जीवन विमा योजना माहिती Life Insurance Policy Information in Marathi

life insurance policy information in marathi – insurance policy meaning in marathi जीवन विमा योजना माहिती विमा पॉलिसी मराठी माहिती. विमा म्हणजे आपण उचललेल्या जोखमीचे सुरक्षा कवच होय. विम्याला इंग्रजीमध्ये इन्शुरन्स म्हंटलं जातं. विमा पॉलिसी किंवा विमा योजना ही पॉलिसीधारक म्हणजेच एखादी व्यक्ती खरेदी करते आणि त्या बदल्यांमध्ये विमा कंपनी पॉलिसीधारकाला आर्थिक दृष्ट्या मदत करते. विमा प्रदाता म्हणजेच विमा कंपनी आणि पॉलिसीधारक म्हणजेच अर्जदार यांच्यातील घडणारा एक अधिकृत करार म्हणजे विमा होय.

या कराराअंतर्गत व्यक्तीला किंवा ग्राहकाला नियमित रक्कम प्रीमियम म्हणून कंपनीला द्यावी लागते व विमा कंपनी त्या बदल्यात विमाधारकाला त्याच्या अकाली मृत्यू झाल्यास किंवा अपघात झाल्यास एखाद्याचा घराचे नुकसान झाल्यास भरपाई करून देते. या ब्लॉग मध्ये आपण विम्याचे विविध प्रकार त्याचे फायदे, वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. एखादी अनिश्चित घटना किंवा अपघात घडल्यास विमा कंपनी पॉलिसीधारकाला एक रकमी रक्कम प्रदान करते.

अर्जदार आपल्या गरजेनुसार व वैयक्तिक निवडीनुसार विशिष्ट प्रकारच्या विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. विमा पॉलिसी चे विविध घटक विमा खरेदी करण्या आधी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या वैयक्तिक गरजेनुसार आपल्या साठी कोणती विमा योजना निवडणे फायदेशीर ठरेल याची कल्पना येते. विमा खरेदी करण्यासाठी सर्वात प्रथम विमा पॉलिसी प्रीमियम भरावा लागतो. ही प्रीमियम रक्कम म्हणजेच विमा संरक्षण खरेदी करण्यासाठी भरावी लागणारी एक विशिष्ट रक्कम आहे.

हा प्रीमियम एका विशिष्ट कालावधीसाठी भरला जातो या कालावधीला प्रीमियम पेमेंट बँक असे म्हणतात. म्हणजेच पॉलिसी धारकाने प्रीमियम भरण्यासाठी लागणारे एकूण वर्ष म्हणजेच प्रीमियम पेमेंट र्टम होय. विमा कंपनी पॉलिसी धारकांना प्रीमियम भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय देतात. मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असे पर्याय दिले जातात. 

life insurance policy information in marathi
life insurance policy information in marathi

जीवन विमा योजना माहिती – Life Insurance Policy Information in Marathi

insurance policy meaning in marathi

प्रत्येक विमा योजना विमाधारकाला एका ठराविक कालावधी पर्यंत कव्हर करते या कालावधीला पॉलिसी र्टम असे म्हटले जाते. जोपर्यंत पॉलिसीधारक र्टम इन्शुरन्स प्रीमियम वेळेवर भरत असेल त्या कालावधी पर्यंत पॉलिसी धारकाची पॉलिसी सक्रिय राहते. विमा पॉलिसी प्रीमियम हा वेगवेगळ्या घटकांच्या आधारे निश्चित केला जातो. विमाधारकाला ज्या विशिष्ट प्रकारची पॉलिसी खरेदी करायची आहे त्यासाठी त्याची पात्रता तपासणे हा या मागचा मुख्य हेतू किंवा उद्देश आहे.

प्रत्येक विमा कंपनी समान प्रकाराच्या पॉलिसी साठी वेगवेगळे प्रीमियम लागू करते. त्यामुळे तुम्हाला परवडेल अशा योग्य किमतीची पॉलिसी निवडण्यासाठी विमा पॉलिसी बद्दल आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. जेव्हा विमा कंपनी एक विशिष्ट ठराविक रक्कम विमा धारकाला त्याचे नुकसान झाल्यास प्रदान करते तेव्हा त्या रकमेला पॉलिसी मर्यादा असे म्हटले जाते ही पॉलिसी मर्यादा विमाधारक कोणत्या प्रकारचा विमा खरेदी करत आहे व कोणत्या योजनेअंतर्गत खरेदी करत आहे या वरती आधारित असते.

विमा मर्यादा कालावधी, नुकसान, अपघात आणि इतर गोष्टींवरून ठरवली जाते. जितकी जास्त पॉलिसीची मर्यादा असते तितकाच जास्त प्रीमियम भरावा लागतो. विमा वजावट ही मालमत्ता, अपघात आणि आरोग्य विमा उत्पादनांमध्ये सामान्य असते. हा एक साधारण खिषा बाहेरील खर्च असून विमाधारकाने विमा संरक्षण सुरू होण्यापूर्वी आणि नुकसान भरपाई भरून देण्यापूर्वी भरणे गरजेचे असते. कव्हरेज विमा कंपनी व विमाधारक किती प्रीमियम रक्कम भरत आहे यावर आधारित सजावटीची मूल्य बदलतात.

साधारणता जर तुमची पॉलिसी जास्त वजावटिचे असेल तर तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षभरात कमी प्रीमियम भराल. सुरू होण्यापूर्वी विमाधारक अधिक खर्चांसाठी जबाबदार आहे तर जास्त प्रीमियम म्हणजे कमी वजावट. आपल्या आयुष्यामध्ये विम्याचे महत्त्व काय आहे किंवा विमा कशाप्रकारे काम करतो  हे आपण जाणून घेणार आहोत. तर पॉलिसी हा कायदेशीर करार असतो जो पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांना एकमेकांशी बांधून ठेवतो. व्यक्ती विमा कंपनी कडून विमा फायदे प्रदान करते.

जर आपण विमा उतरवला असेल तर विमा एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे आपण आपल्या स्वताचे व आपल्या कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या संरक्षण करू शकतो. विमा कंपनी तुम्ही घेतलेल्या जोखीम वर विशिष्ट प्रीमियम वर विमा संरक्षण प्रदान करते. दुर्दैवी घटना घडल्यास विमाधारक व्यक्ती विमा कंपनीकडे दावा दाखल करू शकतो दाव्याचे मूल्यमापन करून आलेल्या निकषांवर आधारित विमा करता दावा अर्जाचे पुनरावलोकन करतो आणि त्याचे निराकरण करते.

विम्याचे प्रकार किती ?

विम्याचे अनेक प्रकार असतात त्यातीलच काही विम्याचे अत्यंत साधारण प्रकार म्हणजे जीवन विमा, आरोग्य विमा, मोटर विमा, घर विमा, इत्यादी.. सामान्य लोक खरेदी करतात. त्यासोबतच अग्नि विमा, सागरी विमा इत्यादी विम्याचे प्रकार देखील आहेत. या वेगवेगळ्या प्रकाराच्या विमा पॉलिसी वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार वेगवेगळ्या गोष्टींसाठी कव्हरेज प्रधान करतात. जीवन विमा मध्ये जीवन धारकाला त्याच्या जीवनाचे संरक्षण दिले जाते. जर विमा धारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्यानंतर त्याच्या कुटुंबांवर आर्थिक संकट येऊ नये म्हणून विमा कंपनी कव्हरेज प्रदान करते.

आरोग्य विमा मध्ये पोलिसी धारक रुग्णालयात होणाऱ्या अधिक खर्चापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करतो. तसेच मोटर विमा हा गाडी संबंधित विमा योजना आहे. त्यामध्ये गाडीचे नुकसान झाल्यास जर हा विमा खरेदी केला असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई करून देते. अग्नि विमा हा पॉलिसी धारकाच्या घरि, व्यवसायात किंवा कारखान्यात लागलेल्या अनिश्चित आगी मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करून देतो.

