Mahashivratri Information in Marathi महाशिवरात्री माहिती मराठी आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि आपल्या परंपरा जपल्या जातात त्यामधील एक महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री होय. महाशिवरात्री हा सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने आणि अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्री ह्या सणादिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते आणि त्या दिवशी उपवास देखील केला जातो. महाशिवरात्री हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये माघ कृष्ण चतुर्दशी च्या दिवशी साजरा करतात.
जर पुढे महाशिवरात्री काही दिवसातच असेल तर घरातील मोठी आणि अनुभवी लोक काशीखंड, शिवलिलामृत, महारुद्र या सारख्या पवित्र ग्रंथांचे पारायण करतात तर काही लोक महाशिवरात्री सणाच्या काही अगोदर गायन, भजन, कीर्तन यासारखे उपक्रम राबवतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याला बेल वाहली जाते.
त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो. काही लोक या दिवशी दिवस भर महादेवाचा जप (ओम नमं शिवा) करतात तर काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर १२ जोतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जातात.
या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदीरांमध्ये महादेवाची पंचोपर पूजा करून सस्तंग, भजन, कीर्तन आणि गायन या सारखे कार्यक्रम भक्तिभावाने राबवलेजातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतात. महाशिवरात्री मध्ये रात्रीच्या जागरणाला खूप महत्व आहे या दिवशी लोक रात्री जागरण करून आराधना करतात.
महाशिवरात्री माहिती मराठी – Mahashivratri Information in Marathi
महाशिवरात्री कशी साजरी करतात – how to celebrate mahashivratri
महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण असून या दिवशी भगवान शिवा म्हणजेच महादेव यांची पूजा केली जाते. या दिवशी लोक अगदी भक्ती भावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याला बेल वाहली जाते आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो.
काही लोक या दिवशी दिवस भर महादेवाचा जप (ओम नमं शिवाय) करतात तर काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर १२ जोतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जातात.
तसेच या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदीरांमध्ये महादेवाची पंचोपर पूजा करून सस्तंग, भजन, कीर्तन आणि गायन या सारखे कार्यक्रम भक्तिभावाने राबवले जातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतात.
महाशिवरात्रीची कथा – Mahashivratri Story in Marathi
प्रत्येक सण साजरा करण्यापाठीमागे काही तरी कथा असते तसेच महाशिवरात्री हा सण साजरा करण्यापाठीमागे देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते.
पहिली कथा
पौराणिक कथे मध्ये महाशिवरात्री या सणाविषयी असे सांगितले जाते कि ज्यावेळी समुद्र मंथन झाले होते त्यावेळी सृष्टी संबधित काही गोष्टींची निर्मिती झाली होती त्याच वेळी या समुद्र मंथनातून एक विष निर्माण झाले होते जे विष संपूर्ण पृथ्वीचा नाश करू शकत होते. आणि ज्यावेळी हे भगवान महादेवांना कळले.
त्यावेळी त्यांनी हे विष प्राशन करून सृष्टीचा नाश होण्यापासून वाचवले. ह्या विषाला संपवण्याची क्षमता फक्त महादेवाच्या कडे होती. परंतु महादेवांना हे विष प्रश्न केल्यानंतर त्यांच्या शरीराला दह होत होता आणि त्यांचे शरीर काळे निळे पडले होते. त्यावेळी इतर देवांनी देवांच्या वैद्याला बोलावले त्यावेळी वैद्यांनी महादेवांना रात्रभर जगण्यासाठी सांगितले.
इतर सर्व देवांनी महादेवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर नृत्य आणि गायन केले आणि याला आपण जागर म्हणतो हा जागर आजही महाशिवरात्रीच्या रात्री केला जातो आणि त्या रात्री भजन, कीर्तन, गायन यासाराखे विविध धार्मिक कार्यक्रम राबवून रात्रभर जागर केला जातो. असे म्हणटले जाते कि या दिवशी महादेवांना खूप दाह होत असल्यामुळे त्यांनी त्या रात्री तांडव नृत्य केले होते.
दुसरी कथा
अणखी एक पौराणिक कथा असे सांगते की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान महादेवाच्या प्रतीकांचा नैवेद्य एखाद्याला त्यांच्या पापांवर मात करण्यास आणि धार्मिकतेच्या मार्गावर प्रारंभ करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे व्यक्तीला कैलास पर्वतावर पोहचता येते आणि ‘मोक्ष’ प्राप्त होतो.
भारतातील विविध भागामध्ये महाशिवरात्री उत्सव कसा साजरा करतात – How to celebrate mahashivratri in different regions of India
मध्य प्रदेशमधील महा शिवरात्री – mahashivratri in madhya pradesh
मध्य प्रदेश मध्ये असणारे हिंदू भाविक हा सण मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. या सणाला मध्य प्रदेशमध्ये खजुराहोमध्ये एक शिवसागर टाकी आहे. ज्यामध्ये पवित्र स्नान करण्याची ही एक जुनी परंपरा मानली जाते आणि त्या टाकीजवळ एक सुंदर महादेव मंदिर आहे जिथे लोक महादेवाची पूजा करतात. मध्य प्रदेशमधील महा शिवरात्री सणाचे एक खास आणि मुख्य वैशिठ्य म्हणजे येथे हा सण ९ ते १० दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्र मधील महा शिवरात्री – how to celebrate mahashivratri in maharashtra
महाराष्ट्रामध्ये या सणादिवशी लोक अगदी भक्ती भावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याला बेल वाहली जाते आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो आणि त्या रात्री भजन, कीर्तन, गायन यासाराखे विविध धार्मिक कार्यक्रम राबवून रात्रभर जागर केला जातो.
जम्मू आणि काश्मीर मधील महाशिवरात्र – how to celebrate mahashivratri in jammu and kashmir
जम्म्मू आणि काश्मीर महाशिवरात्री हा सण खूप अनोख्या पध्दतीने साजरा केला जातो. या सणामध्ये लोक पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये अक्रोड भिजण घालतात आणि २ ते ३ दिवसांना ते अक्रोड प्रसाद म्हणून सर्व कुटुंबामध्ये वाटले जातात. या सणाच्या शेवटच्या दिवशी परिवारातील सदस्यांना भेट वस्तू दिल्या जातात आणि हा सण येथे २० ते २१ दिवस साजरा केला जातो.
पश्चिम बंगाल मधील महाशिवरात्री – how to celebrate mahashivratri in jammu and kashmir west bengal
पश्चिम बंगालमध्ये अगदी वेगळ्या आणि अनोख्या पध्दतीने महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी येथे वाळूपासून चार शिवलिंग किंवा मूर्ती बनवली जाते आणि ती महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या वेळेला कधी दुधाचा, कधी दहाचा, कधी तुपाचा आणि शेवटी मधाचा अभिषेक घालून पूजा केली जाते तसेच उपवास देखील केला जातो. दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करून उपवास सोडला जातो.
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा – wishes
- भगवान शिव यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत राहू दे,
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा.
- भगवान महादेव तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो,
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा.
- महा शिवरात्रीच्या शुभदिनी तुम्हाला भगवान शिव यांचे सर्वोत्तम आशीर्वाद लाभू देत,
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा.
आम्ही दिलेल्या mahashivratri information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महाशिवरात्री माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahashivratri information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about mahashivratri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mahashivratri story in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट