भागीदारी संस्था माहिती Partnership Firm Information in Marathi

partnership firm information in marathi भागीदारी संस्था माहिती, सध्या अनेकजण आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात आणि अनेकजण असे देखील आहेत जे आपला व्यवसाय हा भागीदारी मध्ये म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये पार्टनरशिप म्हणतात. जे लोक त्यांचा व्यवसाय हा पार्टनरशिप मध्ये करतात त्याला पार्टनरशिप फर्म म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये पार्टनरशिप फर्म विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत.

भागीदारी संस्था म्हणजे ज्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती व्यवसाय सुरु करण्यासाठी एकत्र येतात अश्या व्यवसायाला भागीदारी संस्था म्हणतात आणि भागीदारी फर्मला कोणतेही वेगळे कायदे नसतात जे वैयक्तिक फर्मला जे कायदे लागू होतात.

कारण या संस्थेला त्याच्या रचनेसाठी हे एक सामुहिक नाव दिलेले आहे. भागीदारी संस्था हि भारतीय भागीदारी कायदा १९३२ नुसार चालते आणि या कायद्यानुसार कंपनीचे नियम ठरवले जातात.

partnership firm information in marathi
partnership firm information in marathi

भागीदारी संस्था माहिती – Partnership Firm Information in Marathi

भागीदारी संस्था म्हणजे काय – partnership firm meaning in marathi

भागीदारी संस्था म्हणजे यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि ते व्यवसाय सुरु करतात किंवा व्यवसाय चालवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि कंपनीतून जितका फायदा होईल तो समान पध्दतीने वाटून घेतात अश्या संस्थेला भागीदारी संस्था असे म्हणतात.

भागीदारी करण्यासाठी आवश्यक अटी

भागीदारी संस्था सुरु करण्यासाठी कायद्यानुसार त्या संबधित व्यक्तीना काही अटी पूर्ण कराव्या लागतात आणि त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • भागीदारी संस्था सुरु करताना त्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असणे आवश्यक असते.
  • त्यांच्यामध्ये भागीदारी संस्थेचा एक करार झालेला असणे आवश्यक असते.
  • त्याचबरोबर यामध्ये नफा वाटून घेण्याचे सुरुवातीलाच ठरलेले असते.
  • व्यवसाय हा सर्वांच्यासाठी किंवा त्यामधील कोणीही व्यवसायामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे कारण सगळेच भागीदार स्लीपिंग पार्टन असू नयेत कमीत कमी एक तरी व्यवसायामध्ये कार्यरत असणे आवश्यक असते.

भागीदारी संस्था सुरु करतान विचारात घेतले जाणारे घटक – component

भागीदारी संस्था सुरु करताना अनेक घटक हे विचारात घ्यावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत. ते खाली आपण पाहणार आहोत.

  • भागीदारी संस्था सुरु करताना भागीदारांची संख्या किती आहे हे विचारात घेणे आवश्यक असते आणि हि संस्था सुरु करताना २ किंवा २ पेक्षा अधिक व्यक्ती त्यामध्ये समाविष्ट असणे आवश्यक असते आणि भागीदारी कंपनी कायद्यानुसार बँकिंग व्यवसायामध्ये १० पेक्षा जास्त व्यक्ती आणि इतर व्यवसायामध्ये २० पेक्षा अधिक व्यक्ती असले तर ते कायद्यानुसार बेकायदेशीर मानले जाते, म्हणजेच बँकिंग व्यवसायामध्ये १० पेक्सा अधिक आणि इतर व्यवसायामध्ये २० पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.
  • भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी वाटणी किंवा नफा वाटणी हा देखील एक महत्वाचा घटक आहे कारण भागीदार हे नफा वाटून घेण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी नफ्याची देखील समान आणि योग्य वाटणी होणे आवश्यक असते.
  • भागीदारी व्यवसाय सुरु करण्यासाठी त्या दोन व्यक्तींच्यामध्ये किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्यामध्ये भागीदारी करार असणे आवश्यक असते कारण ते कायदेशीर मानले जाते.

भागीदारी संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज कसा भरायचा – how to register

जर एखाद्या व्यक्तीला आपल्या भागीदारी कंपनीची नोंदणी करायची असल्यास त्यांना काही प्रक्रिया पार पाडावी लागते ती खाली आपण पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीला भागीदारी संस्था सुरु करायची असल्यास त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये आणि त्याच्या भागीदारांच्यामध्ये एक करार करावा लागतो आणि त्याला भागीदारी करार ( partnership dead ) असे म्हणतात आणि जो करार नोंदणीसाठी आवश्यक असतो.
  • त्याचबरोबर तुम्हाला नोंदणीसाठी अर्ज भरत असताना त्या अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे जसे कि भागीदारी करार, पत्याचा पुरावा आणि काही इतर कागदपत्रे.
  • कागदपत्रांची जुळवणी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या रजिस्ट्रार ऑफिसला भेट द्या आणि त्या ऑफिस मधून नोंदणीसाठी आवश्यक असलेला अर्ज प्राप्त करा.
  • आता तुम्हाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये आवश्यक आणि संपूर्ण माहिती भरा आणि अर्जामध्ये दिलेला सर्व तपशील भरा जसे कि भागीदारांचे नाव, कंपनीचे नाव, कंपनीचा पत्ता आणि इतर आवश्यक माहिती.
  • अर्ज भरताना इतर सर्व समर्थन कागदपत्रे समाविष्ट करा.
  • आता तुमचा अर्ज जमा करून नोंदणी करा आणि नोंदणीसाठी आवश्यक असलेली फी भरा आणि पेमेंट कन्फर्मेशन हे रजिस्ट्रार ऑफ फर्म कडे पाठवा.
  • आता तुम्हीं हे रजिस्ट्रार ऑफ फर्म कडे पाठवल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी होईल आणि सर्व माहिती बरोबर असल्यास त्यावर पुढे प्रक्रिया केली जाईल.
  • शेवटी पुरणे प्रक्रिया झाल्यानंतर नोंदणीचे प्रमाणपत्र जारी केले जाते.

भागीदारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे – documents

भागीदारी संस्था नोंदणीसाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि ती कोणकोणती आहेत. ते खाली आपण पाहणार आहोत.

  • भागीदारी कराराची मूळ प्रत आवश्यक असते.
  • भागीदारी नोंदणीसाठी अर्ज आवश्यक असतो.
  • भागीदारी फर्मच्या नावावर पॅन कार्ड असणे आवश्यक असते.
  • त्याचबरोबर प्रतिज्ञा पत्राचा एक नमुना देखील आवश्यक असतो.
  • सर्व भागीदारांचे पॅन कार्ड आणि पत्याचे पुरावे.
  • त्याचबरोबर भागीदारी फर्मचे मालकी करार, पत्याचे पुरावर, भाडेपट्टी आणि भाडे करार, ओळख पुरावा असे अनेक कागदपत्रे या कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असतात.

भागीदारांचे प्रकार – types of partners

  • सक्रीय भागीदार : या प्रकारचे भागीदार हे व्यवसायामध्ये सक्रीयपणे सहभाग घेतात आणि व्यवसायामध्ये चालेल्या सर्व कृतींच्यामध्ये सहभाग घेतो आणि आपले कर्तव्य पार पाडतो.
  • नाममात्र भागीदार : नाममात्र भागीदार हि एक व्यक्ती आहे जी भागीदारी फॉर्ममध्ये आपले नाव देते आणि त्यावेळी हे व्यवसायात कोणतेही वास्तविकपणे स्वारस्य देत नाही आणि या प्रकारच्या भागीदाराला संस्थेचा नफा वाटून घेण्याचा अधिकार नसतो.
  • उप भागीदार : उप भागीदार हा भागीदारी फर्ममधील आपला नफा फर्ममध्ये बाहेरील व्यक्तीसह सामायिक करण्यास सहमत असतो.
  • सुप्त भागीदार : सुप्त भागीदाराला स्लीपिंग भागीदार असे म्हतात आणि हा भागीदार करारानुसार संस्थेचा भागीदार असतो आणि परंतु तो व्यवसायामध्ये सक्रीयपणे भाग घेत नाही.

आम्ही दिलेल्या partnership firm information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भागीदारी संस्था माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या partnership firm deed format in marathi या dissolution deed of partnership firm in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about partnership firm माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये partnership firm meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!