्तूंचे उत्पादन आणि ग्रामीण किंवा स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे हे केव्हीआयसीचे मुख्य उदिष्ट आहे.

आम्ही दिलेल्या kvic information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर खादी ग्रामोद्योग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kvic business list in marathi या kvic meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kvic in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kvic subsidy scheme in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!