Maggi Recipes in Marathi मॅगी रेसिपी मराठी मॅगी म्हटलं कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि या पदार्थाचे नाव ऐकताच हा पदार्थ खाण्याचे मन होते. मॅगी हा पदार्थ भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवला जातो आणि आणि खूप आवडीने खाल्ला देखील जातो. असे अनेक लोक आहेत. जे मॅगी या पदार्थाचे वेढे आहेत आणि त्यांना आठवड्यातून २ ते ३ वेळा मॅगी हा पदार्थ खावूच वाटतो. मॅगी हा पदार्थ लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडतो आणि हा भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. मॅगी हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो आणि आज आपण मॅगी वेगवेगळ्या प्रकारे काही बनवायची ते पाहणार आहोत.
मॅगी हा पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनणारा पदार्थ आहे तसेच कमी साहित्यामध्ये देखील बनतो. चला तर मग मॅगी वेगवेगळ्या प्रकारे कशी बनवायची ते पाहूयात.

मॅगी रेसिपी मराठी – Maggi Recipes in Marathi
मॅगी रेसिपीज – maggi recipes
मॅगी हा पदार्थ सगळ्यांना आवडणारा आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा एकदम टेस्टी आणि झटपट बनणारा पदार्थ आहे. मॅगी हि रेसिपी खूप सोपी आणि झटपट म्हणजे १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि याला खूप कमी साहित्य लागते. मॅगी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जसे कि साधी मॅगी, मसाला मॅगी, चीज मॅगी असे मॅगीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आणि आता आपण त्याच वेगवेगळ्या प्रकारे मॅगी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
साधी मॅगी रेसिपी – simple maggi recipe in marathi
साधी मॅगी म्हणजे जी आपण पाण्यामध्ये फक्त मॅगी खातो त्याला साधी मॅगी म्हणतात. साधी मॅगी हा मॅगीचा प्रकार झटपट बनतो. चाल तर मग पाहूयात साधी मॅगी कशी बनवायची.
साधी मॅगी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि यासाठी मॅगीचे एक पॅकेट लागते आणि त्यामध्ये मसाला देखील असतो.
- १ मॅगी पॅकेट.
- १ पॅकेट मॅगी मसाला.
- २ वाटी पाणी.
- १/३ चमचा काळी मिरी पावडर
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून साधी मॅगी कशी बनवायची ते पाहूयात.
- साधी मॅगी बनवताना सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि आणि मग त्यामध्ये लगेच दोन वाटी पाणी घाला आणि ते उकळू पर्यंत वाट पहा.
- पाणी पूर्णपणे उकळले कि त्यामध्ये मॅगी घाला आणि ती हलवत राहून ती चांगली सुट्टी करून घ्या.
- मॅगी सुट्टी झाली कि त्यामध्ये मॅगी मसाला आणि काळी मिरी पावडर घाला आणि मग तो मसाला आणि पावडर मॅगीमध्ये चांगला मिक्स करा.
- आणि मॅगी थोडा वेळ म्हणजे ५ मिनिटे गॅसवर मध्यम आचेवर शिजू द्या.
- मॅगीमधील संपूर्ण पाणी आटवून ती घट्ट बनवू नका तर ती थोडी रसाळ असू द्या त्यामुळे टेस्ट चांगली येते.
- साधी मॅगी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
मसाला मॅगी रेसिपी – maggi masala recipe in marathi
मसाला मॅगी रेसिपी बनवणे खूप सोपे आहे आणि ह्या प्रकारची मॅगी खूप टेस्टी लागते कारण यामध्ये काही मसाले आणि भाज्या वापरल्या जातात. चाल तर मग पाहूयात मसाला मॅगी कशी बनवायची.
मसाला मॅगी रेसिपी बनवण्यासाठी काही मसाले, भाज्या आणि इतर काही साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये बहुतेक वेळा उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग पाहूयात लागणारे साहित्य.
- १ मॅगी पॅकेट.
- १ पॅकेट मॅगी मसाला.
- १ बारीक चिरलेला कांदा.
- १ बारीक चिरलेला टोमॅटो.
- १ शिमला मिरची ( बिया काढलेल्या आणि बारीक चिरलेली ).
- २ चमचे मटार.
- १ चमचा कांदा लसून मसाला.
- १/३ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- २ चमचे तेल.
- २ वाटी पाणी.
आता आपण खूप सोपी आणि टेस्टी मसाला मॅगी रेसिपी वर दिलेले साहित्य वापरून कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- मसाला मॅगी बनवताना सर्वप्रथम सर भाज्या चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये प्रथम कांदा घाला आणि तो कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजा.
- मग त्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, आणि मटार घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र भाजून घ्या.
- भाज्या चांगल्या भाजल्या कि त्यामध्ये कांदा लसून मसाला, हळद घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते मिक्स करून त्याला उकळी येवू द्या.
- याला उकळी आली कि त्यामध्ये मॅगी घाला आणि सुट्टी होईपर्यंत हलवत रहा. मॅगी सुट्टी झाली कि त्यामध्ये मॅगी मसाला घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यावर झाकण लावून ते ५ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या.
- मसाला मॅगी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
चीज मॅगी रेसिपी – cheese maggi recipe in marathi
चला तर आता आपण चीज मॅगी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- १ मॅगी पॅकेट.
- १ पॅकेट मॅगी मसाला.
- १ बारीक चिरलेला कांदा.
- १ बारीक चिरलेला टोमॅटो.
- २ चमचे मटार.
- ४ ते ५ चमचे खिसलेला चीज.
- १ चमचा कांदा लसून मसाला.
- १/३ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- २ चमचे तेल.
- २ वाटी पाणी.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये प्रथम कांदा घाला आणि तो कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजा.
- मग त्यामध्ये टोमॅटो आणि मटार घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र भाजून घ्या.
- भाज्या चांगल्या भाजल्या कि त्यामध्ये कांदा लसून मसाला, हळद घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते मिक्स करून त्याला उकळी येवू द्या.
- याला उकळी आली कि त्यामध्ये मॅगी घाला आणि सुट्टी होईपर्यंत हलवत रहा आणि मग यामध्ये मसाला घाला आणि तो मसाला चांगला मिक्स करा.
- आता यामध्ये २ चमचे खिसलेले चीज घाला आणि ते मिक्स करून मॅगी २ तर ३ मिनिटे गॅसवर वाफवून घ्या.
- गॅसवर गरमागर असताना सर्विंग बाऊलमध्ये काढा आणि त्यावर चीज घाला आणि सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या maggi recipes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मॅगी रेसिपी मराठी माहिती maggi recipe marathi madhura बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maggi pakoda recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि anda maggi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये egg maggi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट