महापूरा संबधी माहिती Mahapur Information In Marathi PDF

Mahapur information in Marathi pdf दरवर्षी प्रमाणे यावर्षीही खूप पाऊस पडला. पाऊस इतका पडला कि त्या पावसाचा जोर वाढतच गेला आणि पाऊस हा पडतच गेला. सगळे नाले भरले आणि नदीला महापूर आला. आणखी एक दोन दिवसांनी पाणी वाढतच गेले ते पाणी महामार्गावर आले त्यानंतर काही दिवसात पाणी पूर्ण शहरात आले. महामार्ग पाण्याखाली सर्व रस्ते, शेत, घरे पाण्याखाली आले. त्यामुळे आजूबाजूंच्या गावांचे शहराचे संपर्क तुटले आणि कित्येक दिवस सर्वच बंद उदा. पेट्रोल, दुध इ. भाजीपाला महाग झाला. दररोज टिव्हीमध्ये वर्तमानपत्रात ह्याच बातम्या. लोकांची चिंता वाढू लागली आता आपल्या घराबाहेर पाणी येणार का? आता काय होणार? लोकांची घरे पाण्याखाली गेल्यामुळे सगळ्यांचे आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या खूप नुकसान झाले. तसेच खूप जीवितहानीही झाले.

mahapur-information-in-marathi-pdf
महापूराची संपूर्ण माहिती

महापुराचे थैमान (Mahapur Information In Marathi PDF)

निसर्ग असा आहे कि त्याला पूर्णपणे समजणे फारच कठीण आहे. जसे मनुष्याला जगण्यासाठी सर्वकाही दिले आहे तसेच निसर्गाचा प्रकोप झाला तर तो मनुष्याकडील सर्वकाही हिसकावून घेऊ शकेल. निसर्गाचा ह्या प्रकोपाला (Natural Disaster) असे म्हणतात.

पृथ्वीवर अनेक नैसर्गिक प्रकोप येतच राहतात त्यामधील हा एक महापूर. पूर हा एक असा प्रकोप आहे कि हा कधीही कोठेही येऊ शकतो. तसेच या पुराने एक भयानक रूप घेतले तर हा एक मोठा महापूर होऊ शकतो. यामध्ये एक प्रश्न पडतो कि महापूर आहे तरी काय, आणि यापासून कसे वाचले पाहिजेत. जर आपण हेच सगळे जाणून घेणार असाल तर हा लेख (Mahapur Information In Marathi PDF) काळजीपूर्वक वाचा.

जलाशयामध्ये पाण्याची वाढ होऊन आणि जास्त पावसामुळे नदीला आपला किनारा ओलांडून, मोठे बर्फाळ प्रदेश विरघळून किव्हा जोरदार वाऱ्यामुळे आणि चक्रीवादळामुळे बांध फुटून मोठ्या क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात पाणी भरल्यामुळे महापूर येतो.

खूपवेळा पूर यायच्याआधी हवामान आपल्याला काही संकेत देत असतो कि ज्यामुळे पूर येऊ शकतो असे भासत राहते. अशामध्ये हवामान खात्या द्वारा चेतावणी दिली जाते आणि जवळपास राहत असणाऱ्या रहिवासीना २-३ दिवस वेळ असतो, ज्यामुळे ते जागरूक होऊन त्या जागेला खाली करतात. कधी कधी महापूर समुद्रामध्ये चक्रीवादळ येऊन उंच लाटामुळे कोणत्याही चेतावणी शिवाय अचानक येऊ शकते. हा महापूर अत्यंत विनाशकारी असतो.

हा महापूर जास्तीत जास्त सुनामी मुळे येतो. त्यामुळे काही लोक सुनामीला महापूर असेही म्हणतात. सुनामी कायम समुद्रामध्ये भूकंपामुळे येते. सुनामिंच्या लाटांची गती ४२० किलोमीटर प्रती तास असते. एवढी जास्त गतीमुळे सुनामीच्या लाटा जेव्हा तटाला टक्कर देतात तेव्हा त्या क्षेत्रामध्ये अतंत्य विनाशकारी महापूर येतो. सुनामी जास्तीत जास्त प्रशांत महासागर मध्ये येतो. जपान, इंडोनेशिया सारखे आणि काही देश या सुनामीच्या विळख्यात आलेले आहेत.

महापुराची कारणे (Causes of floods)

महापूर एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण महापूर येण्याच्या मागे माणसांचाही हात आहे. चला तर आपण जाणून घेऊयात महापूर येण्याची कारणे

१. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला कि महापूर येतो, हे एक सगळ्यात मोठे कारण आहे. वारंवार काही दिवसापर्यंत मुसळधार पाऊस पडल्यानंतर नदी, धरणे काठोकाठ भरून त्यामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

२. अचानक बांध फुटल्यामुळे, कोणत्याही समुद्रामध्ये तट फुटल्यामुळे  महापूर येण्याची शकत्या असते.

३. तापमानमध्ये वाढ झाल्यानंतर मोठे बर्फाळ प्रदेश विरघळून आजूबाजूंच्या क्षेत्रामध्ये महापूर येण्याची शक्यता आहे.

४. समुद्रामध्ये अचानक भूकंप आल्यामुळे काही वेळा समुद्राच्या लाटा खूप उंच जातात आणि अशा स्थितीमध्ये महापूर येणे निश्चित आहे.

५. समुद्रामध्ये चक्रीवादळामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

६. ढग फुटीमुळे महापूर येण्याची शकत्या असते.

भारतामध्ये महापूर येण्याचे क्षेत्र (Flood Information in Marathi)

१. दक्षिण भारतामध्ये केरळ , आंद्र प्रदेश, तेलंगाना, तामीळनाडू हे महापुराचे प्रभावित क्षेत्र आहेत. समुद्रापासून जवळ असणारे हे प्रदेश समुद्रातील उंच लाटामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

२. मध्य भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली हे क्षेत्र प्रभावित आहे. येथे जास्त पावसामुळे नदिमध्ये जास्त पाण्यामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

३. पूर्व भारतामध्ये बंगालच्या खाडीजवळ असणारे प्रदेश जसे कि ओडिशा, आसाम आणि पश्चिम बंगाल खूप वेळा समुद्राच्या वादळामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

४. पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि दिव आणि दमन अरब समुद्राजवळ असल्यामुळे महापूर येण्याची शकत्या असते.

५. उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश अधिक पाऊस व ढग फुटीमुळे महापूर येण्याची शकत्या असते.

महापूर निबंध Mahapur essay in marathi 

या लेखाचा वापर करून आपण महापूर नावाच्या भयंकर संकटावर मराठीवर निबंध हि लिहू शकता. 

Kolhapur Sangli Mahapur Information in marathi

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2019 यावर्षी पावसाचा जोर होता. यामुळे कोल्हापूर मार्गे जाणार्‍या पंचगंगा नदीत आणि सांगलीतून जाणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्राव सुरु झाला.

कोयना धरण शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जवळपास १०३.०८ हजार दशलक्ष घनफूट (टीएमसीएफॅट) पाणी साठ्यात भरले गेले होते. तर कोल्हापुरातील वारणा धरण क्षमतेने भरले असून, त्यामध्ये ३४.०५ टीएमसीएफएफ पाणीसाठा भरला गेला.

तसेच उत्तर कर्नाटकातील (कोल्हापूरला लागून असलेल्या) अलमट्टी धरणातून सध्या सुरू असलेल्या अडीच लाख क्युसेक पाण्याचे विसर्जन सांगली आणि कोल्हापूरमध्ये करण्यात आले.

वरील दिलेल्या तीन प्रमुख कारणामुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पूर आला.

नुकसान:-

  • सांगलीत बचाव बोटीच्या काठी कोसळल्यानंतर नऊ जण बुडाळे.
  • कोल्हापुरातील तब्बल २२३ गावे बाधित झाली आहेत. त्यामध्ये १८ गावे पूर्णपणे तुंबळ झाली आहेत.
  • कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३८१३ घरे बाधित झाली असून त्यापैकी 89 घरे पूर्ण नुकसान झाले.
  • पूरग्रस्त भागातील तब्बल 390 पाणीपुरवठा योजना कामचुकार झाल्या.
  • तर दोन लाख लोक वीजविना होते.
  • कोल्हापूर जिल्ह्यात ६७००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा महापूर नावाचे भयानक संकट कसे आहे त्याची तीव्रता व त्याची जीवन काय आहेत. mahapur information in Marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही महापूर या संकटाविषयी अजून काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “महापूरा संबधी माहिती Mahapur Information In Marathi PDF”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!