बाजरी बद्दल माहिती Millet In Marathi

Foxtail Millet In Marathi – Bajra Information in Marathi बाजरीची माहिती मराठी बहुतांश लोकांना प्रमुख अन्न म्हणजे बाजरीची भाकरी. भारतात बाजरी हे एक प्रमुख पीक आहे. गहू, मका, व ज्वारी यांच्या खालोखाल बाजरीचा वापर होतो. हिंदूंच्या धार्मिक सणामध्ये बाजरीला खूप महत्त्व दिले जाते.

millet in marathi
millet in marathi

बाजरी बद्दल माहिती – Millet in Marathi

मराठी नावबाजरी
शास्त्रीय नावPennisetum glaucum
पेरणी हंगाम खरीप (जून ते जुलै), उन्हाळी (फेब्रुवारी ते मार्च )
धान्याचा प्रकारतृणधान्य

बाजरी – millet meaning in marathi

What is Millet in Marathi बाजरी हे एक प्रकारचे तृणधान्य कमी पर्जन्यवृष्टी असणाऱ्या भागात घेतले जाणारे पीक जाते. बाजरीचे शास्त्रीय नाव Pennisetium Glaucum असे आहे. बाजरी हि पोएसी कुलातील आहे. बाजरी मूळतः पश्चिम आफ्रिकेतील पीक असून खूप आधीपासून भारतात बाजरीची लागवड केली जाते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते. आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरून पशु पक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते.

बाजरीची लागवड खरीप हंगामात केली जाते. बाजरीचे खोड भरीव असून त्याची उंची साधारण २ मीटर वाढते. बाजरीच्या खोडला आठ ते दहा पेरे असतात. बाजरीला मुळे जमिनीच्या वरच्या लगतच्या पेरापासुनच सुटतात. बाजरीची पाने सुमारे २० सेमी ते ३० सेमी लांबट आणि जवळपास ३ सेमी ते ४ सेमी इतकी रुंद असतात.

खोडाच्या अग्रभागी फुलोरा येतो. हा फुलोरा लांबट, दंडगोलाकार, केसाळ असा असतो. त्याला कणीस म्हणतात. यामध्ये द्विलिंगी फुले असतात. बाजरीच्या कणसामधील फलावरण एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात. प्रथम बाजरीची एकबीजी फळे (दाणे) पिवळट करड्या रंगाची असतात. बाजरीच्या वाळलेल्या खोडला धाठ असे म्हंटला जाते.  

बाजरीच्या जागतिक उत्पादनात भारताचा सर्वोत्तम वाटा आहे. सुमारे ४२% बाजरीचे उत्पादन हे एकट्या भारतात होते.

बाजरीमधील पोषक घटक 

 • बाजरीमध्ये मानवी शरीरासाठी उपयुक्त असणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे पोषक घटक आढळतात.
 • बाजरीच्या १०० ग्रॅम दाण्यांमध्ये १२% पाणी, ११% प्रथिने, ५% मेद, ६७% कर्बोदके आणि २% तंतू व २% खनिज पदार्थ असतात. तसेच बाजरीमध्ये लोह, कॅल्सियम, लोह, विटामिन बी ६, कॅलरी यांचे प्रमाण असते.
 • आपल्या शरीराला १०० ग्रॅम बाजरीच्या सेवनातून ३६८ किकॅ. उष्मांक मिळतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे सेवन करणे लाभदायी ठरते.
 • बाजरी हि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बाजरीच्या दाण्यामध्ये १८ टक्क्यापर्यंत आद्रता / ओलावा असतो.    

बाजरीची लागवड कशी करावी – bajra cultivation

जमीन

बाजरी हे कोरडवाहूचे पीक आहे त्यामुळे हे पीक घेण्यासाठी लागणारी जमीन पाण्याचा निचरा होणारी हलकी आणि मध्यम प्रतीची असावी. जमिनीचा सामू हा ६.२ ते ८ इतका असावा.

मशागत

बाजरीचे पीक घेण्यासाठी जमिनीची १५ सेमी पर्यंत खोलवर नांगरणी करावी. कुळवणी करून जमीन भूसभूसित करावी. प्रती हेक्टर ५ टन शेणखत पसरावे. आणि परत कुळवणी करावी.

लागवड / पेरणी 

बाजरीची लागवड पेरणी पद्धतीने केली जाते. खरीप हंगामात बाजरीची पेरणी १५ जुन ते १५ जुलै या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. पाऊस उशिरा झाल्यास पेरणी ३० जुलै पर्यंत करावी. पण यामुळे उत्पादनात सरासरी १० टक्के घट होते. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते.

बियाणे

प्रती हेक्टर ३ ते ४ किलो प्रमाणित बियाणे वापरावे.बाजरीच्या बियाण्यांच्या २ प्रकारचे वाण आहेत – संकरीत आणि सुधारित

संकरीत बियाणे 

श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती या बाजरीच्या संकरित जाती आहेत. मध्यम काळ्या जमिनीत आणि ज्या क्षेत्रात पाउस बरा पडतो अशा ठिकाणी संकरीत वाण सरस ठरतात. संकरीत जाती तयार करण्यासाठी २ वेगवेगळ्या जातींचा संकर करून मादी वाणावर तयार झालेल्या बियाण्यास संकरीत वाण म्हणतात. या जातीमध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता असते. हे बियाणे दरवर्षी नवीन घ्यावे लागते.

