Mulla Nasruddin Biography in Marathi – Mulla Nasruddin Information in Marathi मुल्ला नसरुदीन माहिती मुल्ला नसरुद्दीन हे सेलजूक येथील व्यंग कार होते. ते एक तत्वज्ञ आणि ज्ञानी पुरुष म्हणून ओळखले जायचे. मजेदार कथा आणि गमतीदार किस्से सांगण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या कथांचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या कथा मजेदार असतात व तसेच शैक्षणिक ज्ञान देणाऱ्या व विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात. मुल्ला/ होड्जा/ होका नसरुद्दीन या नावाने ते जगभरात ओळखले जातात. त्यांच्या कथा जगभरातील बहुतांश ठिकाणी आणि विशेषत मध्यपूर्वेतील किंवा जवळच्या देशांमध्ये सांगितल्या जातात. या लेखामध्ये आपण मुल्ला नसरुद्दीन यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मुल्ला नसरुदीन माहिती – Mulla Nasruddin Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | मुल्ला नसरुद्दीन |
जन्म (Birthday) | तेराव्या शतकात |
जन्म गाव (Birth Place) | तुर्की, येथील सिव्रिहिसार मधील होर्टू या गावात |
ओळख (Identity) | सेलजूक व्यंगकार |
Mulla Nasruddin Information in Marathi
जन्म
मुल्ला नसरुद्दीन हे सेलजूक व्यंगकार होते. त्यांच्या जन्माबद्दल अनेक दावे केले गेले आहेत. काही स्त्रोतांच्या मते मुल्ला नसरुद्दीन यांचा जन्म तेराव्या शतकात एस्कीहिर प्रांत जे सध्याचे तुर्की, येथील सिव्रिहिसार मधील होर्टू या गावात झाला असे सांगितले जाते. पुढे अकेहीर येथे स्थायिक झाले आणि त्यानंतर सेलजूक राजवटीत कोन्या येथे स्थायिक झाले जिथे त्यांचा मृत्यू झाला. तर प्रो.
मिखाईल बायराम ज्यांनी नसृद्दिन मुल्ला यांच्यावरती सखोल मध्ये संशोधन केलं त्यांच्यामते नसरुद्दीन यांचा जन्म इराण येथील पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोय शहरात झाला व त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण खोरासान मध्ये पूर्ण केलं. आणि पुढे मुल्ला नसरुद्दीन हेरात मधील कुराण मुफासीर फखर अल- दीन अलराझी यांचे शिष्य बनले. मुल्ला नसरुद्दीन यांनी कायसेरी मध्ये इस्लामिक न्यायाधीश आणि लोकपाल म्हणून काम केले होते. मुल्ला नसरुद्दीन हे तेराव्या शतकात जन्माला आलेले एक उल्लेखनीय मनुष्य होते.
कारकीर्द
मुल्ला नसरुद्दीन होजा हे तुर्कस्तानमधील आणि बहुदा सर्व इस्लामी देशांमध्ये सर्वात प्रसिद्ध कॉमिक पात्र आहे. होजा हा तुर्की शब्द आहे आणि त्याचा अर्थ विद्वान किंवा शिक्षक असा आहे. मुल्ला नसरुद्दीन या नावाने ओळखले जाणारे ते पवित्र पुरुष होते. मुल्ला नसरुद्दीन हे सुफी व ज्ञानी माणूस मानले जातात. त्यांच्या कथा संपूर्ण मध्यपूर्व मध्ये ज्ञात आहेत आणि जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांनी अनेक कथा रचल्या आहेत. ते अनेक कथांमध्ये दिसून येतात काही कथांमध्ये विनोदी तर कधी अति शहाणे पण बहुतांश वेळा अतिशय मूर्ख. ते त्यांच्या शहाणपणा साठी प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या कथा बहुतांश वेळी सुश्म विनोद आणि शैक्षणिक दृष्ट्या संदेश पोचवतात. त्यांच्या कथा वास्तव्यावर आधारित आहेत. ग्रीक लोक नसरुद्दीन यांच्या कथा त्यांच्या लोक कथेचा एक भाग असल्याचे सांगतात मध्ययुगामध्ये नसरुद्दीन यांच्या कथा हुकुमशाही अधिकाऱ्यांची थट्टा करण्यासाठी वापरल्या जात असे. त्यापुढे मुल्ला नसरुद्दीन सोवियत युनियन चे लोकनायक बनले. त्यांच्या कथा सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांचा एखादं पात्र कधी अतिशय हुशार तर कधी अतिशय मूर्ख म्हणून दर्शवलं जातं.
