महिला बचत गट माहिती Mahila Bachat Gat Information in Marathi

Mahila Bachat Gat Information in Marathi – Bachat Gat Mahiti महिला बचत गट माहिती महिला बचत गट हा फक्त महिलांचा असतो या मध्ये १० ते १५ महिला असतात आणि त्या महिला त्यांची अल्प बचत असते ती एक सामान्य खात्यामध्ये टाकतात तसेच त्यांना कर्ज हवे असल्यास नाममात्र व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतात. बचत गट तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे सदस्यांमध्ये काटकसर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नंतरच्या टप्प्यावर काही प्रकारचे स्वयंरोजगार सुरू करण्याची शक्यता शोधणे आहे. तसेच हे सामुदायिक विकास वाढवण्याचा देखील प्रयत्न करते. महिला बचत गट हि कोणत्याही प्रकारची योजना नसून हा एक उपक्रम आहे.

ज्यामध्ये महिलांचा विकास करण्यासाठी काही धोरणे आखली जातात. महिला बचत गटामध्ये महिला आपली रोजची बचत करू शकतात आणि ज्यावेळी त्यांना कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी गटातील इतर महिलांची सहमती घेवून कर्ज घेवू शकतात. महिला बचत गटामुळे महिलांना काटकसर करण्याची सवय लागते आणि जर त्यांना कर्ज हवे असल्यास ते गटाद्वारे बँकेतून सुलभ रित्या मिळू शकते.  

mahila bachat gat information in marathi
mahila bachat gat information in marathi

महिला बचत गट माहिती – Mahila Bachat Gat Information in Marathi

नाव महिला बचत गट
गटातील महिलांची संख्या एक महिला बचत गटामध्ये १० ते १५ महिला असू शकतात.
गटाचे उदिष्ट महिलांचा विकास आणि आर्थिक मदत तसेच महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बँकेतील व्यवहाराबद्दल माहिती देणे.
वर्णन महिला बचत गट हा फक्त महिलांचा असतो या मध्ये १० ते १५ महिला असतात आणि त्या महिला त्यांची अल्प बचत असते ती एक सामान्य खात्यामध्ये टाकतात तसेच त्यांना कर्ज हवे असल्यास नाममात्र व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतात.

महिला बचत गट म्हणजे काय ?

गटातील महिलांचा आर्थिक विकास आणि फायद्यासाठी बनवलेला महिलांचा गट म्हणजे महिला बचत गट होय. महिला बचत गट हा फक्त महिलांचा असतो या मध्ये १० ते १५ महिला असतात आणि त्या महिला त्यांची अल्प बचत असते ती एक सामान्य खात्यामध्ये टाकतात तसेच त्यांना कर्ज हवे असल्यास नाममात्र व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतात.

महिला बचत गटाचे फायदे – benefits of mahila bachat gat 

  • महिला बचत गट जर सुरु केला तर महिलांना बँकेमध्ये चालणारे व्यवहार आणि बँकेमध्ये कशी प्रक्रिया असते या बद्दल काही माहिती मिळू शकते.
  • त्याचबरोबर या मुळे महिलांना रोजची बचत करण्याची सवय लागते.
  • महिला त्यांची अल्प बचत असते ती एक सामान्य खात्यामध्ये टाकू शकतात तसेच त्यांना कर्ज हवे असल्यास नाममात्र व्याजदराने बँकेकडून कर्ज घेवू शकतात.
  • जर गटातील एखाद्या महिलेला जर काही समस्या असेल तर ती महिला गटातील इतर महिलांशी या समस्येवर चर्चा करून तिची समस्या सर्व महिला मिळून सोडवू शकतात.
  • महिला बचत गटांना ग्राममयोग, नाबार्ड आणि डीआयसी या संस्थाच्या द्वारे अनेक योजना पुरवल्या जातात त्यामुळे महिलांचा विकास होऊ शकतो.
  • महिला बचत गट हा १० ते १५ महिलांचा असल्यामुळे त्या पापड, मेणबत्ती, लोणचे, मसाले या संबधित छोटे छोटे उद्योग करू शकतात आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला आर्थिक मदत होऊ शकते.
  • बचत गटामुळे महिलांना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो आणि यामुळे त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते.
  • महिला बचत गटामुळे महिला स्वावलंबी बनतात म्हणजेच तत्यांना आर्थिक मदतीसाठी कुटुंबावर अवलंबून राहावे लागत नाही.
  • महिलांसाठी सरकारद्वारे राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या विषयी माहिती मिळू शकते.
  • जर महिलांनी बचत गटाद्वारे कर्ज घेतले तर त्यांना इतर बँकांच्या तुलनेने खूप कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते.

महिला बचत गट कसा सुरु केला जातो ?

  • महिला बचत गात कसा सुरु करावा याबद्दल खाली माहिती दिलेली आहे.
  • सर्वप्रथम बचत ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका येथील एक भाग किंवा कार्यक्षेत्र निवडावे आणि त्या संबधित कार्यक्षेत्रातील महिलांना बचत गटाविषयी माहिती देऊन म्हणजेच बचत गट कसा काम करतो आणि बचत गटामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना कसा फायदा होतो.
  • तसेच त्यांना कर्ज कसे दिले जाते आणि त्याच्या आर्थिक विकासासाठी बचत गटाची मदत कशी होते हे समजावून सांगणे आणि महिलांना बचत गट सुरु करण्यास प्रोत्साहित करणे.
  • बचत गट हा फक्त महिलांचा असतो या मध्ये १० ते १५ महिला असतात.
  • बचत गटामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिला किती आहेत ते पाहणे आणि जर १० ते १५ महिला इच्छुक असतील तर त्यांचा एक गट बनवणे आणि जर त्याहून अधिक असतील तर प्रत्येक गटामध्ये १० – १० अश्या संख्येचा गट बनवणे.
  • महिला बचत गटातील सर्व महिलांची संमत्तीने एक वेळ ठरवून त्या वेळी एक बैठक घेतली जाते आणि त्यावेळी बचत गटाविषयी माहिती देणे.
  • त्याचबरोबर बैठकीच्या वेळी बचतीची रक्कम ठरवली जाते आणि हि प्रत्येक महिलेच्या संमतीने ठवली जाते.
  • त्यानंतर गटासाठी बँकेमध्ये एक बचत खाते उघडले जाते आणि त्यामध्ये सर्व महिलांची बचतीची रक्कम जमा केली जाते. (बचतीची रक्कम हि आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा बचत म्हणून बँकेमध्ये जमा केली जाते).
  • अश्या प्रकारे महिला बचत गट सुरु केले जाते आणि काही दिवसांनी नाममात्र व्याजदराने बँकेकडून कर्ज घेता येते.
  • तसेच महिला बचत गटाच्यामार्फत पापड, मेणबत्ती, लोणचे, मसाले या संबधित छोटे छोटे उद्योग सुरु करू शकतात आणि त्यामुळे गटातील प्रत्येक महिलेला आर्थिक मदत होऊ शकते.

बचत गटाचे नियम – rules 

  • महिला बचत गट जेंव्हा सुरु केला जातो त्या वेळी त्या गटातील महिला हि गावातील असावी गावाबाहेरील नसावी.
  • ज्यावेळी गटाची बैठक किंवा मिटिंग असते त्यावेळी गटातील सर्व महिला सदस्यांनी हजर असणे आवश्यक असते.
  • गावातील एक बचत गट गावातील दुसऱ्या बचत गटाला कर्ज देवू शकतो.
  • जर एखादी महिला सदस्य बैठकीसाठी हजार राहणार नसेल तर तिने बैठकीच्या अगोदर तशी परवानगी घेवून ती गैरहजर राहू शकते.
  • गटामध्ये कर्ज घेण्यासाठी एक रक्कम ठरवलेली असते आणि जर एखाद्या महिलेला त्यापेक्षा अधिक कर्ज घ्यायचे असेल तर गटातील आणि २ महिलांचे जामीन होणे आवश्यक असते.
  • पहिला काढलेले कर्ज पूर्णपणे भरल्याशिवाय महिलांना दुसरे कर्ज काढता येत नाही.
  • बचत गट हा १० किंवा १५ महिलांचा असतो आणि या गटामध्ये १८ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला सहभागी होऊ शकतात.

आम्ही दिलेल्या mahila bachat gat information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महिला बचत गट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bachat gat mahiti marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahila bachat gat government schemes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bachat gat mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

3 thoughts on “महिला बचत गट माहिती Mahila Bachat Gat Information in Marathi”

    • प्रतिसादाबद्दल धन्यवाद
      त्रास देतायेत म्हणजे नेमक काय करतायेत ? त्यांची पण बाजू ऐकून घ्यायला हवी त्यांची बाजू चुकीची असेल तर तुम्ही बचत गटांच्या इतर सदस्यांना हि कल्पना द्या आणि तेही करून तुमचा प्रोब्लेम सुटत नसेल तर सरळ एक पत्र लिहा तुम्हाला बचत गटामध्ये राहायचे नाही आणि खाते अथवा तुमचे नाव कमी करायचे आहे पण हे करण्यापूर्वी तुमचे सर्व व्यवहार पूर्ण असायला हवेत उदाहरणार्थ: कर्ज

      उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!