मोर पक्षाची माहिती Peacock Information in Marathi

Peacock Information in Marathi आपल्या सर्वांना माहीतच आहे कि मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि मोर असतो. या पक्ष्याचा रंग निळा आणि हिरवट रंगाचा असतो, मान लांब, डोक्यावर तुरा, लांब आणि मोहक पिसारा असे या पक्ष्याचे वर्णन आहे. मोर त्याचा पिसारा फुलवून पावसामध्ये नृत्य करतात (काही लोक असे म्हणतात कि त्याच्या साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो) आणि हा त्याचा फुललेला पिसारा पाहून मन अगदी प्रसन्न होते. प्राचीन काळापासून मोराने आपल्या तोऱ्याने आणि सुंदरतेने अनेक कवींचे, योध्यांचे आणि देवांची माणे सुध्दा आकर्षित केली आहेत. मोर हा पक्षी फॅजिअॅनिडी या कुळातील असून या पक्ष्याच्या ३ जाती आहेत.

peacock information in marathi
peacock information in marathi / peacock in marathi

मोर पक्षाची माहिती – Peacock Information in Marathi

नावमोर
प्रकारपक्षी
वैज्ञानिक नावपावो क्रीस्टाटस
रंगहिरवा. निळा, तपकिरी, करडा ( मोर हा पक्षी विभिन्न रंगाचा असतो ).
आकार / लांबी८६ सेंटी मीटर ते १०५ सेंटी मीटर
वजन३ ते ६ किलो
आयुष्यमान१२ ते २० वर्ष

मोर कुठे व कसे राहतात ( habitat )

मोर हा पक्षी थव्यामध्ये राहतो त्यामध्ये एक मोर आणि तीन ते चार लांडोरी असतात. मोर हा पक्षी पानझडीच्या जंगलामध्ये किवा शेतामध्ये पाहायला मिळतात आणि या पक्ष्यांचे निवास स्थान नदी किवा ओढ्याच्या किनारी असते. मोर हा पक्षी रात्री झाडावर झोपतो.

मोर पक्ष्याचा आहार ( food )

मोर हा सर्वभक्षी पक्षी आहे आणि या पक्ष्याला धान्य, कीटक, साप, सरडे, झाडाची कोवळी पणे या प्रकारचे अन्न खाण्यासाठी लागते.

मोर या पक्ष्याचे 3 प्रकार ( types of peacock bird )

मोर या पक्ष्याचे मुख्यता प्रकार आहेत ते म्हणजे आणि ते म्हणजे इंडियन पींफॉल, ग्रीन पींफॉल आणि कांगो पींफॉल

1.इंडियन पींफॉल मोर ( indian peafowl peacock )

इंडियन पींफॉल या मोराला सामान्य मोर किवा निळ्या रंगाचा मोर म्हणूनही ओळखले जाते. इंडियन पींफॉल मोर हा भारतीय उपखंडातील मुळची जात आहे. या प्रकारचा मोर आपल्याला भारतामध्ये सगळीकडे पाहायला मिळतो आणि या जातीचा मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचबरोबर या जातीचा मोर श्रीलंका, दक्षिण आशिया आणि पाकीस्थान मध्येही आढळतो. या पक्ष्याचा रंग निळा आणि हिरवट रंगाचा असतो, मान लांब, डोक्यावर तुरा, लांब आणि मोहक पिसारा असे या पक्ष्याचे वर्णन आहे या पक्ष्याच्या पिसाऱ्याने अर्धे शरीर झाकलेले असते. मोर त्याचा पिसारा फुलवून पावसामध्ये नृत्य करतात. नर आणि मादी हि दिसायला वेगवेगळे असल्यामुळे यांना ओळखणे खूप सोपे असते.

नावइंडियन पींफॉल मोर
प्रकारपक्षी
रंगनिळा आणि हिरवट
वजन३ ते ६ किलो
अकरा / लांबी२०० ते २२५ सेंटी मीटर

2.कांगो पींफॉल मोर ( congo peafowl peacock )

कांगो पींफॉल मोर या मोराला आफ्रिकन पींफॉल या नावानेही ओळखले जाते. या जातीच्या मोराचे शास्त्रीय नाव आफ्रोपावो कॉन्गेन्सीस असे आहे. हा एक मोठ्या आकाराचा मोर आहे तसेच या पक्ष्याचे पंख हे हिरवे आणि व्हायलेट रंगाचे असतात आणि या मोराची मान लाल रंगाची असते, राखाडी पाय, १४ पंख असलेली एक काळी शेपूट आणि मुकुट उभ्या पांढऱ्या लांबलचक केसासारख्या पंखांनी सुशोभित केलेला असतो, हिरव्या रंगाची पाठ, तपकिरी रंगाची छाती, काळ्या रंगाचे उदर असे या पक्ष्याचे वर्णन आहे.

नावकांगो पींफॉल मोर
प्रकारपक्षी
रंगभिन्न रंग ( हिरवा , राखाडी, व्हायलेट, तपकिरी, काळा, लाल )
वजन४ ते ६ किलो
अकरा / लांबी६५ ते ७० सेंटी मीटर

3.ग्रीन पींफॉल मोर ( green peafowl peacock )

ग्रीन पींफॉल मोर हे उष्णकटिबंधिय प्रदेशमध्ये राहणे पसंत करतात आणि या प्रकारचे मोर हे दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रकाचे मोर हे धोक्यात आले आहेत या प्रकारच्या मोरांची संख्या खूप कमी झाली आहे आणि हे आययुसीएन च्या रेड लिस्ट मध्ये आहेत. हे मोर देखील इंडियन पींफॉल मोरासारखे दिसायला असतात पण या मोरांचा रंग हिरवट असतो. या प्रकारचे मोरांमध्ये नर आणि मादी दिसायला एक सारखेच असतात.

नावग्रीन पींफॉल मोर
प्रकारपक्षी
रंगहिरवा
वजन४ ते ६ किलो
अकरा / लांबी१.८ ते ३ मीटर

मोर पक्ष्याविषयी काही मनोरंजक तथ्ये ( interesting facts about peacock bird )

 • मोराच्या पंखामध्ये सूक्ष्म रचना असतात ज्या क्रिस्टल्ससारख्या दिसतात.
 • मोराच्या शेपटीने त्याच्या शरीराचा ६० टक्के भाग झाकला जातो.
 • मोराला प्रत्येक पायाला ४ बोटे असतात.
 • मोर या पक्ष्याला जर घरामध्ये पाळले तर हा पक्षी ४५ ते ५० वर्षापर्यंत जगू शकतात.
 • मोराच्या एकूण ३ जाती आहेत आणि त्यामधील २ आशिया आणि आफ्रिका मधून आहेत.
 • कोल्हा, वाघ, बिबट्या आणि रानमांजर हे मोराचे शत्रू आहेत.
 • मोर पक्ष्याच्या डोक्यावर एक तुरा असतो ज्याला मुकुट या नावानेही ओळखले जाते आणि म्हणून या पक्ष्याला पक्ष्यांचा राजा म्हंटले जाते.
 • नर पक्ष्याला मोर म्हणतात आणि मादी पक्ष्याला लांडोरी म्हणतात. लांडोरी मोर एवढी सुंदर आणि आकर्षक नसते आणि आपण मोरामधील नर आणि मादी सहजपणे ओळखू शकतो.
 • मोर हे पक्षी उडू शकतात पण हे हवेमध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत त्यांना जमिनीवर चालायला खूप आवडते.
 • मोर हा पक्षी भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा एक भाग आहे.
 • मोराला संस्कृतमध्ये मयूर म्हणतात आणि इंग्रजीमध्ये मोराला peacock म्हणतात.

मोराविषयी काही प्रश्न ( questions about peacock bird )

मोराचा आवाज काय आहे ? 

मोर हा पक्षी आहे कि हा वेगवेगळ्या कारणासाठी आवाज काढत असतो जसे कि ज्यावेळी मोराचा प्रजनन काळ असतो त्यावेळी मोर जोरात आवाज काढतात. तसेच ज्यावेळी वसंत ऋतूमध्ये या पक्ष्याला पावसाची चाहूल लागते त्यावेळी मोर हा पक्षी आवाज काढतो तसेच रात्रीच्या वेळी इतर शेजारील पक्षी आवाज काढतात त्यावेळी हे पक्षी त्यांना सूर देण्यासाठी आवाज काढतात. आपण ऐकल्या जाणाऱ्या  प्रकारच्या अवजा व्यतिरिक्त वेगवेगळ्या लिंगाद्वारे उत्सर्जित होणारे सुमारे ७ प्रकारचे आवाज ओळखले गेले आहेत.

घरामध्ये मोराचे पंख का ठेवावेत ? 

वास्तूशास्त्रामध्ये मोराच्या पंखांना महत्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या उत्तरेकडील बाजूस मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते कारण असे केल्याने घरामध्ये संपत्ती आणि आनंदाचा कधीच कमी होत नाही त्याचबरोबर जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर मुख्य दरवाज्याजवळ गणपतीची मूर्ती किवा चित्रासह तीन मोराचे पंख ठेवावेत त्यामुळे वास्तुदोष दूर होईल.

मोराच्या पंखांचे फायदे ? 

सौभाग्य, संपन्नता, संपत्ती आणि समृध्दीसाठी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि लक्ष्मीची हि वैशिष्ठ्ये आत्मसात करण्यासाठी मोराच्या पंखांचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर जर घरामध्ये बासरीबरोबर मोराचे पंख ठेवल्यास नात्यामध्ये प्रेम वाढते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा मोर पक्षी peacock information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. peacock information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about peacock in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही मोर पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या peacock in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. morachi mahiti marathi अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!