north america information in marathi उत्तर अमेरिका खंड माहिती मराठी, उत्तर अमेरीका जगातील तिसरा सर्वात मोठा खंड आहे आणि आज आपण या लेखामध्ये उत्तर विषयी माहिती पाहणार आहोत. उत्तर अमेरिका हा तिसरा मोठा खंड म्हणून ओळखला जातो आणि या खंडामध्ये एकूण २३ देश आहेत आणि या खंडामध्ये ५९० दशलक्ष लोक राहतात आणि हा लोकसंखेमधील ४ थ्या क्रमांकावरील देश आहे. या खंडातील सर्वात मोठा देश म्हणजे कॅनडा आणि या खंडातील सर्वात लहान देश म्हणजे सेंट किट्स आणि नेव्हिस हे आहेत.
उत्तर अमेरिका ह्या क्षेत्रफळाविषयी पाहायचे म्हटले तर याचे भौगोलिक क्षेत्र हे ९५४०००० चौरस मैल इतके आहे आणि हे पृथ्वीच्या भूभागापैकी १६ टक्के आहे. अमेरिका या खंडाच्या दक्षिण भागामध्ये अनेक वेगवेगळ्या बेटांचा समूह आहे आणि या समूहाला वेस्टर्न आयलंड ग्रुप्स म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी मध्य अमेरिकेच्या सकल प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय पावसाचे जंगल आणि सवाना आहे तरमध्य ग्रीनलँडच्या भागामध्ये कायम बर्फ पडत असतो. या खंडामध्ये शेतीला देखील महत्व आहे आणि या खंडामध्ये कापूस, गहू आणि मका हे पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. चला तर खाली आपण उत्तर अमेरिका विषयी आणखीन सविस्तर माहिती घेवूया.
उत्तर अमेरिका खंड माहिती मराठी – North America Information in Marathi
खंडाचे नाव | उत्तर अमेरिका |
क्षेत्रफळ | ९५४०००० चौरस मैल |
खंडामधील देश | या खंडामध्ये २३ देश आहेत. |
लोकसंख्या | ५९० दशलक्ष |
उत्तर अमेरिका खंडा विषयी इतिहास – north america history in marathi
उत्तर अमेरिका या खंडा विषयी असे म्हटले जाते कि या खंडाचे रहिवासी ही ४० हजार वर्षापूर्वी बेरिंग सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करून आले होते आणि पुढे त्यांनी आदिम बोटींचा वापर करून सुरुवातीच्या माणसांनी पॅसिफिक किनारपट्टीच्या खाली दक्षिण अमेरिकेमध्ये स्थलांतर केले असे म्हटले जाते पण याबद्दल सत्य माहिती नाही.
त्याचबरोबर या बद्दल असे देखील म्हटले जाते कि १२ हजार वर्षापूर्वी शेवटचा हिमनदीचा कालखंड संपल्यानंतर उत्तर ते दक्षिण खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रागैतीहासिक संस्कृती स्थापान झाल्या.
वर सांगितल्या प्रमाणे उत्तर अमेरिका हा देश क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हा खंड एकूण २३ देशांनी बनलेला आहे आणि हे देश कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.
- कॅनडा
- मेक्सिको
- बेलीज
- क्युबा
- पनामा
- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
- बार्बाडोस
- कॉस्टा रिका
- हैती
- बहामास
- अँन्टिग्वा आणि बार्बुडा
- ग्रेनेडा
- डोमिनिकन रिपब्लिक
- डोमिनिका
- जमैका
- ग्वाटेमाला
- निकाराग्वा
- सेंट लुसिया
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- एल साल्वाडोर
- होण्डूरास.
- सेंट व्हीन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
- त्रीनिदाद आणि टोबॅगो
उत्तर अमेरिकेविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जगातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची व्यवस्था ग्रेट लेक्स हि आहे आणि हे ठिकाण युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये स्थित आहे आणि हे गोड्या पाण्याचे स्त्रोत ९४००० चौरस मैल जागा व्यापते.
- माउंट डेनाली आहे उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च शिखर आहे आणि हे ६१९० मीटर इतके उंच आहे.
- उत्तर अमेरिका हा जगामधील तिसरा मोठा खंड आहे आणि पहिले दोन आशिया आणि आफ्रिका हे खंड आहेत.
- उत्तर अमेरिका ही पूर्णपणे उत्तर आणि पश्चिम गोलार्धामध्ये समाविष्ट आहे.
- उत्तर अमेरिकेतील सर्वात सामान्य आणि प्रबळ भाषा म्हणजे इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश आहे आणि तसेच या ठिकाणी डॅनिश बोलणारे लोक देखील आहेत.
- मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स हे उत्तर अमेरिकेतील जास्त प्रमाणात लोकसंख्या असलेले देश आहेत.
- उत्तर अमेरिका या खंडाला अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको खंड म्हणून देखील ओळखले जाते.
- उत्तर अमेरिका हा जगामधील तिसरा मोठा खंड असून या खंडाचा शोध हा कोलंबस याने १४९२ मध्ये लावला होता असे म्हटले जाते.
- उत्तर अमेरिका हा खंड उत्तर बाजूने आर्क्टिक महासागर, पूर्व दिशेला अटलांटिक महासागर आणि पश्चीम दिशेला पॅसिफिक महासागर या महासागरांनी वेढलेले आहेत.
- उत्तर अमेरिका हा खंड पाच भौतिक क्षेत्रामध्ये वसलेला आहे आणि ते म्हणजे कॅनेडीयन शिल्ड, अॅपलाचीयन पर्वत, अटलांटिक कोस्टल प्लेन, उत्तर अमेरिकन कोर्डीलेरा हे आहेत.
- रिव्हर चर्चिल, रिव्हर रेड, रिव्हर रिव्हो ग्रांडे, रिव्हर कोलंबिया रिव्हर ओहायो, रिव्हर मिसिसीपी, रिव्हर फ्रेझर ह्या नद्या ह्या खंडातील महत्वाच्या नद्या आहेत.
- फ्लोरिडाची सामुद्रधुनी हि उत्तर अमेरिकेतील प्रसिध्द सामुद्रधुनी आहे आणि हे मेक्सिकोच्या आखाताला अटलांटिक महासागराशी जोडलेला आहे.
- उत्तर अमेरिका या खंडामध्ये असणाऱ्या न्युयॉर्क या शहरामध्ये अमेरिका म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री (american museum of natural history) हे जगामधील सर्वात मोठे संग्रहालय आहेत.
- ह्या खंडातील क्युबा हा देश उसाचा प्रमुख उत्पादक आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साखरेची निर्मिती देखील केली जाते.
- कॅनडा, रशिया आणि चीननंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे आणि यामध्ये अलस्का आणि हवाईयन बेटांच्यासोबत ५० राज्यांचा समावेश आहे.
- उत्तर अमेरिका खंडामधील अक्रोन हा देश सिंथेटिक रबर आणि टायर्सच्या निर्मितीसाठी जगामध्ये सर्वात मोठा देश मनाला जातो.
- रशियानंतर कॅनडा हा देश जगातील सर्वात मोठा देश आहे आणि हा उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो.
आम्ही दिलेल्या north america information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उत्तर अमेरिका खंड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या north america history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about north america in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट