Pithale Recipe in Marathi पिठलं रेसिपी मराठी आपण रोज जेवणामध्ये काही ना काही वेगवेगळ्या भाज्या बनवतो आणि ज्यावेळी भाजारातून आणलेल्या भाज्या संपतात त्यावेळी किंवा गडबडीच्या वेळे आपल्या डोक्यालमध्ये एकाच भाजीचा प्रकार येतो तो म्हणजे बेसन पिठले कारण हा पदार्थ खूप झटापट बनतो आणि खूप छान देखील लागतो. पिठले हे बेसन पिठापासून बनवले जाते आणि हा एक पारंपारिक किंवा खूप जुना पदार्थ आहे जो लोक आजही तितक्याच आवडीने बनवू खातात. पिठले बनवताना आपण तेलामध्ये मोहरी, जिरे कडीपत्ता, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर हे साहित्य घालून त्याला फोडणी दिली जाते.
आणि मग त्यामध्ये पाणी घालून त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घातले जाते ते शिजवले जाते. पिठलं बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आज आपण या लेखामध्ये पिठलं रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
पिठलं रेसिपी मराठी – Pithale Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पिठले बनवताना आपण तेलामध्ये मोहरी, जिरे कडीपत्ता, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर हे साहित्य घालून त्याला फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये पाणी घालून त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घातले जाते ते शिजवले जाते.
पिठलं हि एक भारतामध्ये बनवली जाणारी पारंपारिक रेसिपी आहे. म्हणजेच हि रेसिपी खूप पूर्वीच्या काळापासून बनवतात आणि आजही हि रेसिपी भारताच्या बहुतेक भागामध्ये बनवली जाते. पिठलं हि रेसिपी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून बनवले जाते आणि हि रेसिपी लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची घालून देखील बनवता येते. चला तर मग आता आपण पिठलं कस बनवायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पिठले बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेकदा घरामध्ये उपलब्ध असते आणि जर नसेल तर आपण ते बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग आता आपण पिठलं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ / बेसन.
- १ वाटी पाणी.
- १ ते दीड चमचा लाल मिरची पावडर.
- १/४ चमचा हिंग.
- १/३ चमचा मोहरी.
- १/३ चमचा हळद.
- ५ ते ६ पाने कडीपत्ता.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- ५ ते ६ पाकळ्या लसून ( ठेचलेला )
- २ ते ३ चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली )
- पिठलं बनवताना पिठले बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य एकत्र घेवू ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला. आता ते तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा घाला आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि कांदा चांगला भाजला कि त्यामध्ये लसून घाला आणि लसून देखील चांगला भाजा.
- आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी घाला आणि ते मिक्स करा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
- पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये बेसन पीठ घाला हळू हळू घाला आणि ते चमच्याने हलवत रहा आणि ते फोडणी मध्ये मिक्स करा ( पीठ घालताना त्यामध्ये पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या ).
- पिठलं जास्त घट्ट होऊ देवू नका ते थोडे सरसरीत असी द्या आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला आणि पिठलं ५ ते ६ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या.
- तयार झाले खमंग आणि टेस्टी पिठलं.
- अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ / बेसन.
- १ वाटी पाणी.
- दीड ते २ चमचे हिरवी मिरची पेस्ट.
- १/४ चमचा हिंग.
- १/३ चमचा मोहरी.
- १/२ चमचा हळद.
- ५ ते ६ पाने कडीपत्ता.
- ५ ते ६ पाकळ्या लसून ( ठेचलेला )
- २ ते ३ चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली )
- पिठलं बनवताना पिठले बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य एकत्र घेवू ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला. आता ते तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये कडीपत्ता आणि ठेचलेला लसून घाला आणि हा लसून थोडा वेळ तेलामध्ये भाजा.
- आता यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद आणि हिंग घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी घाला तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
- पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये बेसन पीठ घाला हळू हळू घाला आणि ते चमच्याने हलवत रहा आणि ते फोडणी मध्ये मिक्स करा आणि पिठलं जास्त घट्ट करू देऊ नका ते सरसरीत होऊ द्या.
- आता त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करा आणि पिठलं ५ मिनिटे शिजू द्या.
- हिरव्या मिरचीचे पिठले सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
पिठलं कश्यासोबत खातात – serving suggestions
- पिठलं हि रेसिपी आपण भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खावू शकतो. आणि जर पिठलं आणि भाकरी गरम असेल तर ते खूप छान लागते.
आम्ही दिलेल्या pithale recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पिठलं रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pitla recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dry pithale recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये besan pithale recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट