parts of body information in marathi मानवी शरीराचे अवयव, आपल्याला सर्वांनाच शरीराच्या अनेक भागांच्याविषयी किंवा अवयवांच्या विषयी माहित आहे आणि हे शरीराचे वेगवेगळे अवयव हे सतत काही ना काही कार्य करत असतात आणि आज आपण या लेखामध्ये शरीराचे अवयव कोणते आहेत आणि ते कार्य कसे करतात या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मानवी शरीराचे एकूण ६५ ते ८० पर्यंत भाग आहेत आणि त्यामधील सामान्य म्हणजेच हात, पाय, काम, नाक, डोळे, पोट, पाठ, छाती, गुढगा, मांडी या सारखे अनेक अवयव असतात.
मानवी अवयव हे दोन प्रकारचे असतात ते म्हणजे बाहेरील अवयव आणि शरीरातील अवयव, बाहेरील अवयवांच्यामध्ये हात, पाय, कान, नाक आणि डोळे या सारखे अनेक इतर अवयव येतात तर शरीरातील अवयवांच्यामध्ये हाडे, हृदय, रक्तवाहिन्या, शिरा या सारख्या अनेक अवयवांचा समावेश होतो.
तसेच आपल्या शरीराच्या अवयावांच्यामध्ये पाच ज्ञानेद्रियांचा देखील समावेश होतो आणि खाली आपण त्या पाच ज्ञानेद्रीयांचे देखील कार्य काय आहेत ते पहाणार आहोत. आज आपण या लेखामध्ये खाली शरीर अवयवांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मानवी शरीर हे सर्व सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे ज्यामध्ये अवयव, जिवंत पेशी आणि ऊतक हे मानवी जीवाची संपूर्ण रचना करतात.
मानवी शरीराची रचना पहायला गेलो तर मानवी शरीराच्या अवयवांच्यामध्ये डोके, मान आणि धड हे जोडलेले चार अंग असतात. तसेच शरीराला त्याचा आकार देणे म्हणजेच कंकाल हे उपस्थी आणि हाडांनी बनलेला असतो.
मानवी शरीराचे आतील भाग म्हणजेच हृद्य, फुफ्फुस आणि मेडी या सारखे अनेक आतील अवयव हे कंकाल प्रणाली मध्ये बंदिस्त असतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असतात.
मानवी शरीराचे आतील आणि बाहेरील असे मिळून एकूण ६५ ते ८० अवयव आहेत परंतु आज आपण या लेखामध्ये महत्वाचे काही शरीराचे अवयव पाहणार आहोत.
बाहेरील अवयव
नाक
नाक हा एक शरीराचा महत्वाचा अवयव आहे आणि तो मानवाला श्वसन करण्यासाठी मदत करते आणि श्वसन करणे म्हणजेच आतील कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडणे आणि बाहेरील ऑक्सिजन आत घेणे हे नाकामुलेच शक्य होते आणि त्याचबरोबर नाक हे वास घेण्यासाठी देखील मदत करते. नाक हा अवयव आपल्या चेहऱ्याच्या मध्यभागी डोळ्यांच्या खाली आणि तोंडाच्या वर असते.
कान
कान देखील पान ज्ञानेंद्रिय मधील महत्वाचा अवयव आहे आणि कान हे चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला स्थित असतात आणि त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू शकतो. कानामुळे आपण पुढच्या व्यक्तीचे बोलणे, संभाषण, गाणी, संगीता आणि अनेक प्रकारचे आवाज ऐकू शकतो.
डोळे
डोळा हा देखील ज्ञानेंद्रिय मधील महत्वाचा अवयव आहे जो खूप नाजूक असतो परंतु आपल्याला त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. डोळे हे आपल्याला जगातील सुंदर गोष्टी पाहण्यासाठी आणि अनेक सुंदर सुंदर गोष्टी वाचण्यासाठी मदत करते.
मान
मान हा देखील शरीराचा एक भाग आहेत आणि मान हा अवयव डोके हलवण्यासाठी मदत करतो आणि हे डोके एका बाजूने दुसरीकडे हलवण्यास अनुमती देते.
तोंड
तोंड हा देखील मानवी शरीराचा एक भाग आहे आणि यामुळे आपण अन्न शरीरामध्ये घालू शकतो आणि तोंडाला पचनसंस्थेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते आणि आपण अन्न आणि पाणी जे तोंडावाटे शरीरामध्ये घालवले जाते. तोंडामध्ये दात, जीभ आणि लाळग्रंथी असतात आणि ह्या अवयवापैकी जीव चव पाहण्याचे कार्य करते तसेच दात अन्न बारीक करण्याचे काम करतात.
डोके
डोके हा मानवी शरीराचा एक महत्वाचा भाग आहे आणि या डोक्यामध्ये मेंदू स्थित असतो आणि मेंदू हा महत्वाचा अवयव आहे कारण आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवणे, विचार करणे हे सर्व मेंदूमुळे शक्य होते.
छाती
छाती म्हणजे मान आणि पोट यांच्यामध्ये असणाऱ्या भागाला छाती म्हटले जाते आणि या भागामध्ये आत हृदय, फुफ्फुस, श्वसननलिका या सारखे महत्वाचे अवयव असतात.
हात आणि पाय
हात आणि पाय हे मानवी शरीराचे बाहेरील अवयव आहेत हे सर्वांना माहित आहे. हाताचा वापर हा अनेक हालचाली करण्यासाठी आणि काम करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर पाय हे आपल्याल चालण्यासाठी, पळण्यासाठी किंवा एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतात.
गुढघा, घोटा, पाठ, पोट, हनुवटी, बोटे, नाभी, कंबर, मनगट आणि इतर बाहेरील शरीराचे भाग असतात.
आतील अवयव
हाडे
हाडे हा देखील शरीराचा एक महत्वाचा भाग आहे आणि आपल्या शरीराची संपूर्ण रचना हि हाडांनी बनलेली आहे म्हणजेच हाडे आपल्या संपूर्ण शरीराला आधार देण्याचे काम करतात.
हृदय
हृदय देखील शरीरामधील एक महत्वाचा अवयव आहे कारण आपण ह्रदयावर जगू शकतो म्हणजेच हृदय जर चांगले कार्य करत असेल तर आपण चांगले राहू शकतो आणि जगू शकतो. हृदय हा असा एकमेव शरीरातील अवयव आहे जो रक्ताचे उत्प्रेक्षण करतो आणि शरीराच्या इतर अवयवांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करतो.
यकृत
यकृत हे शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे आणि हे रक्तामधील असणारे साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये फिल्टर प्रक्रिया करून त्यामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम देखील यकृतच करते.
दात
दात देखील शरीराचा आतील भाग आहे आणि दात हे जरी लहान अवयव असले तरी ते मुख्य कार्य करतात म्हणजेच ते आपण घेतलेले अन्न बारीक करण्यास मदत करते.
जीभ
जीभ हा एक महत्वाचा अवयव आहे ज्यामुळे तुम्हाला पदार्थाची चव आंबट, गोड, तिखट आहे ते समजण्यास मदत होते म्हणजेच जीभ हा अवयव चवीचा संदर्भ देते.
फुफ्फुसे
फुफ्फुसे हा शरीरातील एक महत्वाचा घटक आहे म्हणजेच हा श्वसन संस्थेशी संबधित घटक आहे म्हणजेच आपण जो श्वास घेतो तो फुफ्फुसांच्या मदतीने श्वास घेतो कारण फुफ्फुसच आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते.
मूत्रपिंड
मूत्रपिंडाद्वारे शरीरातील विषारी आणि नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते त्यामुळे मूत्रपिंड देखील एक महत्वाचा घटक आहे .
मेंदू
मेंदू हा देखील शरीराचा महत्वाचा अवयव आहे म्हणजेच याला शरीराचे नियंत्रण केंद्र म्हणून ओळखले जाते यामुळे विचार, संवेदना आणि भावना यासारखे अनेक कामे मेंदूद्वारे केली जातात. कवठी मध्ये मेंदू असल्यामुळे तो कोणत्याही दुखापती पासून सुरक्षित राहतो. मेंदू मुख्य तीन उपभागांच्यापासून बनलेला असतो ते म्हणजे ब्रेनस्टेम, सेरेबेलम आणि सेरेब्रम.
रक्तवाहिन्या
रक्तवाहिन्या ह्या देखील महत्वाच्या अवयवांच्यापैकी एक आहे आणि हे शरीरातील अनेक अवयवांना आणि मुख्य म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा करण्याचे काम करते.
आम्ही दिलेल्या parts of body information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मानवी शरीराचे अवयव माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या parts of body meaning in marathi या parts of the body in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि name of the body parts in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये parts of body name in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट