नाईटींगेल पक्षी माहिती Nightingale Bird Information in Marathi

Nightingale Bird Information in Marathi नाईटींगेल हा एक रात्री गाणारा छोटासा (आकाराने रॉबिन पक्ष्यापेक्षा थोडासा मोठा) पक्षी आहे. नाईटींगेल हा पक्षी तुर्डीडे कुटुंबातील असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव ‘ल्युसीनिया मेगॉरीन्चोस’ (luscinia megarhynchos) असे आहे. नाईटींगेल या पक्ष्याला थ्रश नाईटींगेल या नावानेही ओळखले जाते. हे पक्षी स्थलांतरी पक्षी असल्यामुळे हे प्रजनन काळामध्ये हे पक्षी दक्षिण पश्चिम आशिया, युरोप किवा स्क्रबमधील जंगलांमध्ये स्थलांतर करतात. नाईटींगेल हा पक्षी चिमणीच्या आकाराचा असतो आणि या पक्ष्याची लांबी १४ ते १६ सेंटी मीटर इतकी असते तसेच प्रौढ नाईटींगेल पक्ष्याचे वजन १५ ते २० ग्रॅम असते.

पंख आणि वरचा पूर्ण भाग तपकिरी रंगाचा असतो आणि घसा, छाती आणि पोट क्रीम कलरचा असतो, शेपूट लालसर रंगाची असते, चोच चिमणीसारखी लहान असते आणि पाय बारीक आणि आखूड असतात. हे पक्षी आकाराने छोटे असल्यामुळे ते सहसा दिसणे अवघडच असते. या पक्ष्याला नाईटींगेल हे नाव त्याच्या गाण्याच्या स्वभवावरून दिले आहे कारण हे पक्षी दिवसा तर गातातच पण रात्रीही वारंवार गातात.

nightingale bird information in marathi
nightingale bird information in marathi

नाईटींगेल पक्षी माहिती – Nightingale Bird Information in Marathi

नाईटींगेल पक्ष्याचे वैज्ञानिक वर्गीकरण

नावनाईटींगेल
प्रांतअॅनिमलिया
वर्गएव्हस
कुटुंबतुर्डीडे
प्रजातीलुसिनिया
वैज्ञानिक नावल्युसीनिया मेगॉरीन्चोस

नाईटींगेल पक्ष्याचे वर्णन

नाईटींगेल हा पक्षी चिमणीच्या आकाराचा असतो आणि या पक्ष्याची लांबी १४ ते १६ सेंटी मीटर इतकी असते तसेच प्रौढ नाईटींगेल पक्ष्याचे वजन १५ ते २० ग्रॅम असते. पंख आणि वरचा पूर्ण भाग तपकिरी रंगाचा असतो आणि घसा, छाती आणि पोट क्रीम कलरचा असतो, शेपूट लांब आणि लालसर रंगाची असते, चोच काळी तपकिरी चिमणीसारखी लहान असते आणि पाय बारीक आणि आखूड असतात आणि पायाचा रंग गुलाबी असतो. या पक्ष्याचे पंख उडताना २३ ते २६ सेंटी मीटर पसरतात.

नावनाईटींगेल
प्रकारपक्षी
रंगतपकिरी
आकार / लांबी१४ ते १६ सेंटी मीटर
वजन१५ ते २० ग्रॅम
आयुष्य२ ते ५ वर्ष

नाईटींगेल हे पक्षी कुठे राहतात ( habitat )

नाईटींगेल हे पक्षी प्रजनन काळामध्ये हे पक्षी दक्षिण पश्चिम आशिया, युरोप किवा स्क्रबमधील जंगलांमध्ये स्थलांतर करतात आणि हे पक्षी हिवाळ्यामध्ये आफ्रिका, युरेशिया आणि युके या देशामध्ये आढळतात. हे पक्षी आपले घरटे जंगलांमध्ये, जास्त झाडे असणाऱ्या घनदाट वस्तीमध्ये किवा मनुष्य वस्तीजवळ किवा शेतामध्ये आपले घरटे बनवतात. नाईटींगेल हा पक्षी आपले घरटे उंच आणि जास्त घनदाट असलेल्या झाडावर किवा इमारतीवर आपले घरटे बनवतात.

नाईटींगेल पक्ष्याचा आहार ( food )

हे पक्षी शक्यतो सर्वआहारी असतात म्हणजेच हे पक्षी शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न देखील खातात. नाईटींगेल हे पक्षी बिया, धान्य, कीटक, अळ्या किवा मुंग्या या प्रकारचा आहार खातात.

विणीचा हंगाम आणि सवयी ( mating season and habits )

नाईटींगेल हे पक्षी एकपात्री नसतात हे पक्षी दरवर्षी नवीन जोडीदार शोधतात. मादी विणीच्या हंगामाच्या अगोदर वाळलेली पाणे आणि वाळलेले गवत या पासून एक वाटीच्या आकाराचे घरटे बनवते. मादी नाईटींगेल पक्षी एका वेळी २ ते ३ अंडी देते आणि टी अंडी मादी एकटीच उबवते. अंडी उबण्याचा कालावधी १३ ते १४ दिवस असतो. या पक्ष्याची पिल्ले ११ ते 13 दिवसांनी स्वतंत्र्य होतात तोपर्यंत या पिल्लांची काळजी त्यांचे पालक घेतात. अंडी उबवने, घरटे बनवणे, पिल्लांची काळजी घेणे आणि कामे मादी करते आणि अन्न गोळा करण्याचे काम नर पक्षी करतो.

उष्मायन कालावधी१३ ते १४ दिवस
पिल्लांचा स्वतंत्र्य कालावधी११ ते १३ दिवस
अंडीमादी एका वेळी २ ते ३ अंडी देते

नाईटींगेल पक्ष्याविषयी काही प्रश्न ( questions )

नाईटींगेल हे पक्षी रात्रीच्या वेळी गाणे का गातात?

स्थलांतर करताना रात्रीच्या वेळी मादी पक्ष्याला आपल्या प्रदेशाची कल्पना देण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी नर पक्षी रात्रीच्या वेळी गातात. या पक्ष्यांना एकदा जोडीदार भेटला कि ते रात्रीच्या वेळी गप्पा बसतात. हे पक्षी जून मध्ये दिवसा गातात.

नाईटींगेल हा पक्षी दुर्मिळ आहे का ?

पण आजकाल हे पक्षी विरळ होत चालले आहेत. या पक्ष्याचे ९० टक्के प्रमाण पाठीमागच्या ५० वर्षामध्ये कमी झाले आहेत. तसेच १९ व्या शतकात या पक्ष्यांचे गाणे हस्तगत करण्यासाठी हे पक्षी मोठ्या प्रमाणात पकडले गेले.

नाईटींगेल पक्षी केठे आढळतात ?

नाईटींगेल हे स्थलांतरित पक्षी आहेत युरोप, आशिया, युरेशिया, युके, आफ्रिका आणि स्क्रबच्या जंगलामध्ये आढळतात. हे पक्षी पाण्याची सोय आणि झुडुपे असणाऱ्या ठिकाणी राहतात.नाईटींगेल

पक्ष्याच्या गाण्याविषयी माहिती 

हे पक्षी जास्त करून रात्रीच गातात आणि या पक्ष्याच्या गाण्याचा उल्लेख हा निसर्गामधील सर्वात सुंदर ध्वनी मधील एक आहे असे मानले जाते. रात्रभर गाणारे नाईटींगेल हे नर पक्षी असतात आणि ते मादी नाईटींगेल पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी गाणे गातात असे म्हंटले जाते. प्रेम, सौंदर्य, गाणी, परीकथा, पुस्तके आणि कवितेसाठी एक रूपक म्हणून साहित्य आणि कवितेत नाईटींगेल पक्ष्याचा आवाज आणि गाणी वापरली जातात.

नाईटींगेल पक्ष्याविषयी तथ्ये ( facts about nightingale bird )

  • नाईटींगेल हे पक्षी ताशी १८ मैलाचे अंतर उडून पार करू शकतात.
  • नाईटींगेल या पक्ष्यांचे गाणे इतके अपवादात्मक असते कि या पक्ष्यांच्या गाण्याच्या अभ्यासावरून असे दिसून येते कि वैयक्तिक पक्ष्यांमध्ये २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या वाक्यांचा समावेश असू शकतो.
  • नाईटींगेल हे पक्षी खास करून रात्रीच गातात म्हणून या पक्ष्याला nightingale हे नाव पडले आहे.
  • नर पक्षीच फक्त गाणे गातो आणि असे म्हणतात कि तो मादी पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी गाणे गातात.
  • २०० वर्षापूर्वी नाईटींगेल पक्ष्यांचा व्यापार होत होता.
  • ब्रिटनमध्ये सुमारे ४००० नाईटींगेल पक्ष्याच्या जोड्या असल्याचे मानले जाते.
  • ईशान्य युरोपमध्ये थ्रश नावाचा नाईटींगेल पक्षी आढळतो.
  • हे पक्षी प्रजनन कालावधी मध्ये दक्षिण पश्चिम आशिया, युरोप किवा स्क्रबमधील जंगलांमध्ये स्थलांतर करतात.
  • नाईटींगेल या पक्ष्यांचे आयुष्य २ ते ५ वर्ष असते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा नाईटींगेल पक्षी nightingale bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. nightingale bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about nightingale bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही नाईटींगेल पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या nightingale bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही nightingale bird information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!