MBA Information in Marathi – MBA Full Form in Marathi एमबीए कोर्स विषयी माहिती एमबीए हा एक शिक्षणातील भाग आहे जो आंतरराष्ट्रीय स्थरावर मान्यताप्राप्त असलेला एक पदवीधर अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवसाय व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल शिकवले जाते किंवा व्यवसायाच्या संबधित कौशल्यांनी तयार केले जाते. ज्यावेळी अमेरिका हा देश २० व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा हा देश औद्योगिकीकरणामध्ये उंच शिखर गाठतं होता त्यावेळी औद्योगिकीकरणामध्ये व्यवसाय व्यवस्थापन करणे आवश्यक होते.
हीच गरज लक्षात घेवून अमेरिका या देशाने एमबीए (MBA) चा प्रथम कार्यक्रम चालू केला. व्यवसाय व्यवस्थापना करणाऱ्यासाठी कौशल्य असणाऱ्या व्यक्तीची व्यवसायामध्ये असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेमध्ये सर्वप्रथम व्यवसाय शाळा सुरु करण्यात आली आणि त्यानंतर काही वर्षातच एमबीए (MBA) हा पदवीधर कोर्स लोकप्रिय झाला.
एमबीए (MBA) पदवीधर व्यक्ती फक्त व्यावसायिक क्षेत्रामध्ये महत्वाचे नाही तर हे खाजगी उद्योग तसेच आपल्या इतर क्षेत्रांमध्ये देखील एमबीए (MBA) ला खूप महत्व आहे. सध्या एमबीए (MBA) हा पदवीधर कोर्स जगातील सर्वात लोकप्रिय कोर्स पैकी एक बनला आहे आणि या कोर्सचे सध्या जगभरामध्ये २००० हून अधिक कार्यक्रम राबवले जातात.
एमबीए (MBA) या अभ्यासक्रमा मध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन (specialization) असतात ती म्हणजे मार्केटिंग (marketing), फायनान्स (finance), एचआर (human resource management), प्रोडक्शन (production), सप्लाय चेन मॅनेजमेंट (supply chain management), ऑपरेशन (operation), agricultural (अॅग्रीकल्चरल), स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (strategic management).
विद्यार्थी अभ्यासक्रमा मध्ये एमबीए ड्युअल स्पेशलायझेशनचा देखील अभ्यास करू शकतात ज्यामुळे त्यांची व्यवस्थापन क्षमता आणि जॉब मार्केट अष्टपैलुत्व वाढविण्यास मदत करते.
MBA कोर्स विषयी माहिती – MBA Information in Marathi
शिक्षण | एमबीए (MBA) |
एमबीए चे पूर्ण रूप | मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (master of business administration). |
कोर्सचा कालावधी | २ वर्ष |
पात्रता | विद्यार्थ्यांनी वाणिज्य, कला किंवा विज्ञान यामधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलेले असावे. |
प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी मार्क | ५० ते ५५ टक्के |
एमबीए चा लॉंग फॉर्म काय आहे – MBA Full Form in Marathi
एमबीए (MBA) म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन Master of Business Administration.
एमबीए म्हणजे काय ?
MBA meaning in marathi एमबीए (MBA) हा पदवीधर कोर्सचे पूर्ण रूप मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (master of business administration) असे आहे आणि हे एक असे शिक्षण क्षेत्र आहे ज्यामध्ये व्यवसाय कसा चालवायचा तसेच व्यवसायामधील वेगवेगळे व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल सर्व माहिती दिली जाते किंवा विद्यार्थ्यांना तयार केले जाते.
एमबीए (MBA) विषयामध्ये मार्केटिंग (marketing), फायनान्स (finance), एचआर (human resource management), प्रोडक्शन (production), सप्लाय चेन मॅनेजमेंट (supply chain management), ऑपरेशन (operation), agricultural (अॅग्रीकल्चरल), स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (strategic management) समाविष्ट असतात.
- नक्की वाचा: नेट सेट परीक्षा माहिती
एमबीए हे शिक्षण का घ्यावे
why study MBA हा एक सामान्य प्रश्न आहे जो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतो कि आपण एमबीए ( MBA ) का करावे आणि त्यापासून आपल्याला काय फायदे आहेत आणि ते आपल्या करिअर साठी कसे चांगले ठरू शकेल. एमबीए ( MBA ) हा कोर्स ग्रॅज्यूएशन नंतर केला जाणारा कोर्स आहे जो कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी म्हणजेच वाणिज्य, कला किंवा विज्ञान क्षेत्रातील लोक करू शकतात.
व्यवस्थापन कौशल्य विकसित करते
एमबीए (MBA) हा अभ्यास क्रम व्यवसाय आणि व्यवसायाविषयी व्यवस्थापन करण्यासाठी सुरु केला आहे. व्यवस्थापन कौशल्य विकसित करणे हे एमबीए (MBA) चे मुख्य उदिष्ट आहे.
