पाईन वृक्षाची माहिती Pine Tree Information in Marathi

pine tree information in marathi पाईन वृक्षाची माहिती, झाडांचे अस्तित्व ३७ कोटी वर्षांपासून आहे आणि माणसांच्या आयुष्यामध्ये झाडाला महत्वाचे स्थान आहे. झाड हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि गाड्यांच्या मधून येणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जगभरामध्ये अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच पाइन हा देखील एक झाडाचा प्रकार आहे आणि आज आपण या लेखामध्ये ‘पाइन’ या झाडाविषयी माहिती घेणार आहोत.

पाइन हि झाडे जगभरामध्ये सगळीकडे आढळणारी सदाहरित झाडे आहेत आणि हि झाडे शंकूच्या आकारामध्ये वाढतात आणि हि मुळची उत्तर समशीतोष्ण प्रदेशातील आहेत. पाइन या झाडांचे शंभर पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि हि जगभरामध्ये प्रसिध्द आहेत आणि हि झाडे जंगलामध्ये मोकळ्या जागी चांगल्या प्रकारे वाढतात.

pine tree information in marathi
pine tree information in marathi

पाईन वृक्षाची माहिती – Pine Tree Information in Marathi

झाडाचे नावपाइनचे झाड
उंची१० फुट ते २४० फुट
आयुष्य१०० ते १०००
वंशपीनस
कुटुंबपिनासी

पाइनच्या झाडाविषयी महत्वाची माहिती – pine tree in marathi

पाइनची झाडे हि पीनस या वंशातील असून हि झाडे पिनोप्सीडी वर्गातील आणि पिनासी कुटुंबातील आहे आणि या झाडाच्या १०० ते ११५ प्रजाती आहेत. पाइनची झाडे हि रिकाम्या जागी उंच वाढतात आणि या झाडाची पाने टोकदार असतात आणि हि पाने वर्षभर हिरवीगार राहतात.

या झाडांची उंची हि प्रजातीवर वाढते जसे कि काही प्रजाती ह्या २४० फुट उंच वाढतात तर काही फक्त १० फुट उंच वाढतात. पाइनची झाडे हि उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये वाढू शकतात आणि ह्या झाडांचे आयुष्य जास्त असते म्हणजेच हि झाडे १०० ते १००० वर्ष जगू शकतात.

पाइनच्या झाडाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • पाइनची झाडे हि खराब मातीमध्ये देखील वाढू शकतात किंवा खराब माती देखील सहन करू शकतात आणि हि झाडे जास्त उंचीवर देखील वाढतात ज्या ठिकाणी मातीचा थर कमी आहे तसेच हे वालुकामय किनारपट्टीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी कमी सुपीकता आहे त्या ठिकाणी देखील वाढतात.
  • पाइनची झाडे उत्त आफ्रिका आणि दक्षिण फ्रान्स या ठिकाणी देखील आढळू शकतात.
  • पाइनच्या झाडांना फुले आणि फळे नसतात.
  • ज्यावेळी जंगलामध्ये काही कारणाने आग लागते त्यावेळी जंगलातील अनेक झाडे जळून जातात परंतु पाइनची झाडे हि बाहेरील साल काढून टाकतात आणि आगीमध्ये देखील टिकून राहतात.
  • पाइन झाडाची साल खवलेयुक्त असते तसेच झाडाच्या खोडावर व्यवस्थित असते आणि पाइच्या झाडाची सुईच्या आकाराची सुधारित अशी पाने फांद्यावर दोन किंवा पाच गुच्छांमध्ये वाढतात.
  • ख्रिश्चन धर्मामध्ये पाइच्या झाडाला खूप महत्व आहे म्हणून ख्रिसमसला या झाडाची सजावट केली जाते.
  • हि झाडे सदाहरित आहेत कारण ह्या झाडाची पाने हि २ वर्ष हिरवी राहू शकतात आणि त्यानंतर ती गळतात तसेच ब्रिस्टलकोन पाइन या झाडाच्या प्रकारामध्ये झाडाची पाने हि ३० वर्ष टिकू शकतात.
  • या झाडाची पाने हि हिरवीगार सुई सारखी असतात आणि हि १ ते ११ इंच लांब असतात.
  • पाइनची झाडे हि दीर्घायुषी असतात म्हणजेच हे १०० ते १००० वर्ष जगू शकतात आणि यामधील ब्रिस्टलकोन पाइन झाडाचा प्रकार हा ४००० हजार वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकतो.
  • शंकूच्या आकाराचे झाड हे शंकूच्या आकाराचे बीज रचना तयार करते ज्याला सामान्यता पाइनकोन्स म्हणतात.
  • सर्वात लहान पाइन वृक्ष हे सायबेरीयन बटू झुरणे ( पीनस पुमिला ) हे आहे ज्या झाडाची उंची ३ ते १० फुट असते आणि सर्वात मोठे पाइनचे झाड हे पोंडेरोसा पाइन हे आहे ज्याची उंची २५० फुट असते.
  • ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन हे गृहातील सर्वात जुन्या जिवंत झाडांपैकी एक आहे.
  • पाइनची झाडे युरोप, अमेरिका, आशिया आणि उत्तर आफ्रिकेत आढळतात.
  • सध्या अनेक पाइन झाडांच्या प्रजातींची संख्या कमी होत आहे आणि यामध्ये पराना पाइन या प्रजातीचा समावेश आहे.

पाइनच्या झाडांच्या प्रजातीची यादी – list

पाइनचे झाड हे जगभरामध्ये सर्व ठिकाणी आढळणारे झाड आहे आणि ह्या झाडाच्या ११५ पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि खाली आपण पाइनच्या झाडांच्या काही प्रजातींची नावे पाहणार आहोत.

क्र.  प्रजातीचे नाव
1सुमात्रन पाइन
2कॅनरी बेट पाइन
3चीर पाइन
4अपाचे पाइन
5सिकांगा पाइन
6कोरियन लाल पाइन
7माउंटन पाइन
8तुर्की झुरणे
9चीनी लाल पाइन
10तैवान लाल पाइन
11 युरेपियन काळा पाइन
12व्हर्जिनिया पाइन
13बेसिन ब्रिस्टलकोन पाइन
14जेफ्री पाइन
15जॅक पाइन

पाइन झाडाचे फायदे – pine tree benefits in marathi

  • पाइनची झाडे हि सजावटीसाठी देखील वापरली जातात जी उंचीने लहान असतात आणि तसेच या झाडाला ख्रिसमस ट्री म्हणून ओळखले जाते आणि हे झाड ख्रिसमसमध्ये सजावटीसाठी वापरले जातात.
  • शोभेचे झाड म्हणून उद्याने आणि बागांच्यामध्ये हि झाडे लावली जातात.
  • पाइनचे झाड हे गीलहरी आणि इतर पक्ष्यांचे तसेच जंगलातील इतर छोट्या प्राण्यांचे निवासस्थान असू शकते.
  • पाइनच्या झाडाच्या सालांच्यापासून जी राळ गळते त्याचा वापर तेल आणि परफ्युम बनवण्यासाठी लकेला जातो.

आम्ही दिलेल्या pine tree information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाईन वृक्षाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pine tree information in marathi language या pine tree information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pine tree in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!