श्रद्धा वाण 

हा वाण लवकर पक्व होणारा असून टपोरे व हिरव्या रंगाचे दाणे असतात. हे पीक येण्यासाठी ७० ते ७५ दिवसांचा कालावधी लागतो. याचे हेक्टरी उत्पादन २५ ते २७ क्विंटल इतके मिळते. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम असतो.

सबुरी वाण 

याचे कणीस घट्ट आणि दाणे टपोरे असतात. हे पीक येण्यासाठी ७६ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. याचे हेक्टरी उत्पादन २८ ते ३० क्विंटल इतके मिळते. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम असतो.

शांती वाण 

याचे धाठ मध्यम उंच, दाणे टपोरे व राखाडी रंगाचे दाणे असतात. हे पीक येण्यासाठी ८० ते ८५ दिवसांचा कालावधी लागतो. याचे हेक्टरी उत्पादन ३० क्विंटल इतके मिळते. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम असतो. याच्या पिठाची भाकरी चवीला चागली लागते.

आदिशक्ती वाण 

हा वाण अधिक उत्पादनक्षम असतो. हे पीक येण्यासाठी ८० ते ८५ दिवसांचा कालावधी लागतो. याचे हेक्टरी उत्पादन ३० ते ३२ क्विंटल इतके मिळते.  

सुधारित बियाणे 

समृद्धी, धनशक्ती व परभणी संपदा या बाजरीच्या सुधारित जाती आहेत. याची लागवड हलक्या आणि कमी किंवा अनियमित पावसाच्या क्षेत्रात केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. सुधारित वाण तयार करण्यासाठी गुणधर्म असणाऱ्या झाडांची निवड करून त्यांना विलगीकरण अंतरात परागीभवन केले जाते. सुधारित वाणांचे बियाणे २-३ वर्षापर्यंत वापरले जाते. हलक्या व मध्यम पाऊस असलेल्या जमिनीत संकरीत आणि सुधारित या दोन्ही जाती चांगले उत्पादन देतात.

खतव्यवस्थापन 

जमीनिच्या प्रती वरूनच नत्र , स्फुरद, पालाश, रासायनिक खते द्यावीत.

बाजरी पिकावरील रोग

 1. बाजरी पिकावर कवकजन्य असलेल्या अरगट या रोगाचा प्रादुर्भाव होतो. बाजरीवर प्लास्मो पेनिनिसेती हा रोग पडतो.
 2. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाणे मिठाच्या पाण्याने धुवून सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
 3. गोसावी रोग टाळण्यासाठी मेटॅलॅक्झील ६ ग्राम प्रती किलो बियाण्यास पेरणी आधी चोळावे.  
 4. बाजारीवर प्रामुख्याने हिंगे, बिनपंखी टोळ, खरपुडी व लष्करी अळी या किडी आढळतात. हे कमी करण्यासाठी पाने खुडली जातात.

बाजरीची काढणी व मळणी

जेव्हा बाजरीचे कणसातील दाणे दाताखाली चावल्यास कट्ट असा आवाज होतो किंवा कणीस दाबल्यास त्यातून दाणे खाली पडतात तेव्हा ते काढणी साठी आले आहे असे समजावे. कणसे कापून वाळवून मळणी करतात.

बाजरी खाण्याचे फायदे

 • बाजरी हे देशातील अनेक लोकांचे प्रमुख अन्न आहे. ग्रामीण भागात बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाली जाते. बाजरीची भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. काही लोक प्रवासामध्ये खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी वाळवून आणि त्यासोबत मिरचीचा ठेचा घेतात.  
 • बाजरीमध्ये उष्मांक जास्त असल्यामुळे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर ठरत. सामान्यतः बाजरीचे दाणे दळून त्याच्या पिठाची भाकरी करतात. हिरवी कणसे भाजून किंवा त्याच्या दाण्यांच्या लाह्या करून खातात.
 • बाजरीच्या दाण्यांपासून माल्ट तयार करता येतो. तसेच जनावरांचे खाद्य म्हणूनही बाजरीचा उपयोग करतात.
 • बाजरीचा धाठांचा जनावरांना वैरण म्हणून घालतात.
 • बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
 • बाजरीतील पोषक तत्वे शरीरातील कोलेस्ट्रोल पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असणाऱ्या पोटॅशियम, मॅग्नेशियम मुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 • मधुमेह असणाऱ्या रुग्णासाठी बाजरीची भाकरी उपयुक्त आहे.  
 • बाजरी नियमित आहारात असल्यास सर्दी खोकल्याचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. 
 • शरीराच्या चांगल्या पोषणासाठी बाजरीची भाकरी पौष्टिक असते. हि भाकरी दुधात कुस्करून किंवा पालेभाजी , तूप यासोबत चांगली लागते.
 • बाजरी पासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यापासून खिचडी, पातळ घाटा, उंडे हे पदार्थही बनवले जातात.
 • हिंदूच्या अनेक सणामध्ये बाजरीला धार्मिक महत्व दिले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी करून त्या एकमेकांना वाटल्या जातात.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये bajra information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर bajra crop information in marathi म्हणजेच “बाजरी बद्दल माहिती” Millet In Marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या millet meaning in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about bajra in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!