वेगवेगळ्या विषयांमधून आपल्याला ते करता येते
एमबीए (MBA) हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपल्याला खूप काही शिकता येते. तसेच या कोर्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांमधून करता येते जसे कि मार्केटिंग (marketing), फायनान्स (finance), एचआर (human resource management), ऑपरेशन (operation), प्रोडक्शन (production). तसेच आपण एमबीए (MBA) मध्ये ड्युअल स्पेशलायझेशनचा देखील करू शकता ज्यामुळे तुमची व्यवस्थापन क्षमता आणि जॉब मार्केट अष्टपैलुत्व वाढविण्यास मदत करते.
उद्योजक संधी
एमबीए (MBA) ह्या शिक्षण अभ्यासामध्ये आपण व्यवसाय व्यवस्थापन तसेच व्यवसाय कसा करायचा या बद्दलची कौशल्ये आपण आपल्यामध्ये तयार करू शकतो आणि हि कौशल्ये आपल्याजवळ असल्यामुळे आपण आपला स्वताचा व्यवसाय सुरु करू शकतो.
उच्च पगार
एमबीए (MBA) हि डिग्री आपल्या हातामध्ये असल्यामुळे आपल्याला चांगल्या कापनिमध्ये जॉब मिळू शकतो आणि जर चांगला जॉब मिळाला तर उच्च पगार देखील मिळू शकतो.
- नक्की वाचा: एम फिल कोर्स कसा करावा ?
एमबीए साठी लागणारी पात्रता – eligibility
एमबीए शिक्षणासाठी प्रवेश करताना लागणारे निकष हे कॉलेज ते कॉलेज बदलतात. काही सामान्य निकष जे सर्वच कॉलेज मध्ये सारखेच असतात.
- एमबीए हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य, कला किंवा विज्ञान यामधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलेले असावे.
- जे पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असतात त्यांना त्यांच्या महाविद्यालयातून तात्पुरते प्रमाणपत्र सादर करावे लागते.
- ओबीसी, एससी आणि एसटी सारख्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काही एमबीए महाविद्यालयांमध्ये सांगितलेल्या टक्केवारीत ५ टक्के सूट मिळते.
- पदावितील शेवटच्या परीक्षेचे गुण कमीत कमी ५० टक्के असावेत आणि ज्यांनी आयआयएम आणि आयआयटीसारख्या संस्थांमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे त्यांना किमान ६० टक्के गुण असावे लागतात.
- एमबीए (MBA) हा एक हा कोर्स आहे ज्यामध्ये वाणिज्य, कला किंवा विज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
- यामध्ये विद्यार्थी पूर्ण वेळ, अर्धवेळ किंवा ऑनलाईन या तिन्ही प्रकारे हि पदवी घेवू शकतात. परंतु यामधील पूर्ण वेळ एमबीए (MBA) चे शिक्षण घेणे हा प्रकार शिक्षण संस्थेमध्ये आणि आपण ज्यावेळी नोकरी शोधतो त्यावेळी फायद्याचा ठरतो आणि या प्रकाराला इतर प्रकारांपेक्षा विशेष महत्व आहे.
- एमबीए (MBA) हा शिक्षण प्रकार मुख्यता व्यवसाय व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेला एक अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम आहे.
- एमबीए (MBA) हे शिक्षण किंवा कोर्स २ वर्षाचा असतो ज्यामध्ये चार किंवा सहा सेमेस्टर असे परीक्षेचे स्वरूप असते.
एमबीए स्पेशलायझेशन विषय
मार्केटिंग मॅनेजमेंट (marketing management) | एचआर मॅनेजमेंट (human resource management) |
फायनान्स मॅनेजमेंट (finance management) | प्रोडक्शन मॅनेजमेंट (production management) |
अॅग्रीकल्चरल मॅनेजमेंट (agricultural management) | सप्लाय चेन मॅनेजमेंट (supply chain management) |
ऑपरेशन मॅनेजमेंट (operation management) | हेल्थ केअर मॅनेजमेंट (health care management) |
स्पोर्ट्स मॅनेजमेंट (sports management) | रुरल मॅनेजमेंट (rural management) |
एमबीए पदवी घेण्याचे प्रकार – types
- पूर्ण वेळ एमबीए – full time MBA.
- अर्ध वेळ एमबीए – part time MBA.
- ऑनलाईन एमबीए – online MBA.
यामध्ये विद्यार्थी पूर्ण वेळ, अर्धवेळ किंवा ऑनलाईन या तिन्ही प्रकारे हि पदवी घेवू शकतात. परंतु यामधील पूर्ण वेळ एमबीए ( MBA ) चे शिक्षण घेणे हा प्रकार शिक्षण संस्थेमध्ये आणि आपण ज्यावेळी नोकरी शोधतो त्यावेळी फायद्याचा ठरतो आणि या प्रकाराला इतर प्रकारांपेक्षा विशेष महत्व आहे.
वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, एम बी ए डिग्री mba information in marathi language कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत तसेच एम बी ए ची तयारी कशी करावी या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे.
MBA full information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच mba education information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही एम बी ए डिग्रीविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या information about mba in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही mba meaning in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट