एम ए म्हणजे काय? MA Information in Marathi

ma information in marathi – ma meaning in marathi एम ए म्हणजे काय?, सध्या शिक्षणाला खूप महत्व आहे आणि विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचा विचार करत असतात जसे कि विज्ञान क्षेत्रामध्ये, वाणिज्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रे आहेत त्या त्या क्षेत्रांच्यासाठी असे अनेक वेगवेगळे कोर्स आहेत आणि त्यामधील एमए (MA) या कोर्सविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. एमए हा एक प्रकारचा अंडर ग्रॅज्यूएट कोर्स आहे आणि हा कोर्स दोन वर्षाचा असतो जो बीए (BA) या तीन वर्षाच्या कोर्सनंतर करता येतो आणि या एमए चे पूर्ण स्वरूप मास्टर ऑफ आर्ट्स (master of arts) असे आहे.

जर एखाद्या व्यक्तीला हा कोर्स करायचा असल्यास वयाची कोणतीही मर्यादा नाही परंतु त्या व्यक्तीने कोणत्याही विद्यापीठातून बीए (बॅचलर ऑफ आर्ट्स) हे शिक्षण पूर्ण केले पाहिजे तरच त्या व्यक्तीला एमए हे शिक्षण घेता येते.

एमए शिक्षण पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हायस्कूल शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक, कार्यकारी सहाय्यक, डेटा विश्लेषक, शाळा समुपदेशक आणि सामग्री लेखक अश्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात आणि अश्या प्रकारच्या नोकऱ्या करणाऱ्या व्यक्तींना १०००० ते ५०००० पर्यंत पगार मिळू शकतो.

ma information in marathi
ma information in marathi

एम ए म्हणजे काय – MA Information in Marathi

कोर्सचे नावएमए (MA)
कोर्सचे पूर्ण स्वरूपमास्टर ऑफ आर्ट्स (master of arts)
कालावधी२ वर्ष
नोकरीहायस्कूल शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक, कार्यकारी सहाय्यक, डेटा विश्लेषक, शाळा समुपदेशक
पगार१०००० ते ५००००

मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला त्या संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला मास्टर ऑफ आर्ट्स हा कोर्स करायचा असेल तर त्या व्यक्तीने बीएचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे जे तीन वर्षाचे असते.
  • त्या व्यक्तीने बीएचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण करणे आवश्यक आहे आणि त्या विद्यार्थ्याला कमीत कमी ५० टक्के गुण मिळाले असले पाहिजेत.
  • हे शिक्षण घेण्यासाठी कोणतीही वयाची आट नाही.
  • त्या संबधी विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण देखील कला क्षेत्रातून केले पाहिजे.

मास्टर ऑफ आर्ट्स प्रवेश प्रक्रिया – process

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला मास्टर ऑफ आर्ट्स शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्या व्यक्तीला प्रवेश प्रक्रिया द्यावी लागेल आणि त्यामध्ये उतीर्ण होणे देखील आवश्यक असते. काही विद्यापीठे एमए साठी प्रवेश प्रक्रिया घेतात तर काही विद्यापीठे प्रवेश प्रक्रिया घेत नाहीत.
  • मग प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या आधारावर विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो आणि काही विद्यापीठे हि उत्तम उमेदवार निवडण्यासाठी गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत घेवून निवड करतात.

मास्टर ऑफ आर्ट्स स्पेशलायझेशन – ma subject list in marathi

मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) हा कोर्स दोन वर्षाचा आहे आणि हा कोर्स कोणताही व्यक्ती बीए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करू शकतो आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन तो एमए हा कोर्स करू शकतो. एमए कोर्समध्ये वेगवेगळी स्पेशलायझेशन कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत.

  • एमए हिंदी.
  • एमए इंग्रजी.
  • एमए तत्वज्ञान.
  • एमए सामाजिक कार्य.
  • एमए अनंरराष्ट्रीय संबध.
  • एमए मानशास्त्र.
  • एमए शिक्षण.
  • एमए इतिहास.
  • एमए एचआर व्यवस्थापन.
  • एमए राज्यशास्त्र.

एमए कोर्सचे प्रकार – types

मास्टर ऑफ आर्टस (एमए) या कोर्सचे तीन मुख्य प्रकारामध्ये विभाजन केले आहे आणि ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

  • नियमित एमए : नियमित एमए या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पारंपारिक पध्दतीने नियमित वर्गात उपस्थित राहावे लागते. हा कोर्स नवीन पदवीधरांसाठी योग्य आहे जे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी २ वर्ष समर्पित करू शकतात.
  • डीस्टन्स एमए : डीस्टन्स एमए हा विशेषता कार्यरत व्यवसायीकांच्यासाठी तयार केलेला कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील वर्गामध्ये उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळण्यास मदत मिळते.
  • ऑनलाइन एमए : ऑनलाइन एमए हा एक प्रगत स्थराचा कार्यक्रम आहे जो कार्यरत व्यावसायिकांच्या समस्यांचे निराकरण करतो. ऑनलाइन एमए कोर्समध्ये विद्यार्थ्यांना लर्निग मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑनलाइन परीक्षांद्वारे वेळेवर ऑनलाइन व्याख्याने मिळतात.

एमए कोर्ससाठी आवश्यक कौशल्ये – skills

एमए हा कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काही संबधित कौशल्ये असणे आवश्यक असते जी पदवी घेताना उपयोगी ठरतील. चला तर खाली आपण एमए शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये कोणती आहेत, ते खाली आपण पाहूया.

  • त्या संबधित विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य असले पाहिजे.
  • तसेच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असणे आवश्यक असते.
  • तो संबधित विद्यार्थी जिज्ञासू वृत्तीचा असणे आवश्यक असते.
  • संस्थात्मक आणि वैयक्तिक कौशल्ये असणे आवश्यक असते.
  • चांगले बोलण्याचे किंवा चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक असते.
  • विश्लेषण किंवा समजून सांगण्याचे चांगले कौशल्य असले पाहिजे.

एमए कोर्सविषयी काही प्रश्न

विविध नोकरी प्रोफाइल कोणते आहेत ज्यावर एमए विद्यार्थ्यांना काम मिळू शकते ?

एमए पदवीधर केलेल्या व्यक्तीला वार्ताहार, भाषाशास्त्रज्ञ, हायस्कूल शिक्षक, प्रसारण पत्रकार, भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि व्याख्याता अश्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकते.

एमए कोर्स काय आहे आणि कोर्सचा कालावधी किती आहे ?

एमए हा एक प्रकारचा अंडर ग्रॅज्यूएट कोर्स आहे आणि हा कोर्स दोन वर्षाचा असतो जो बीए ( BA ) या तीन वर्षाच्या कोर्सनंतर करता येतो आणि या एमए चे पूर्ण स्वरूप मास्टर ऑफ आर्ट्स ( master of arts ) असे आहे.

राज्यशास्त्र मध्ये एमए केल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते?

राज्यशास्त्र या क्षेत्रामधून एमए केल्यानंतर रिपोर्टिंग, मास मिडिया, लेखक, सोशल मिडीया, प्रचार आणि राजकारण या क्षेत्रामध्ये करियर करू शकतात.

एमए या कोर्सचे पूर्ण स्वरूप (full form) ?

एमए हा कोर्स बीए (BA) हे तीन वर्षाचे ग्रज्यूएशन पूर्ण केल्यानंतर मास्टर ग्रज्यूएशनचा एक भाग आहे आणि एमए चे पूर्ण स्वरूप मास्टर ऑफ आर्ट्स (master of arts) असा आहे.

आम्ही दिलेल्या ma information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एम ए म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ma meaning in marathi या ma subject list in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि ma education information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!