त्यांच्या कथांमध्ये वेगवेगळे रहस्य आहेत. खोल अंतर्ज्ञान हे शहाणपणाचे मार्गदर्शक आहे असे मानणारे सूफी या कथांचा उपयोग ध्यान तंत्र म्हणून करत असत. ते त्यांच्या साधकांना त्यांच्या आवडत्या कथांपैकी काही निवडून त्यावर ती चिंतन करून आत्मसात करण्यास सांगत. मुल्ला नसरुद्दीन यांचे शब्द व त्यांच्या कथा समजून घेण्यासाठी कोणत्याही मोठ्या तात्विक विद्वत्तेची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आम्ही त्यांच्या कथेतून शिकण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला फक्त त्यांच्या कथेमध्ये वेडेपणा दिसून आला..त्यातीलच मुल्ला नसरुद्दीन यांच्या काही कथा खालील प्रमाणे.
एकदा दरबारामध्ये नसरुद्दीन यांच्याविरोधात खटला सुरू होता. नसरुद्दीन यांची चौकशी करण्यासाठी तत्त्वज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि कायद्याच्या अभ्यासकांना बोलावण्यात आलं. तथाकथित ज्ञानी माणसे अडाणी, अनिश्चित आणि संभ्रमात असतात असं सांगत मुल्ला नसरुद्दीन गावोगावी फिरायचे अशी त्यांनी कबुली दिली होती. आणि म्हणूनच त्यांच्यावरती राज्याच्या सुरक्षेचा आणि शांततेचा आदर करत नसल्याचा आरोप लावण्यात आला होता. बादशहाने नसरुद्दीन यांना बोलण्याची संधी दिली त्यावर नसरुद्दीन म्हणाले मला एक कागद आणि पेन आणून द्या. त्यांच्या सांगण्यावरून कागद आणि पेन मागवण्यात आला.
त्यांनी तो कागद आणि पेन दरबारात उपस्थित सात जणांना दिला. आणि त्यांना रोटी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर लिहायला सांगितलं तर सात जणांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर कागदावर लिहिलं आणि ती कागद गोळा करून बादशहाला देण्यात आली. बादशहाने एकेक करून कागदातील उत्तर वाचायला सुरू केले. त्यातील एकाने लिहिले चपाती हे जेवण आहे. तर दुसऱ्याने लिहले ते पाणी आणि पीठ आहे. तिसरा म्हणाला की देवाने दिलेली भेट आहे.
चौथ्याने लिहिलं होतं की हे भाजलेले पीठ आहे. पाचवा महणाला तुम्ही ज्या गोष्टीला ब्रेड बोलतात त्याच्या वरती अवलंबून आहे. सहाव्या माणसाने लिहले होते की ते पोषकतत्व आहे. आणि सातव्याने लिहिले की भाकरी म्हणजे काय हे कोणालाच माहीत नाही. ही सगळी उत्तरे बघून नसरुद्दीन म्हणाले जर हे सगळे मिळवून ठरवू शकत नाहीत की चपाती म्हणजे काय आहे? तर इतर गोष्टींबद्दल तुम्ही कसे ठरवू शकतात? जसे की मी योग्य आहे की अयोग्य आहे.
अशा लोकांवर तुम्ही एखाद्याची तपासणी किंवा मूल्यमापन करण्याचे काम सोपवू शकता? जी गोष्ट आपण रोज खातो त्याच्याबद्दल त्यांचे एकमत होऊ शकत नाही हे थोडं विचित्र नाही आहे का? आणि तरीही मला आरोपी ठरविण्यात सगळ्यांचं एकमत झालं? त्यांच्या मताला काय किंमत आहे?..
एकदा काही लोकांनी मुल्ला नसरुद्दीन यांना प्रवचन देण्यासाठी बोलवलं त्यावेळी मुल्ला नसरुद्दीन तिथे पोहोचले स्टेजवर चढले आणि त्यांनी उपस्थित लोकांना विचारलं की तुम्हाला माहित आहे का, मी आज काय सांगणार आहे ते? तर “नाही” असं तिथे उपस्थित लोकांकडून उत्तर मिळाले. तेव्हा नसरुद्दीन थोडे नाराज झाले आणि तेथील लोकांना म्हणाले जर मी तुम्हाला काय सांगणार याची कल्पना नसेल तर अशा लोकांसमोर माझी काहीच बोलायची इच्छा नाही आहे.