सागरी विमा सागराशी संबंधित असून सागरी प्रवासादरम्यान जहाजाचे किंवा त्यातील मालाचे नुकसान झाले तर तिथे हा विमा उपयोगी पडतो. असेच विम्याचे‌‌ अनेक वेगवेगळ्या योजना आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारचे फायदे पॉलिसीधारकाला मिळवून देतात. जीवन विमा किंवा आपल्या घराचा विमा किंवा एखाद्या गोष्टीचा विमा उतरवणे अतिशय गरजेचे असते.

त्याच सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जेव्हा आपण विमा उतरवतो तेव्हा आपण अनिश्चित दुर्घटनां विरुद्ध कव्हरेज विकत घेत असतो. आयुष्यात येणाऱ्या अनिश्चित व दुर्दैवी घटना आपल्याला आर्थिक दृष्ट्या हतबल करू शकतात आणि अशा परिस्थितीत विम्याचा सर्वात जास्त उपयोग होतो कारण विमाधारक व्यक्तीला विमा कंपनीकडून विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. मग ती कोणतीही असो त्यामुळे विमा उतरवण्याचा हा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रमुख फायदा आहे. जीवनामध्ये विविध अनिश्चित घटना घडत असतात त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसाना पासून संरक्षण मिळवायचे असेल तर योग्य ती विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे.

विमा पॉलिसी खरेदी करण्याचा दुसरा महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे आर्थिक व्यवस्थापन होय. जेव्हा अनिश्चित दुर्दैवी घटना घडतात तेव्हा आपल्याला अनेक आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपलं आर्थिक व्यवस्थापन डगमगत परंतु जर विमा पॉलिसी खरेदी करून ठेवली असेल तर ज्या गोष्टीचा विमा उतरवला आहे त्याचे नुकसान झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई करून देते आणि विमाधारक कोणतीही आर्थिक चिंता न करता अत्यंत सहजरीत्या आलेल्या संकटावर मात करू शकतो.

विमा पॉलिसी गुंतवणुकीची संधी देखील प्रधान करते. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स योजना असतात त्यातील युनिट लिंक्ड इन्शुरन्स योजना भरलेल्या प्रीमियम चा काही भाग मार्केट लिंक्ड फंडमध्ये गुंतवते. ज्यामुळे तुम्ही मार्केट लिंक्ड रिटर्न्सचा लाभ घेऊ शकता आणि नियमितपणे पैसे गुंतवू शकतात आणि आपले जीवन अधिक सुधारू शकता.

आयुर्विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी भरलेल्या प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावटी साठी पात्र आहे या कपातीची मर्यादा आहे रुपये १.५ लाख. आयकर कायदा १९६१ च्या कलम 80D अंतर्गत स्वतःसाठी आणि पालकांसाठी पॉलिसी खरेदी करण्यासाठी भरलेला आरोग्य विमा प्रीमियम देखील करसवलत आहे. विमाधारकाला किंवा विमा पॉलिसी च्या नोंदणीला विमा कंपनी कडून मिळणारे जीवन विमा फायदे कलम 10(100D) अंतर्गत करसवलत आहेत.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना विमाधारक विम्याच्या या कर लाभांचा दावा करू शकतो. विमा खरेदी करणे ही काळाची गरज आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचा विमा खरेदी करतो परंतु प्रत्येकाला त्या विमा पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांची माहिती नसते तसेच लाइफ इन्शुरन्स सारखा विमा केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवू शकतो.

लाइफ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक केल्याने पैसे वाचवण्याची नियमित सवय लागते. मॅक्स लाइफ इन्शुरन्स मुदत योजना आणि आरोग्य विमा योजना यांसारख्या वेगवेगळ्या विमा योजना विमाधारकाला त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यात मदत करतात आणि अनेक इतर फायदे प्रदान करतात.

आम्ही दिलेल्या life insurance policy information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जीवन विमा योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या insurance policy meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि insurance information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!