सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा MSMED Act 2006 in Marathi

msmed act 2006 in marathi सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा या बद्दल माहिती घेणार आहोत तसेच हा कायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्यासाठी कसा मदत करतो ते पाहणार आहोत. एमएसएमइडी हा कायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्यासाठी सुरु केलेला एक कायदा आहे आणि याचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप micro, small and medium enterprises development act असे आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा हा कायदा २००६ मध्ये भारतीय संसदेने संपूर्ण भारतामध्ये लागू केला आणि म्हणून या कायद्याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा २००६ म्हणून ओळखले जाते आणि या २००६ च्या या कायद्यामध्ये २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्यासाठी स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांच्याशी संबधित आणि अनुषंगिक बाबींसाठी प्रोत्साहन आणि विकास सुलभ करण्यासाठी तरतूद करणारा कायदा म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायद्याला ओळखले जाते. चला तर आता आपण या कायद्याविषयी खाली आणखीन माहिती जाणून घेवूया.

msmed act 2006 in marathi
msmed act 2006 in marathi
अनुक्रमणिका hide

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा – MSMED Act 2006 in Marathi

कायद्याचे नावसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा
केंव्हा लागू केला२००६ मध्ये लागू केला
कोणी लागू केलाभारतीय संसदेने
कायद्याचा मुख्य उद्देशसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्यासाठी स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांच्याशी संबधित आणि अनुषंगिक बाबींसाठी प्रोत्साहन आणि विकास सुलभ करणे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा म्हणजे काय ?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना हा कायदा लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासाच्या शिखरावर नेणे. हा कायदा २००६ मध्ये भारत संसदेने संपूर्ण भारतामध्ये लागू केला.

एमएसएमइडी पूर्ण स्वरूप काय आहे – msmed full form in marathi

एमएसएमइडी ( msmed ) चे मराठी मधील पूर्ण स्वरूप सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास असे आहे आणि याचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप micro, small and medium enterprises development असे आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे काय – what is mean by micro, small and medium enterprises 

 • सूक्ष्म उद्योग : ज्या उद्योगामध्ये यंत्रसामग्री आणि उपकरणांची गुंतवणूक एक कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त नाही आणि उलाढाल हि पाच कोटी पेक्षा जास्त नाही अश्या उद्योगांना सूक्ष्म उद्योग म्हणतात.
 • लघु उद्योग : ज्या उद्योगामध्ये प्लांट, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांची गुंतवणूक दहा कोटी रुपयेपेक्षा जास्त नाही आणि उलाढाल ५० कोटी पेक्षा जास्त नाही अश्या उद्योगांना लघु उयोग म्हणतात.
 • मध्यम उद्योग : ज्या उद्योगामध्ये प्लांट, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांची गुंतवणूक पन्नास कोटी पेक्षा जास्त आणि उलाढाल २५० कोटी पेक्षा जास्त नाही अश्या उद्योगांना मध्यम उद्योग म्हणतात.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे – documents for register micro, small and medium enterprises 

 • प्रतिज्ञापत्र
 • पासपोर्ट आकाराचे आपले फोटो.
 • पॅन कार्ड, आधार कार्ड या सारखा ओळखीचा कोणताही पुरावा.
 • उद्योग स्वताच्या मालमत्तेत असल्यास व्यवहाराचा पुरावा आणि भाड्याने असल्यास भाड्याचा पुरावा.
 • एनओसी ( NOC ).
 • जाहीरनामा.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायद्याचा इतिहास – history of micro, small and medium enterprises development act 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास या कायद्याच्या इतिहासाविषयी सांगायचे म्हटले तर हा कायदा १९५१ चा ६५ च्या कलम २ अन्वये संघाने काही उद्योगांच्या नियंत्रणाची सोय म्हणून एक घोषणा केली होती नंतर भारतीय प्रजासत्ताक ५७ व्या वर्षी संसदेने तो लागू केला म्हणजेच हा कायदा भारतीय संसदेने २००६ मध्ये भारतामध्ये लागू केला आणि मग त्यामध्ये २०२० मध्ये आणखीन सुधारणा करण्यात आली. अश्या प्रकारे हा कायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या साठी सुरु करण्यात आला.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कायद्याद्वारे केलेले उपाय

 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना क्रेडीट सुविधेचा विस्तार करून देणे.
 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना केंद्रीय निधी मिळावा यासाठी कायद्याद्वारे तरतूद करणे.
 • तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्यासाठी वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी प्राधान्य देणे.

सल्लागार समितीचे कार्य

या कायद्यानुसार सल्लागार समिती हि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत करून आपले कार्य पार पाडत असते.

 • प्लांट, यंत्रसामग्री किंवा उपकरणे यामधील गुंतवणूक पातळी किती असावी याचा सल्ला समिती मार्फत दिला जातो.
 • सूक्ष्म किंवा लघु उद्योगासाठी आणि सेवा प्रधान करण्यात गुंतलेल्या मध्यम उयोगांच्यासाठी विवेकाधीन.
 • मध्यम उद्योगासाठी केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट करणे तसेच सूक्ष्म किंवा लघु उद्योगांच्या बाबतीत राज्य सरकार आधी सुचणे द्वारे असे प्राधिकरण निर्दिष्ट करणे.
 • वर्ग आणि उपक्रमांच्या रोजगाराची पातळी वाढवणे.

कायद्याद्वारे नियम बनवण्याचा अधिकार

 • केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी नियम बनवले जावू शकतात आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार देखील या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी नियम बनवू शकते.

आम्ही दिलेल्या msmed act 2006 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या msmed full form in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!