national pension scheme details in marathi – nps information in marathi राष्ट्रीय पेन्शन योजना माहिती मराठी, सध्या भारत सरकार कडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन योजना राबवल्या जातात जसे कि विधवा पेन्शन योजना, वयोवृध्द पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना आणि निवृत्तीनंतर दिली जाणारी पेन्शन योजना अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि ह्या योजना त्या संबधित पात्र व्यक्तीला दिल्या जातात तसेच एनपीएस हि देखील एक पेन्शन योजना आहे जी ज्याला राष्ट्रीय पेन्शन योजना (national pension system) म्हणून ओळखले जाते.
आणि या प्रकारची पेन्शन हि निवृत्तीनंतर दिली जाते आणि हि योजना निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण आणि केंद्रा सरकारच्या कक्षेत सेवानिवृत्तीसाठी स्वैच्छिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना हा केंद्र सरकारने चालवलेला सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे आणि या साठी सार्वजनीक, खाजगी आणि असंघटीत कर्मचारी हे पात्र आहेत.
हि पेन्शन योजना २००४ या वर्षामध्ये फक्त सरकारी कंपनींच्यासाठी सुरु केली होती म्हणजेच या योजनेचा लाभा हा सरकारी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तेवढाच मिळत होता.
परंतु नंतर २००९ पासून हि योजना सर्व विभागांच्यासाठी म्हणजेच खाजगी, सरकारी, सार्वजनिक आणि संघटीत संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी देखील सुरु झाली. एनपीएस चे योगदान हे एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला टीमच्या टियर एक खात्यामध्ये दरवर्षी किमान ६००० रुपये योगदान द्यावे लागते कारण सरकार तुमच्या एनपीएस खात्यामध्ये योगदान देत नाही.
राष्ट्रीय पेन्शन योजना माहिती मराठी – National Pension Scheme Details in Marathi
योजनेचे नाव | राष्ट्रीय पेन्शन योजना (national pension system) |
योजनेची सुरुवात | २००४ सरकारी कंपन्यांच्यासाठी आणि २००९ मध्ये खाजगी, सरकारी आणि संघटीत कंपनीसाठी |
लाभार्थी | खाजगी, सरकारी आणि संघटीत कंपनी मधील कर्मचारी |
राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय – nps meaning in marathi
- राष्ट्रीय पेन्शन योजना हि सरकारने सुरु केलेली एक योजना आहे जी जानेवारी २००४ मध्ये फक्त सरकारी विभागासाठी लागू होती परंतु २००९ मध्ये ती सर्व विभागासाठी लागू केली. हि योजना सदस्यांना त्यांच्या कामकाजाच्या किंवा नोकरीच्या जीवनामध्ये पेन्शन खात्यामध्ये नियमितपणे योगदान देण्याची परवानगी देते.
- राष्ट्रीय पेन्शन योजना हि सरकारने खाजगी, सार्वजनिक, सरकारी आणि संघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी सुरु केलेली योजना आहे.
एनपीएससाठी पात्रता निकष – eligibility
जसे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्याला त्या संबधित कंपनीने किंवा संस्थेने ठरवलेले पात्रता निकष पूर्ण करावे लागतात आणि तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी खाते उघडण्यासाठी देखील त्या संबधित व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. चला तर खाली आपण काही पात्रता निकष पाहूया.
- अर्जदाराचे वय हे १८ ते ७० या वर्षाच्या वयोगटातील असावे आणि त्याने अर्ज सबमिट केल्याच्या तारखेनुसार केवायसी नियमांचे पालन केले पाहिजे.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असला पाहिजे जरी तो भारताचा निवासी असेल किंवा अनिवासी.
- तो संबधीत व्याकतो सरकारी, संघटीत किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करत असला पाहिजे.
एनपीएस खात्याचे फायदे – benefits
या योजनेतून सरकारला देखील काही फायदे मिळतात आणि योजनेतील सदस्याला देखील काही फायदे मिळतात आणि म्हणून खाली आपण या योजनेतून मिळणारे फायदे कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.
- सर्व अर्जदारांना संपूर्ण भारतातील सर्व मुख्य पोस्ट कार्यालयामधून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही एका pop सह खाते उघडावे लागेल आणि कायम सेवा निवृत्त खाते क्रमांक मिळवावा लागेल.
- एनपीएस खात्यामुळे आपली बचत देखील वाढू शकते.
- एनपीएस हे असे खाते आहे जे अर्जदार देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ते ऑपरेट करू शकतो आणि pop-sps द्वारे योगदान देऊ शकतो. अर्जदार ज्या ठिकाणी नोंदणीकृत आहे, जरी त्याने नोकरी, शहर हे बदलले तरीही एनपीएस मार्फत तो योगदान देऊ शकतो.
- एनपीएस हि जगातील सर्वात कमी किंमतीची पेन्शन योजना आहे आणि याचे प्रशासकीय आणि निधी व्यवस्थापन शुल्क हे सर्वात कमी आहेत.
- ग्राहकाला रोजगार मिळाल्यास खाते सरकारी क्षेत्र, कॉर्पोरेट मॉडल यासारख्या कोणत्याही इतर क्षेत्रामध्ये देखील हलवले जावू शकते.
एनपीएस मधील खाती ?
एनपीएस योजना हि एकूण दोन खाती ऑफर करते एक टियर १ आणि दुसरे म्हणजे टियर २ खाती. यामधील टियर १ हे खाते अनिवार्य खाते आहे आणि टियर २ हे खाते ऐच्छिक आहे. या दोन खात्यांच्यामधील मोठा फरक हा त्यांच्यामध्ये गुंतवलेले पैसे काढणे हा आहे.
तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत टियर १ या खात्यातून पैसे काढू शकत नाही आणि तुम्ही निवृत्त झाल्यानंतर देखील टियर १ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही बंधने लाधलेली असतात आणि टियर २ खात्यातून ग्राहक कधीही संपूर्ण पैसे काढू शकतो त्यासाठी काही बंधने नसतात.
एनपीएस विषयी काही विशेष तथ्ये – facts
- एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना हि भारत सरकारने सुरु केलेली एक योजना आहे जी सरकारी, खाजगी आणि संघटीत कंपनींच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी लागू होते.
- राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सर्व कामकाज पाहणारे मुख्यालय हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
- भारतामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेला म्हणजेच एनपीएस १० डिसेंबर २०१८ मध्ये सरकारने करमुक्त साधन बनवले.
- अनिवासी भारतीय व्यक्ती हा एनपीएस या योजनेमध्ये सामील होऊ शकतो आणि अनिवासी भारतीयांच्या नागरिकत्वाच्या स्थितीमध्ये बदल झाल्यास खाते बंद केले जाईल.
- एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या टियर १ खात्यामध्ये दरवर्षी कमीत कमी ६००० रुपये योगदान द्यावे लागेल.
आम्ही दिलेल्या nps information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रीय पेन्शन योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या national pension scheme details in marathi या national pension system in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि national pension system in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nps scheme in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट