मातीच्या भांड्यांची माहिती Matichi Bhandi Information in Marathi

matichi bhandi information in marathi मातीच्या भांड्यांची माहिती, सध्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी जेवण बनवण्यासाठी वापरली जात असली तरी पूर्वीच्या काळी प्राचीन भारतामध्ये वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरली जात होती आणि काही ठिकाणी भारताच्या काही ग्रामीण भागामध्ये या प्रकारची भांडी जेवण्यासाठी वापरतात जसे कि ताट, वाटी पाणी पिण्यासाठी ग्लास. आपण सध्या देखील अनेकांच्या घरी पाहतो कि उन्हाळ्यामध्ये पाणी गार ठेवण्यासाठी मातीचा माठ वापरला जातो.

आज आपण या लेखामध्ये मातीची भांडी कशी बनतात आणि त्याचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी होतो या विषयी खाली आपण सविस्तर माहिती पाहूया. मातीच्या भांड्यांचा वापर हा खूप पूर्वीच्या काळी केला जात होता आणि हि भांडी माती आणि काही इतर कच्च्या मालापासून बनवली जात होती आणि ती भट्टीमध्ये भाजून त्यांना कठोर बनवले जात होते.

मानवाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले होते आणि मातीच्या भांड्यांचा शोध देखील सर्वात जुन्या शोधापैकी एक आहे. काळी माती हि मातीपासून बनवली जाते आणि हि भांडी बनवण्यासाठी काही ठिकाणी काळी माती वापरली जाते आणि काही ठिकाणी लाल माती वापरली जाते आणि हे तेथील उपलब्धतेवर आधारित असते.

matichi bhandi information in marathi
matichi bhandi information in marathi

मातीच्या भांड्यांची माहिती – Matichi Bhandi Information in Marathi

मातीची भांडी कशी बनवली जातात ?

मातीची भांडी बनवताना प्रथम मातीचा चिखल बनवला जातो आणि चिखल आकार देता येण्यासारखा बनवला जातो आणि मग या चिखलापासून भांड्यांचा आकार दिला जातो आणि मग ती तोडी सुकवली जातात आणि कडक आणि मजबूत बनण्यासाठी ती भट्टीमध्ये भाजली जातात.

मातीच्या भांड्यांचे फायदे – benefits

मातीची भांडी हि जेवणासाठी पूर्वी वापरली जात होती परंतु जसे जसे जग बदलत केले किंवा विकसित होत गेले तेंव्हापासून मातीच्या भांड्यांचा वापर हा कमी कमी होत गेला परंतु आपण जी नॉनस्टिक भांडी वापरतो ती आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. खाली आपण मातीच्या भांड्यांचे वापर आणि वेगवेगळे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत.

 • सध्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात जेवणामध्ये होत आहे परंतु पूर्वी मातीच्या भांड्यांच्यामध्ये बनवलेले अन्न हे जास्त तेलकट होत नव्हते कारण जेवणामध्ये जास्त झालेले तेल भांड्यामध्ये शोषले जात होते त्यामुळे अन्न जास्त प्रमाणात तेलकट होत नव्हते.
 • मातीच्या भाड्यातील अन्न शिजण्यासाठी वेळ लागत असला तरी या मधील पौष्टिकता निघून जात नव्हती परंतु सध्याच्या भांड्यामध्ये लवकर अन्न शिजते परंतु पौष्टिकता निघून जाते.
 • मातीची भांडी हि पर्यावरण पूरक आहेत म्हणजेच हि भांडी बनवण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही.
 • मातीमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि इतर काही घटक असतात आणि मातीची भाडी हि लाल किंवा काळ्या मातीपासून बनवलेली असतात आणि मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळे त्यामधील अंश हे अन्नामध्ये उतरतात.
 • मातीची भांडी हि नॉनस्टिक भांडयापेक्षा परवडणाऱ्या दरामध्ये मिळतात आणि हि वेगवेगळ्या आकर्षक आकारामध्ये देखील मिळतात.
 • मातीपासून ताट, वाटी, ग्लास, वेगवेगळ्या आकाराची भांडी, पाण्याचे माठ, जग या सारखी अनेक भांडी बनवली जातात.
 • मातीच्या भांड्यामध्ये बनवलेल्या अन्नाला एक वेगळीच नैसर्गिक चव येते.
 • मातीच्या भांड्यामध्ये बनवलेले अन्न जास्त वेळ टिकून राहते म्हणजेच ते खराब होत नाही आणि तसेच यामध्ये अन्न जास्त वेळ गरम राहण्यासाठी देखील मदत होते.
 • आपण नॉनस्टिकच्या भांड्यातील अन्न सतत गरम करतो परंतु मातीच्या भांड्यातील अन्न सतत गरम करावे लागत नाही.

मातीच्या भांड्यांच्या विषयी तथ्ये आणि माहिती – matichi bhandi name in marathi

 • सध्या मातीच्या भांड्याचा जास्त वापर हा पाणी गार ठेवण्यासाठी किंवा मग दही लावण्यासाठी केला जातो.
 • आजच्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात नॉनस्टिकच्या भांड्याचा वापर होत असला तरी अनेकजण मातीच्या भांड्यांच्यामध्ये जेवण करून खाण्याकडे वळत आहे म्हणजेच ते अन्न बनवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करत आहेत.
 • जर तुम्हाला अन्न बनवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करायचा असेल तर त्यावेळी बाजारातून भांडी विकत आणताना ती जास्त डिझाईन असलेली घेऊ नयेत आणि घेताना भांड्यांचा तळ तपासून घ्यावा नाही तर अन्न बनवताना जास्त उष्णता लागल्यामुळे भाड्याला तडा जाऊ शकतो.
 • मातीच्या भांड्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवू शकता.
 • दुध आणि दुधापासून बनणारे पदार्थ ठेवण्यासाठी मातीची भांडी अगदी योग्य आहेत.
 • भारतामध्ये सर्व ठिकाणी मातीची भांडी बनवत असले तरी राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी मिळणारे मातीच्या भांड्यांचे आकार हे खूप आकर्षक आणि मनमोहक असतात.
 • मातीच्या भांड्यांना आरोग्यास परिपूर्ण मातीची भांडी म्हटले तर काहीच हरकत नाही कारण हि आरोग्य फायदे देण्यास मदत करतात आणि यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
 • पूर्वी मातीच्या भांड्याच्या वापरामुळे लोक जास्त प्रमाणात आजारी देखील पडत नव्हते.

मातीची भांडी प्रथम वापरताना घ्यावयाची काळजी ?

ज्यावेळी मातीची भांडी कोणत्याही स्वयंपाक वापरासाठी घेणार असाल तर ती बाजारातून आणल्यानंतर फक्त पाण्याने धुवून घेऊ नयेत तर हि भांडी २४ तासासाठी पाण्यामध्ये बुडूवून ठेवली पाहिजेत आणि मग ती २४ तासानंतर पाण्यामधून काढून ती परत चांगल्या पाण्याने धुवून ती कोरड्या कपड्याने पुसून कोरडी केली पाहिजेत.

आणि मग त्यामध्ये तेल घालून त्यामध्ये थोडेसे काही करून बघितले पाहिजे आणि मग ते भांडे परत पाण्याने धुवून ठेवले पाहिजे. आता तुम्ही त्या भांड्यामध्ये कोणतेही अन्न बनवू शकता.

आम्ही दिलेल्या matichi bhandi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मातीच्या भांड्यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Matichi bhandi information in marathi wikipedia या matichi bhandi name in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about matichi bhandi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!