Lassi Recipe in Marathi लस्सी रेसिपी मराठी आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय बनवतो जसे कि लिंबू सरबत, आंब्याच पन्ह, ताक, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस आणि यामधील एक प्रसिध्द आणि लोकांना खूप आवडणारा पदार्थ म्हणजे लस्सी. लस्सी हा पदार्थ शक्यतो उन्हाळ्यामध्ये बनवला जातो आणि हे एक थंडगार पेय आहे जे दह्यापासून बनवले जाते आणि हे बनवणे खूप सोपे आहे. म्हणजेच हे बनवताना दही एका खोल भांड्यामध्ये घेतले जाते आणि मग त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ घालून ते रवीने फेटले जाते आणि त्यामध्ये दुध घालून ते थोडे पातळ बनवले जाते.
आणि अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी बनवू शकतो. लस्सी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे १० ते १५ मिनिटामध्ये बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वेगवेगळ्या फ्लेवराची लस्सी कशी बनवायची ते पाहूयात.
लस्सी रेसिपी मराठी – Lassi Recipe in Marathi
लस्सी बनवताना दही एका खोल भांड्यामध्ये घेतले जाते आणि मग त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ घालून ते रवीने फेटले जाते आणि त्यामध्ये दुध घालून ते थोडे पातळ बनवले जाते
लस्सी रेसिपीज – lassi recipes
लस्सी हि एक पारंपारिक भारतीय रेसिपी आहे म्हणजेच हि रेसिपी खूप पूर्वीपासून बनवली जाते पण सध्या या रेसिपीमध्ये थोडे बदल करून आता हि रेसिपी वेगवेगळे फ्लेवर वापरून बनवली जाते. लस्सी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे १० ते १५ मिनिटामध्ये बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वेगवेगळ्या फ्लेवरची रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
साधी लस्सी रेसिपी – simple lassi recipe
आता आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये सोप्या पध्दतीने बनवली जाणारी साधी लस्सी रेसिपी पाहणार आहोत.
- १ वाटी दही.
- अर्धी वाटी दुध.
- २ ते ३ चमचे साखर ( आवडीनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये दही घाला मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि हे रवीने चांगले गाठी फुटे पर्यंत फेटून घ्या.
- चांगले दही फेटले कि त्यामध्ये दुध घाला आणि परत ते दुध चंगले फेटा आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि परत मिक्स करा.
- आणि तयार झालेली लस्सी ग्लास मध्ये घाला आणि सर्व्ह करा.
रोझ फ्लेवर लस्सी रेसिपी – rose flavour lassi recipe
रोझ फ्लेवर लस्सी बनवण्यासाठी रोझ सिरप हे महत्वाचे साहित्य लागते आणि काही इतर साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. चला तर आता आपण रोझ फ्लेवरची लस्सी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
- १ वाटी दही.
- अर्धी वाटी दुध.
- २ ते ३ चमचे साखर ( आवडीनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- २ चमचे रोझ सिरप.
- सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये दही घाला मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि २ चमचे रोझ सिरप घाला आणि हे रवीने चांगले गाठी फुटे पर्यंत फेटून घ्या.
- चांगले दही फेटले कि त्यामध्ये दुध घाला आणि परत ते दुध चंगले फेटा आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि परत मिक्स करा.
- आणि तयार झालेली लस्सी ग्लास मध्ये घाला आणि सर्व्ह करा.
मँगो लस्सी रेसिपी – mango lassi recipe in marathi
आता आपण लस्सी मध्ये मँगो फ्लेवरची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- १ वाटी दही.
- अर्धी वाटी दुध.
- २ ते ३ चमचे साखर ( आवडीनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- २ ते ३ चमचे मँगो पल्प किंवा मँगो रस.
- सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये दही घाला मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि २ चमचे घाला मँगो पल्प किंवा मँगो रस आणि हे रवीने चांगले गाठी फुटे पर्यंत फेटून घ्या.
- चांगले दही फेटले कि त्यामध्ये दुध घाला आणि परत ते दुध चंगले फेटा आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि परत मिक्स करा.
- आणि तयार झालेली लस्सी ग्लास मध्ये घाला आणि सर्व्ह करा.
ड्राय फ्रुट्स लस्सी रेसिपी – dry fruits lassi recipe
आता आपण ड्राय फ्रुट्स लस्सी कशी बनवायची ते पाहूया.
- १ वाटी दही.
- अर्धी वाटी दुध.
- २ ते ३ चमचे साखर ( आवडीनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- १ छोटी वाटी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड तुकडे.
- सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये दही घाला मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते फेटून घ्या.
- मग त्यामध्ये दुध आणि ड्रायफ्रुट्स घाला आणि परत ते रवीने फेटून घ्या.
- मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि मिक्स करा.
- तयार झालेली लस्सी ग्लास मध्ये घाला आणि सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या lassi recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लस्सी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या punjabi lassi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mango lassi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ice cream lassi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट