Organ Donation Essay in Marathi – Avayav Dan in Marathi Essay अवयव दान निबंध आज आपण या लेखामध्ये अवयव दान या विषयावर निबंध लिहिणार आहोत. अवयव दान म्हणजे एकाद्या व्यक्तीकडून चांगले आणि निरोगी अवयव एका गरजू व्यक्तीला दिलेले असतात आणि हे काही त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानतर दिले जातात तर काही अवयव हे जिवंत असताना देखील दान केले जातात. काही व्यक्ती अश्या असतात कि आपल्या शारोरातील काही निरोगी अवयव हृदय, डोळे, कान, घसा, किडनी यासारखे अवयव दान करतात आणि बहुतेक लोक हे आपल्या शरीरातील अवयव त्यांच्या मरणानंतर काढून घेण्याची परवानगी देतात.
अवयव दान काळाची गरज निबंध – Organ Donation Essay in Marathi
Avayav Dan in Marathi Essay
अवयव दान करणे हि एक चांगली गोष्ट आहे कारण यामुळे अनेक गरजू लोकांना मदत होते आणि सध्या लोकांच्यामध्ये अवयव दानाची जागरुकता वाढली आहे कारण लोक खूप जन लोक आपले चांगले अवयव दान करतात. अवयव दान हे एक अत्यंत उदात्त आणि सन्मानीय कार्य आहे आहे ज्याचा समाजाला आणि सामातील लोकांना अनेक प्रकारे फायदा होतो.
अवयव दान हे एका व्यक्तीच्या शरीरातून शस्त्रक्रीयेद्वारे अवयव काढून त्या अवयवाचे प्रत्यारोपण नवीन शरीरामध्ये केले जाते. ज्यावेळी एकाद्या व्यक्तीला अवयवाची गरज तेव्हा भासते ज्यावेळी एखादा व्यक्ती अपघातामध्ये आपला अवयव गमावतो किंवा एकाद्या व्यक्तीचा अवयव काम करणे थांबवतो किंवा किंवा एखाद्या व्यक्तीच्या अवयवा मध्ये काही बिघाड होतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दुसऱ्या चांगल्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते.
उदाहरणात जर एकाद्या व्यक्तीच्या दिसत नसेल म्हणजेच तो आंधळा असेल पण त्याला जग पाहायचे असल्यास तो व्यक्ती डोळ्यांचे प्रत्यारोपण करून घेवू शकतो आणि त्यांना दिसू शकते आणि हे फक्त त्या महान लोकांच्यामुळे शक्य होऊ शकते जे लोक आपले अवयव दान करतात.
एखादी व्यक्ती आपले अवयव दान करण्यासाठी सर्वप्रथम साइन अप करून नोंदणी करू शकते आणि या प्रक्रियेमध्ये एखादी व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान करण्यास स्वेच्छेने संमती देते. तो व्यक्ती मरण पावल्यानंतर डॉक्टर त्याच्या शरीरातून डोळे आणि इतर अवयव काढून घेतात आणि ते साठवतात. मग या साठवलेल्या अवयवाचा उपयोग हा अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी हे दान केलेले अवयव वापरले जातात.
अवयवांची उपलब्धता आणि मागणी यांच्यातील प्रचंड असमानतेमुळे, काही रुग्ण योग्य वेळी अवयव प्रत्यारोपण करण्यास भाग्यवान असतात. एका व्यक्तीने जर मृत्युनंतर आपले अवयव दान करण्याची संमती दिली असेल तर ती व्यक्ती त्याच्या मृत्युनंतर ४ ते ५ जणांचे प्राण वाचवू शकते त्यामुळे अनेक व्यक्तींनी जर मृत्यूनंतर जर आपले अवयव दान केले तर त्यांना तर ज्याला त्या अवयवाची गरज आहे त्या व्यक्तीला ते वापरतात येतात आणि यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचतो आणि ज्याने मृत्युनंतर आपले अवयव दान करतो तो व्यक्ती या जगातून जाता जाता देखील सामाजिक कार्य करून जातात.
आज आपल्या जगामध्ये अवयव दानाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि त्यामुळे ते अवयव दान करण्यासाठी संकुचित असतात आणि म्हणून बहुतेक लोक अवयव दान करत नाहीत आणि त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया हि थंडावत जात चालल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळता आहे आणि म्हणूनच सरकारने अवयव दानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो.
एकादी व्यक्ती जर अवयव दान करण्यासाठी इच्छुक असेल तर ती व्यक्ती हृदय, डोळे, घसा, कान, यकृत, फुफुसे, किडनी यासारखे आपल्या शरीरातील अवयव आपल्या मृत्युनंतर अवयव दान करू शकतात. जर एकाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर अवयव दान केले असेल तर ते अवयव शरीराच्या बाहेर काही काळासाठी जिवंत राहू शकतात म्हणजेच या अवयवांचे त्या अवयवाचे कार्य बंद होण्याअगोदर प्रत्यारोपण करणे खूप गरजेचे असते.
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून किडनी काढली म्हणजेच त्या व्यक्तीने जर मृत्युनंतर किडनी दान केली असेल तर ती काढलेली किडनी ४८ तासापर्यंत कार्य करू शकते आणि त्या किडनीचे ४८ तासाच्या अगोदर प्रत्यारोपण करणे खूप गरजेचे असते. जर एकाद्या इच्छुक व्यक्तीने त्याच्या मृत्युनंतर त्याच्या संमतीने जर यकृत दान केले असेल तर ते यकृत शरीराच्या बाहेर १२ तास काम करू शकते त्यामुळे यकृताचे प्रत्यारोपण हे एक शरीरातून काढल्यावर दुसऱ्या शरीरामध्ये १२ तासाच्या आत करावे लागते.
जर एखाद्या व्यक्तीने आपला घसा, कान आणि डोळे हे आपले अवयव दान केले असतील आणि त्याचे हे अवयव त्याच्या मृत्यूनंतर काढून घेतल्यानंतर ते काही महिन्यापर्यंत जतन करून ठेवता येते त्याचबरोबर एकाद्या व्यक्तीने त्वचा किंवा हाडे दान केली असतील तर ती कित्येक काळ चांगली राहू शकतात. एकाद्या व्यक्तीने दान केलेले फुफुस हे मानवाच्या शरीराच्या बाहेर काढल्यानंतर सहा तास काम करते त्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सहा तासाच्या अगोदर प्रत्यारोपण करावे लागते. अश्या प्रकारे अवयव दानाचे महत्व आहे.
जर एकाद्या व्यक्तीला अवयव दान करायचे असल्यास १८ वर्षा वरील कोणतीही व्यक्ती आपले अवयव दान करू शकते आणि जर १८ वर्षा खालील मुलाला जर अवयव दान करायचे असल्यास त्या मुलाला आपल्या आई वडिलांची परवानगी घेवून अवयव दान करावे लागते. अश्या प्रकारे लोकांनी अवयव दानाचे महत्व समजावून घेतले पाहिजे आणि मृत्युनंतर अवयव दान केले पाहिजे ज्यामुळे गरजू लोकांचे प्राण त्यामुळे वाचतील.
आम्ही दिलेल्या organ donation essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अवयव दान काळाची गरज निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या avayav dan in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on organ donation in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये importance of organ donation essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट