लिंबू शेती कशी करावी Lemon Farming Tips in Marathi

lemon farming tips in marathi – lemon farming information in marathi लिंबू शेती कशी करावी आज आपण या लेखामध्ये लिंबूची शेती या विषयी माहिती लिहिणार आहोत. लिंबू हा अनेक उपयोगांच्यासाठी वापरला जातो म्हणजेच लिंबू हा अनेक पदार्थ बनवताना वापरला जातो तसेच काही वेळा सर्विंग म्हणून वापरला जातो तसेच काही वेळा अनेक औषधी गुणधर्मासाठी देखील लिंबूचा वापर केला जातो आणि म्हणुनच बाजारामध्ये लिंबूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणूनच भारतामध्ये तसेच इतर देशामध्ये लिंबू ची शेती केली जाते आणि लिंबूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिक घेतले जाते आणि त्यामधील एक घेतले जाणारे पिक म्हणजे लिंबू. लिंबू हि एक rutaceae कुटुंबामधील एक लहान आकाराची सदहारीर वनस्पती आहे जी दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व भारतामध्ये जास्त प्रमाणात पिकवली जाते आणि हि वनस्पती वाढण्यासाठी उष्ण हवामानाची गरज असते.

जर काही ठिकाणी मुसळदार पावसाच्या दमट हवामानामध्ये लिंबू चांगल्या प्रकारे येऊ शकतात आणि लिंबू पिकवण्यासाठी मुख्यता काळी माती, गाळयुक्त माती किंवा चिकन मातीची आवश्यकता असते.  

लिंबूचे झाड हे १५ ते २० वर्ष जगते म्हणजेच त्याचे आयुष्य हे १५ ते २० वर्ष असते आणि या झाडाला फळे हि त्याच्या वाढीनंतर म्हणजेच ५ वर्षांनी येतात. चला तर आता आपण लिंबूच्या झाडांची काळजी कशी घ्यायची तसेच ते वाढवण्यासाठी आणि त्याला जासी प्रमाणात फळे लागण्यासाठी काय करावे या बद्दल टिप्स पाहणार आहोत.

lemon farming tips in marathi
lemon farming tips in marathi

लिंबू शेती कशी करावी – Lemon Farming Tips in Marathi

लिंबू च्या झाडाची माहिती – lemon tree information in marathi

लिंबू हि एक rutaceae कुटुंबामधील एक लहान आकाराची सदहारीर वनस्पती आहे जी दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व भारतामध्ये जास्त प्रमाणात पिकवली जाते आणि हि वनस्पती वाढण्यासाठी उष्ण हवामानाची गरज असते. लिंबूचे झाड हे १५ ते २० वर्ष जगते म्हणजेच त्याचे आयुष्य हे १५ ते २० वर्ष असते आणि या झाडाला फळे हि त्याच्या वाढीनंतर म्हणजेच ५ वर्षांनी येतात.

झाडाचे नावलिंबूचे झाड
कुटुंबrutaceae
हवामानउष्ण हवामान
फळे लागण्यास सुरुवात५ वर्षा नंतर
झाडाचे आयुष्य१५ ते २०. वर्ष
झाडाची उंचीलहान ते मध्यम

लिंबूच्या शेतीसाठी टिप्स – tips for lemon farming 

लिंबू हा अनेक उपयोगांच्यासाठी वापरला जातो म्हणजेच लिंबू हा अनेक पदार्थ बनवताना वापरला जातो तसेच काही वेळा सर्विंग म्हणून वापरला जातो तसेच काही वेळा अनेक औषधी गुणधर्मासाठी देखील लिंबूचा वापर केला जातो आणि म्हणुनच बाजारामध्ये लिंबूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणूनच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबू ची शेती केली जाते. चला तर आता आपण लिंबूच्या झाडांची काळजी कशी घ्यायची तसेच ते वाढवण्यासाठी आणि त्याला जासी प्रमाणात फळे लागण्यासाठी काय करावे या बद्दल टिप्स पाहणार आहोत.

  • लिंबूची शेती करण्यासाठी किंवा लिंबूची झाडे चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी उष्ण हवामानाची गरज असते तसेच जरी मुसळधार पाऊस पडला तरी दमट हवामान लागते तरच लिंबू चांगल्या प्रकारे येऊ शकतात.
  • लिंबू हे काळी माती, गाळाची माती किंवा चिकनमाती मध्ये चांगल्या प्रकारे येते आणि या लिंबू च्या शेतील शेणखत किंवा कंपोस्ट खत खूप गरजेचे असते त्यामुळे या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि शेणखत हे कोणत्याही पिकासाठी चांगलेच असते.
  • या पिकाची लावणी करताना सर्वप्रथम ज्या शेतामध्ये लावणी करायची आहे त्याची सर्वप्रथम ३ ते ४ नांगरणी करून तेथील जमीन हि मऊ करून घ्यावी आणि तेथे दगड किंवा खडक राहू देवू नयेत. मग तेथे विशिष्ठ अंतरावर आणि विशिष्ठ खोलीचे खड्डे खणले जातात आणि मग त्यामध्ये शेणखत घातले जाते आणि मग त्यामध्ये ते रोप लावले जाते आणि मग त्यावर माती घालून त्या मातीवर युरिया किंवा सल्फेट टाकले जाते.
  • आपण रोपाच्या पूर्ण वाढी पर्यंत म्हणजेच ५ वर्षापर्यंत त्याला शेनखत, युरिया, सल्फेट हे वर्षातून दोन वेळा दिले तरी चालते.
  • लिंबूच्या झाडाला मॅग्नेशियम, तांबे, जस्त या यासारखे पोषक घटक देखील देणे गरजेचे असते.
  • लिंबूच्या झाडावर अनेक प्रकारचे रोग पडतात जसे कि बुरशी, कीटक या सारखे रोग होतात आणि त्या झाडांना या प्रकारचे रोग होऊ नयेत म्हणून तुम्ही कीटक नाशक औषधे तसेच बुरशीनाशक औषधे मारली पाहिजेचे यामुळे झाडांचे या रोगापासून बचाव होईल.
  • लिंबूच्या झाडाची महिन्यातून योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
  • काही जणांना माहित नसते कि लिंबूची लागवड केंव्हा करावी तर लिंबूची लागवड हि पावसाळ्याच्या दिवसामध्ये करावी जेणेकरून पावसाळ्यामध्ये झाडांना चांगली वाढ येवू शकते.
  • तसेच ज्यावेळी तुम्ही रोपांची लागवड करता त्यावेळी तुम्ही रोपाच्या शेंड्या वरील ६ ते ७ पाने ठेऊन रोपाची सर्व पाने काढावीत असे केल्याने रोपाला नवी पाने किंवा पालवी येण्यास मदत होते.
  • जर आपल्याला मोठ्या प्रमाणात फळे लागावीत असे वाटत असेल तर त्या झाडाचे मूळ आणि खोड हे चांगल्या प्रकारे येणे खूप गरजेचे असते आणि म्हणून ज्या वेळी पहिल्या वर्षी झाडाची वाढ होत असते त्यावेळी झाडाची कोणतीही छाटणी करू नका.
  • दाट आलेल्या फांद्या किंवा रोगाट झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात त्यामुळे तो रोग दुसरी कडे झाडाला कुठेही लागणार नाही.
  • कोणतेही झाड चांगले येण्यासाठी रोपांना नियमित पाणी द्यावे लागते तसेच लिंबूच्या झाडाला देखील नियमित पाणी द्यावे लागते.
  • रोप हे दोन वर्षाचे झाल्यानंतर त्याला चांगला आकार देण्यासाठी त्याला दोन वर्षानंतर छाटणी द्यावी त्यामुळे झाडाला चांगला आकार येतो तसेच झाडाची चांगली वाढ देखील होते.
  • झाडाला चौथ्या वर्षी फुलोरा येतो आणि फुलोरा आल्यानंतर फळांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना विशिष्ठ औषधांची फवारणी करणे खूप गरजेचे असते त्यामुळे फळे चांगली मोठी, रसरशीत आणि जास्त प्रमाणात लागतात.
  • लिंबू या झाडाचे फळ हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात लागते.

आम्ही दिलेल्या lemon farming tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लिंबू शेती कशी करावी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lemon farming information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि lemon farming in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!