हिरवळीचे खत माहिती Manuring Information in Marathi

manuring information in marathi हिरवळीचे खत माहिती, मृत वनस्पती आणि कुजलेल्या प्राण्यांच्यापासून खत तयार होते आणि आज आपण या लेखामध्ये खत कसे तयार होते आणि त्याचा वापर कश्यासाठी होतो याबद्दल खाली आपण माहिती घेणार आहोत. नैसर्गिक रित्या तयार झालेले खत हे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि चांगले उत्पादन काढण्यासाठी केले जाते आणि या खताला सेंद्रिय खत किंवा हिरवळीचे खत म्हणून देखील ओळखले जाते आणि हिरवळीचे खत हे एक असे एक सेंद्रिय खत आहे.

जे वनस्पती, फुले, माती आणि भाज्यांना अनेक पोषक तत्वे देण्यास कार्यक्षम असतात. हिरवळीचे खत हे बहुतेकदा वनस्पतीचा पाला हा जमिनीमध्ये गाडला जातो आणि तो काही दिवसांनी कुजल्यानंतर त्याचे खत बनते या खताला हिरवळीचे खत म्हणून ओळखले जाते.

आणि या प्रकारचे खत हे मोठ्या प्रमाणात ताग या पिकापासून केले जाते म्हणजे हे शेतामध्ये लाऊन ते थोडे मोठे आल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडतात आणि त्याचे खत बनवतात त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते आणि उत्पादन देखील चांगले येते.  

manuring information in marathi
manuring information in marathi

हिरवळीचे खत माहिती – Manuring Information in Marathi

नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत मिळणारे स्त्रोत – Resources

हिरवळीचे खत किंवा सेंद्रिय खत हे वेगवेगळ्या स्त्रोतांच्याकडून मिळते आणि ती वेगवेगळी स्त्रोत कोणकोणते आहेत, ते खाली आपण पाहणार आहोत.

 • मृत वनस्पती आणि कुजलेल्या प्राण्यांच्यापासून या प्रकारचे खत तयार होते.
 • तसेच गुरांचे किंवा जनावरांचे शेण आणि मुत्र या पासून देखील हे खत बनवले जाते.
 • कत्तलखाण्यातील कचरा जसे क मांस, हाडे इत्यादी पासून देखील हे खत तयार होते.
 • मेढ्यांचे किंवा शेळीच्या विष्ठा तसेच कुकुटपालन मध्ये तयार होणारे खत.

नैसर्गिक खताचे फायदे – manuring benefits in marathi

 • शेतामध्ये जर हिरवळीच्या खताचा वापर केला तर त्यामुळे पोषक तत्वांनी युक्त माती तयार होण्यास मदत होते.
 • हिरवळीचे खत हे जमिनीसाठी तसेच एकूण पर्यावरणासाठी अनुकूल मानले जाते.
 • सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खते उत्पादन चांगले येण्यासाठी वापरले जाते परंतु रासायनिक खतांचा वापर करून काढलेले पिक हे आपल्या आरोग्यास देखील हानिकारक असू शकते तसेच त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील कमी होते परंतु या उलट जरी शेतामध्ये हिरवळीचे खत वापरले तर त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढते आणि येणारे पिक देखील चांगल्या दर्जाचे असू शकते.
 • हिरवळीच्या किंवा सेंद्रिय खताचा वापर जर शेतामध्ये केला तर जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवण्यासाठी मदत होते आणि पिकाला चांगल्याप्रकारे पाण्याचा पुरवठा होतो.
 • शेतामध्ये नैसर्गिक खत म्हणजेच शेणखत किंवा हिरवळीचे खत वापरले तर मातीची धूप कमी होण्यास मदत होते.
 • जमिनीमधील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे जमीन सुधारते
 • नैसर्गिक खताचा वापर केल्यामुळे जमिनीमधील पोषक घटकांची वाढ होण्यास मदत होते.
 • या प्रकारचे खत हे बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला समर्थन देते जे सेंद्रिय पदार्थांचे बुरशीमध्ये विघटन करतात.
 • जर शेतीसाठी या खताचा वापर केला तर त्यामुळे मातीमधील एडाफिक हा घटक वाढण्यासाठी मदत होते.
 • खतापासून मिथेन हा उपपदार्थ तयार होतो आणि हा उपपदार्थ स्वयंपाक घरामध्ये आणि घरामध्ये उपयोगी ठरू शकतो.
 • खत हे जमिनीसाठी महत्वाचे आहे कारण हे नायट्रोजन आणि फॉस्फेटसह वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा स्त्रोत आहे आणि नैसर्गिक खतांचा वापर करून शेतकरी पैसे वाचवू देखील शकतात आणि पैसे कमवू देखील शकतात.
 • जर शेतामध्ये कंपोस्ट खताचा नियमित वापर केला तर जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरावे लागत नाही
 • अन्नाच्या कचऱ्याचे कंपोस्टिंग मध्ये रुपांतर करून आपण मौल्यवान पोषक द्रव्ये मातीला परत देऊ शकत.

नैसर्गिक खताचे प्रकार – types

नैसर्गिक खत हे वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेल आहे, जसे कि हिरवळीचे खत किंवा वनस्पतीच्या पाल्याचे खत, शेणखत. खाली आपण नैसर्गिक खताचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत.

शेणखत

शेणखत ही जनावरांच्यापासून मिळते आणि या खतामुळे जमिनीची रचना सुधारण्यास मदत होते आणि त्यामुळे या खताचा वापर शेतामध्ये केला जातो. या खताचा वापर जर शेतामध्ये केला तर यामुळे मातीमधील पोषक द्रव्यांची वाढ होण्यासाठी मदत होते आणि जमिनीमधील ओलसरपणा देखील टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.

कंपोस्ट खत

कंपोस्ट हे पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थाचे मिश्रण आहे ज्याचा वापर माती समृध्द आणि चांगली तत्व युक्त माती बनवण्यासाठी केला जातो. कंपोस्ट खत हे सामान्यता झाडे, अन्न कचरा आणि इतर सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाणे बनवले जाते.

कंपोस्ट खत हे मातीला फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियां या सारख्या तत्वांचा पुरवठा करते. कंपोस्ट खत हे एक सेंद्रिय खत आहे जे मातीला पोषक तत्वे पुरवते आणि त्यामुळे शेतामधील पिक चांगले होण्यास मदत होते.

हिरवे खत

हिरवे खत हे वनस्पती जमिनीमध्ये गाडल्यामुळे तयार होते आणि या हिरवळीच्या खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची टक्केवारी वाढण्यास मदत होते तसेच यामुळे तणांचे दडपण आणि मातीची धूप देखील कमी होण्यास मदत होते.

ताग ही हिरव्या खताचा एक प्रकार आहे कारण हे शेतामध्ये लावले जाते आणि थोडे मोठे आल्यानंतर ते शेतामध्ये गाडले जाते आणि ते कुजल्यानंतर त्याचे खत बनण्यास मदत होते.

आम्ही दिलेल्या manuring information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हिरवळीचे खत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Organic manuring information in marathi या Green manuring information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about manuring in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Manuring meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!