असं बोलून मुल्ला नसरुद्दीन तिकडून निघून गेले. तिथे उपस्थित लोकांना लाजिरवाणं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी दुसऱ्या दिवशी मुल्ला नसरुद्दीन यांना पुन्हा प्रवचनासाठी बोलावलं आणि मुल्ला यांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित लोकांना विचारला की तुम्हाला माहित आहे का की मी आज तुम्हाला काय सांगणार आहे ते? तेथे बसलेल्या लोकांनी “होय” असं सोबत उत्तर दिलं.
तेव्हा मुल्ला नसरुद्दीन म्हणाले वाह तुम्हा सगळ्यांना आधीच माहीत आहे की मी तुम्हाला काय सांगणार आहेत तर तीच गोष्ट पुन्हा सांगण्यामध्ये मी तुमचा वेळ वाया का घालवू? असं बोलून मुल्ला नसरुद्दीन तिथून निघून गेले आता तिथे उपस्थित लोकांना मुल्ला नसरुद्दीन यांचा थोडा राग आला आणि म्हणूनच त्या लोकांनी मुल्ला नसरुद्दीन यांना पुन्हा प्रवचन देण्यासाठी बोलावलं. परंतु यावेळी त्या सगळ्यांनी आधीच एक योजना आखली होती मुल्ला नसरुद्दीन त्यांना प्रश्न विचारतील की मी तुम्हाला आज काय सांगणार आहे हे माहित आहे का? तेव्हा अर्धे लोक हा बोलतील आणि अर्धे लोक नाही बोलतील.
मुल्ला नसरुद्दीन प्रवचनाला आले त्यांनी तिथे उपस्थित लोकांना विचारलं की मी तुम्हाला आज काय सांगणार आहे याची कल्पना आहे का? तेव्हा खाली बसलेल्या अर्ध्या लोकांनी होय असं उत्तर दिलं तर, अर्ध्या लोकांनी नाही असं उत्तर दिलं. यावरती मुल्ला नसरुद्दीन म्हणाले ठीक आहे ज्या लोकांना माहित आहे की मी इथे काय सांगणार आहे त्या लोकांनी उरलेल्या अर्ध्या लोकांना सांगून टाका. त्यानंतर मुल्ला नसरुद्दीन यांना कोणीच प्रवचनाला बोलावले नाही…
एकदा नसरुद्दीन मुल्ला यांनी बाजारातून मांस विकत घेतलं आणि ते घेऊन ते जात होते. दुसऱ्या हातामध्ये त्यांनी त्यांच्या मित्राकडून तो मांस कसा बनवायचा हे एका कागदावर लिहून आणलेलं होतं तेवढ्यात अचानक एक गरुड आलं आणि त्यांच्या हातातील मांस घेऊन गेला तेव्हा मुल्ला नसरुद्दीन त्याला म्हणाले अरे मूर्ख तू मांस तर घेतलं पण ते बनवण्याची पद्धत माझ्याकडे आहे.
मुल्ला नसरुद्दीन यांच्या कथांमधून शिकण्यासारखे बरेच काही गोष्टी आहेत परंतु त्यांनी या गोष्टी कधी उपदेशाच्या स्वरूपात सांगितल्या नाहीत. त्यांच्या कथा ऐकून लोकांना हसू येते त्या मजेशीर असतात आणि त्यातूनच काहीतरी संदेश लपलेला असतो. मुल्ला नसरुद्दीन हसतहसत बरेच महत्वपूर्ण संदेश देऊन जायचे.
मृत्यू
तुर्कस्तान येथे मुल्ला नसरुद्दीन यांची समाधी बांधली गेली आहे. तेथे दरवर्षी नसरुद्दीन उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये लोक मुल्ला नसरुद्दीन यांच्यासारखा पेहराव करून त्यांचे किस्से कथा एकमेकांना सांगतात.
आम्ही दिलेल्या Mulla Nasruddin Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मुल्ला नसरुदीन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Mulla Nasruddin information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Mulla Nasruddin in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट