मेहरानगढ़ किल्ला माहिती Mehrangarh Fort Information in Marathi

mehrangarh fort information in marathi मेहरानगढ़ किल्ला माहिती, मेहरानगड हा किल्ला भारताच्या राजस्थान या राज्यातील जोधपुर या शहरामध्ये वसलेला एक प्राचीन किल्ला आहे आणि आज आपण या लेखामध्ये मेहराणगड या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. मेहरानगड हा किल्ला राजस्थान या राज्यातील जोधपुर या शहरामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती इ. स. १४५९ मध्ये राव जोधा यांनी बांधला आहे. मेहरानगड हा किल्ला जोधपुर शहराच्या बाहेर एका १२५ मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे.

आणि या किल्ल्यावरून आपल्याला संपूर्ण जोधपुर शहराच्या दृश्याचा आनंद घेता येतो आणि ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला राजवाडे, मंदिरे, संग्रहालय आणि काही इतर ठिकाणे देखील पहायला मिळतात तसेच या किल्ल्याला अजिंक्य अशी सहा मीटर जाड असणारी तटबंदी देखील आहे.

mehrangarh fort information in marathi
mehrangarh fort information in marathi

मेहरानगढ़ किल्ला माहिती – Mehrangarh Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावमेहरानगड किल्ला
ठिकाणराजस्थान या राज्यातील जोधपुर या शहरामध्ये वसलेला आहे
निर्मितीइ.स १४५९
निर्माताराव जोधा
प्रकारटेकडी किल्ला

मेहरानगड किल्ल्याची निर्मिती कोणी आणि केंव्हा झाली ?

मेहरानगड हा किल्ला राजस्थानमधील जोधपुर या शहरातील प्रसिध्द किल्ला आहे आणि हा किल्ला इ.स १४५९ मध्ये राव जोधा यांनी बांधला आहे.

मेहरानगड किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about mehrangarh in marathi

मेहरानगड या किल्ल्यावर राजपुताना स्थापत्यशैलीचे बांधकाम आहे आणि हा किल्ला इ.स १४५९ मध्ये राव जोधा यांनी बांधला आहे. गडावर एकूण ७ प्रवेश दरवाजे आहेत आणि हे दरवाजे वेगवेगळ्या शासकांनी बांधलेले आहेत आणि हे १५ शतकाच्या मध्यापासून २० व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजेच ५ शतकांच्या कालावधीमध्ये बांधले आहेत.

त्याचबरोबर या किल्ल्याची तटबंदी जाड आहे आणि हि तटबंदीची रचना ११७ फुट लांब आणि ७० फुट रुंद आहे आणि या तटबंदीची उंची १२० फुट आहे. या किल्ल्यामध्ये आपल्याला शिश महाल, तख्त महाल, मोती महाल, झेनाडा महाल, फुल महाल या सारखे राजवाडे आहेत तसेच या ठिकाणी चुनडी देवी मंदिर आहे आणि या ठिकाणी संग्रहालय देखील आहे.

मेहरानगड किल्ल्याचा इतिहास – mehrangarh fort history in marathi

मेहरानगड हा किल्ला जोधपुर शहराची निर्मिती करणारा आणि मंडोराचा शासक म्हणून ओळखला जाणारा राव जोधा याने इ.स १४५९ निर्माण केला आणि त्याने लोकांना इतर राजकर्त्यांच्यापासून आणि परकीय आक्रमणापासून किल्ल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मेहरानगड हा किल्ला १२५ मीटर उंच असणाऱ्या टेकडीवर बांधला.

या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळची आख्यायिका अशी आहे कि टेकडीवर चीरीया नाथाजी नावाचा एक संन्यासी राहत होता आणि त्याला त्या टेकडीवरून बळजबरीने स्थलांतरित केले त्यावेळी त्या संन्याश्याने शाप दिला होता आणि संयाश्याने असा शाप दिला होता कि या किल्ल्याला नेहमी पाण्याची टंचाई किंवा तुटवडा भासेल पण त्याच्या या शापाकडे त्यावेळी शासक राव जोधा याने फारसे लक्ष दिले नाही.

तर त्याकडे दुर्लक्ष केले परंतु काही काळ सरल्यानंतर त्या शापाचे सत्यात रुपांतर केले त्यावेळी राव जोधा याने या शापातून मुक्त होण्यासाठी आणि संन्याश्याला शांत करण्यासाठी किल्ल्यावर एक मंदिर आणि घर बांधले.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – what to see in the fort

  • प्रवेश दरवाजे : मेहरानगड या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत आणि हे सात दरवाजे या किल्ल्यावर वेगवेगळ्या शासकांनी बनवलेले आहेत आणि त्यामधील एक दरवाजा हा जयपोल आहे आणि हा एक प्रसिध्द दरवाजा आहे जो महाराजा मानसिंग यांनी १८०६ मध्ये बांधला आहे.
  • मेहरानगड संग्रहालय : या किल्ल्यावर आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तू आणि अनेक ऐतिहासिक चिन्हे आपल्याला पहायला मिळतील आणि तसेचा आपल्याला या किल्ल्यामध्ये संग्रहालय देखील पहायला मिळते आणि या संग्रहालयामध्ये पूर्वीची काही शस्त्रे जी वेगवेगळ्या शासकांनी वापरली असतील त्याचबरोबर अनेक वेगवेगळे शाही पध्दतीचे पाळणे, प्राचीन पोशाख, वाद्ये, चित्रांचा संग्रह आणि काही अनेक प्राचीन वस्तू पाहायला मिळतील.
  • राजवाडे : कोणत्याही किल्ल्यामध्ये काही राजवाडे असतात जे तेथील शासकांच्या निवासाचे ठिकाण असते तसेच मेहरानगड या किल्ल्यावर देखील काही राजवाडे आहेत आणि त्यामधील काही मुख्य आणि लोकप्रिय राजवाडे म्हणजे शिश महाल किंवा राजवाडा, मोती महाल, तख्त विलास, फुल महाल आणि झांकी महाल.
  • मंदिरे : या किल्ल्यामध्ये दुर्गा देवीला आणि एखाद्या शासकाच्या कुलदेवतेला समर्पित मंदिरे आहेत आणि ती म्हणजे चामुंडी देवी मंदिर आणि नागनेचीयाजी मंदिर.

किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • मेहरानगड गड या किल्ल्याला एकूण ७ प्रवेश दरवाजे आहेत आणि हे प्रवेश दरवाजे किल्ल्यावर राज्य करणाऱ्या वेगवेगळ्या शासकांनी बांधले आहेत.
  • मेहरानगड हा किल्ला पाच किलो मीटर परिसरामध्ये पसरलेला आहे.
  • या किल्ल्याच्या टेकडीवर चीरीया नाथाजी नावाचा एक संन्यासी राहत होता आणि त्याला त्या टेकडीवरून बळजबरीने स्थलांतरित केले त्यावेळी त्या संन्याश्याने शाप दिला होता.
  • मेहरानगड या किल्ल्यावर राजपुताना स्थापत्यशैलीचे बांधकाम आहे आणि हा किल्ला इ. स. १४५९ मध्ये बांधला आहे.
  • या किल्ल्याबद्दल असे देखील म्हटले जाते कि किल्ल्याच्या पायामध्ये राजा राम मेघवाल नावाच्या सामान्य माणसाला जिवंत पुरले होते.

टिप्स – tips

  • मेहरानगड हा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत खुला असतो.
  • मेहरानगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकाराला जात नाही तर किल्ला आपण विनामूल्य पाहू शकतो.

आम्ही दिलेल्या mehrangarh fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेहरानगढ़ किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mehrangarh fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mehrangarh fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!