राजकारण मराठी लेख Politics In Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या या सदरात आपण politics in marathi म्हणजेच ‘राजकारण’ या शब्दावर भाष्य करणार आहोत. राजकारण म्हटलं की बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना तयार झाल्या असतील. किंबहुना ते अगदी खरंच आहे.राजकारण ही कल्पनाच मुळी डोकेदुखी भासते. याचे कारण म्हणजे राजकारण या शब्दाचा अर्थ जरी राष्ट्रहितासाठी एकत्रितपणे निर्णय घेऊन सरकार चालवणे असा असला तरी राजकारण या शब्दामागे दडलेली असंख्य अदृश्य कटकारस्थाने  आपल्याला अजाणतेपणी दिसू लागतात.

politics-in-marathi-rajkaran
राजकारण मराठी मध्ये

राजकारणाबद्दल सर्वसामान्य दृष्टिकोन (General Approach Towards Politics)

राजकारण म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके पुढारी , त्यांचे मिश्किल हसरे चेहरे, हाथ जोडून उभी असलेली (निवडणुकीपूर्ती ) त्यांची आकृती, त्यांची भाषणे, आश्वासने, वचने, विरोधी पक्ष व त्यावर केलेल्या टीका , युक्तिवाद, सभा, बैठका, चळवळी, निवडणुका, प्रचार, त्यांच्या मागेपुढे फिरणारे कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते, त्याच कार्यकर्त्यांनी चौकाचौकात लावलेली आपल्या आवडत्या पुढाऱ्यांची फलक, नेत्यांच्या आलिशान लाल दिव्यांच्या गाड्या, व्हॉटसअप वर लावण्यात आलेली राजकीय स्टेटस, राजकीय quotes , इत्यादी. व अशा अनेक रंगांनी राजकारण पूर्ण होत आले आहे.

राजकारण करण्याची कारणे (Reasons Behind Politics)

पण या सर्व ‘अथक परिश्रमा’मागे दडली आहे एक सुप्त आणि स्वार्थी उद्दिष्टं , ती म्हणजे ‘ खुर्ची’ . आपल्या राजकीय वर्चस्वासाठी किंवा status साठी करण्यात  आलेला हा खटाटोप, फक्त आणि फक्त या खुर्ची साठी करण्यात आलेली एक स्पर्धा म्हणजेच राजकारण का हो? अशा या स्पर्धेत ना कोणते नियम आहेत ना कोणत्या अटी . जरी हे नियम असलेच तर हे पाळावेच अशी कोणालाच गरज वगैरे वाटत नाही. कारण एकदा खुर्ची मिळाली तर ज्या जनतेच्या सेवेसाठी हे प्रचंड राजकारण करून ही खुर्ची मिळते त्याच जनतेला मूर्ख कसे बनवता येईल याचे नियमही स्वतःच तयार केले जातात.

कारण जनतेने स्वतः पाहिले आहे आश्वासने, मागण्या व हक्क किती पूर्ण केले जातात आणि नाही. आपण अगदी जवळचे उदाहरण घेतलं तरी चालेल ते म्हणजे मराठा आरक्षण . कितीतरी पुढारी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुढे सरसावले हे प्रशंसनीय आहे पण त्यातले सर्वच शेवट पर्यंत साथ देत नाही असे चित्र दिसत आहे. म्हणजे लोकांच्या किंवा जनतेच्या मनात घर करण्यासाठीच का हा उठाठेव?

असे राजकारण करण्यासाठी कोणताही विषय पुरेसा पडताना दिसत आले आहे. सिनेमातल्या अभिनेत्याची आत्महत्या, भारतातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध परदेशी दिग्गजांनी उठवलेला आवाज, असंख्य बलात्काराच्या घटना यासारख्या अनेक गोष्टींचा आणि घटनांचा वापर फक्त दुसऱ्या पक्षावर टीकास्र सोडून आपली बाजू उचलून धरण्यात म्हणजेच राजकारण करण्यात आलेला दिसून येत आहे.

राजकारणाचा खरा अर्थ (Meaning Of Politics in Marathi)

लोकसंख्येच्या तुलनेत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश मानला जातो. भारतासमोर लोकसंख्या हा अगदी भीषण प्रश्न आ वासून उभा आहे. या लोकसंख्येमुळे येणाऱ्या कितीतरी अडचणी भारताच्या विकासात बाधा बनत चालल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. त्याबरोबर गरिबी, खालावलेला राहणीमानाचा दर्जा, निकृष्ट दर्जाचे शिक्षण,  अन्न ,वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे, यामुळे वाढती गुन्हेगारी इत्यादी सारख्या प्रश्नांना मुळासकट  सोडवण्यासाठी ‘ खुर्ची ‘  म्हणजेच राजकीय अधिकार व त्याबरोबरच निर्भिड नेतृत्वाची सुद्धा गरज लागते . अशा लोकांच्या किंवा जनतेच्या प्रश्नासाठी , निस्वार्थी पणे लढा देण्यासठी आणि सतत जनतेच्या हक्कासाठी  लढल्या जाणाऱ्या राजकारणाला जनता सदैव पाठिंबा देत राहील.

राजकारणाची खरी सुरुवात (The Beginning Of Politics)

राजकीय वर्चस्वासाबरोबर आपण काहीवेळ व्यक्तिगत वर्चस्वाचा विचार केला तर राजकारण हे अगदी आपल्या घरातूनच सुरू होते. म्हणजे अगदी लहापणापासूनच आपण आईवडिलांचे लाडके होण्यासाठी आपल्याच भावंडांबरोबर भांडत असतो. शेतजमिनीच्या वाटणी वरून कित्येक सख्ख्या भावाभावात झालेले वाद अजूनही आपण वर्तमान पत्रात वाचत असतो. त्यामुळे असे म्हणता येईल की ही लढाई ही स्पर्धा अगदी घरातूनच सुरू होते. आणि जेव्हा ही स्पर्धा घरातून घराबाहेर येते तेव्हा ती समाजातल्या इतर घटकाबरोबर सुरू होते. कॉर्पोरेट क्षेत्रात तसेच क्रीडा , चित्रपट, उद्योगधंदे इत्यादी सारख्या क्षेत्रात देखील अदृश्य रुपात राजकारण चालू असताना आपल्याला दिसून येते.

राजकारणाची व्याख्या ही राजकीय व सामाजिक वर्चस्वासाठी नसून ती इतर क्षेत्रामध्येही लागू पडते. पण सर्व साधारणपणे राजकारण हे ग्रामीण,राष्ट्रीय व जागतिक स्तरावर राजकीय अधिकारांसाठी केल्या गेलेल्या कुरघोडीनाच आपण राजकारण म्हणून पाहतो. ग्रामीण स्तरावरील राजकारण, राष्ट्रीय पातळीवर राजकारण आणि जागतिक राजकारण यामध्ये हेतू हा राजकीय वर्चस्वाचा वा अधिकाराचा असला तरी ते मिळवण्याचे मार्ग खूप भिन्न आहेत.

ग्रामीण, राष्ट्रीय व जागतिक राजकारण (Rural, National & Global Politics)

ग्रामीण भागात होणाऱ्या राजकारणाचा प्रभाव हा प्रत्यक्षपणे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत होत असतो. किंबहुना सर्व स्तरातील लोकांना त्याचे फायदे तोटे झेलावे लागतात. जर तसे झाले नसेल त्याच्याबद्दल माहिती करवून घेण्याचा वेग राष्ट्रीय व जागतिक पातळीवरच्या राजकारणाच्या दृष्टीने जास्त असतो. म्हणजेच लवचिकता ही जास्त दिसून येते. आपण राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये जी धोरणं जनतेच्या सेवेसाठी अखली जातात, जी आश्वासने दिली जातात त्याची पूर्तता होण्याची शाश्वती तर मिळत नाही पण काहीप्रमाणात यशस्वी झालेल्या सेवेंचा लाभ समाजातील आर्थिक वा सामाजिक दृष्ट्या खालच्या स्तरातील घटकांपर्यंत पोहोचत नाही. भारत सरकार शेतकऱ्यांच्या, लघु मध्यम व मोठे उद्योगधंदे, विद्यार्थी अशा समाजातील घटकांना त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी बऱ्याच योजना आखत असते आणि अमलात सुध्दा आणत असते परंतु त्याचा फायदा अपेक्षित इतक्या प्रमाणात होताना दिसत नाही. कारण या योजनेचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी काय प्रक्रिया आहे याची माहिती लोकांना नसते. कारण या योजनेसाठी जितका निधी मंजर झालेला असतो त्याला ही भ्रष्टाचाराचं वलय स्पर्श करत असतं. अशावेळी हेच राज्यकर्ते ‘ राजकारण ‘ अगदी चांगल्या पद्धतीने वठवतात.

जागतिक स्तरावरच्या राजकारणात देखील वर्चस्वाची स्पर्धा दिसून येते. आणि या राजकारणात अगदी टोकाच्या भूमिकाही घेतल्या जातात. युद्ध, महायुद्ध , त्यातूनच आतंगवाद , आतंगवादी संघटना जन्म घेतात. यातून होणाऱ्या वाईट परिणामाचा मात्र समाजातल्या प्रत्येक घटकावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या प्रभाव पडत असतो.

अशा प्रकारे राजकारण हे आपल्या घरापासून जागतिक स्तरापर्यंत वैयक्तिक वर्चस्वासाठी किंवा एका गटाच्या, राष्ट्राच्या वर्चस्वासाठी चालूच असताना आपण पाहत आलो आहोत. तसेच राजकारण ही संकल्पना एक दोन वाक्यात सांगता येणारी नसून ती प्रचंड व्यापक असून विविध पैलूंनी बनलेली आहे, हेही आपल्याला दिसून येते.जसे लढाई मध्ये हल्ले, प्रतीहल्ले, पेच डावपेच, निधड्या छात्या ,आणि गनिमी कावे आले अगदी त्याचप्रमाणे या राजकारणात एक मेकांवर केले जाणारे शब्दिक हल्ले प्रतिहल्ले, टीका, आश्वासने, मोहिमा आल्या. पण या राजकारणात लढाई सारखे नियम नाहीत ना अटी. राजकारणाची ही लढाई जिंकण्याअगोदर व जिंकल्यानंतर देखील स्वैराचार चाललेला आपण पाहत आलो आहोत. त्यामुळेच दुर्दैवाने राजकारणाकडे बघताना नकारात्मक नजरेने आपोआपच बघितले जाते.

Political Status in Marathi / Rajkaran Quotes in Marathi

आम्ही लवकरच आपल्यासाठी सुंदर अशा राजकारनाबाद्दल्च्या attitude status घेऊन येणार आहोत.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर Politics म्हणजेच राजकारण या विषयाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या politics information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि politics in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!