पॉलिटेक्निक म्हणजे काय? Polytechnic Meaning in Marathi

polytechnic meaning in marathi – polytechnic information in marathi पॉलिटेक्निक म्हणजे काय?, सध्या भारतामध्ये विद्यार्थ्यांना आपले करियर बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असतात आणि पॉलिटेक्निक हा देखील एक प्रकारच कोर्स आहे आणि हा एक डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये एखादी संस्था तांत्रिक शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची देशातील मागणी आणि नोकरीच्या संधीमध्ये लक्षणीय वाढ आपल्याला दिसून येत आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्याला पॉलिटेक्निक कोर्स करायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला या कोर्ससाठी त्या संबधित संस्थेमध्ये त्याच्या गुनंच्यावर अधारील प्रवेश मिळतो आणि ह्या कोर्सला प्रवेश मिळवायचा असल्यास त्या संबधित विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा देऊन त्यामध्ये उतीर्ण होणे देखील खूप आवश्यक असते.

सध्या भारतामध्ये पॉलिटेक्निक हा कोर्स आपले करियर म्हणून अनेक विद्यार्थी निवडत आहेत आणि या कोर्सची मागणी देखील खूप वाढत असल्यामुळे भारतामधील अनेक महाविद्यालयांनी वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. पॉलिटेक्निक हा कोर्स इच्छुक विद्यार्थी १० वी नंतर किंवा १२ वी नंतर करू शकतो आणि ह्या कोर्सचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो.

भारतामध्ये अनेक अश्या संस्था आहेत ज्या पॉलिटेक्निक कोर्सचे शिक्षण देतात आणि प्रत्येक संस्थेचे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप हे वेगवेगळे असू शकते. चला तर खाली आपण पॉलिटेक्निक या कोर्सविषयी सविस्तर माहिती घेऊया.

polytechnic meaning in marathi
polytechnic meaning in marathi

पॉलिटेक्निक म्हणजे काय – Polytechnic Meaning in Marathi

कोर्सचे नावपॉलिटेक्निक कोर्स
कश्यावर आधारितयामध्ये तांत्रिक शिक्षणावर आधारित डिप्लोमा किंवा व्यावसायिक पदवी घेता येते
पात्रता१० वी किंवा १२ वी उतीर्ण
कालावधीतीन वर्ष

पॉलिटेक्निक कोर्स म्हणजे काय ?

पॉलिटेक्निक हा एक प्रकारचा कोर्स आहे आणि यामध्ये तांत्रिक शिक्षणावर आधारित डिप्लोमा किंवा व्यावसायिक पदवी घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम पदवी कार्यक्रमासाठी एक वैध पर्याय आहे आणि हा कोर्स विद्यार्थी १० वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा १२ वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करू शकतात आणि ह्या कोर्सचा कालावधी हा तीन वर्ष असतो.

पॉलिटेक्निक कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eiligibiliy

कोणताही कोर्स करण्यासाठी आपल्याला त्या संबधित संस्थेचे पात्रता निकष पार पडावे लागतात आणि तसेच पॉलिटेक्निक हा कोर्स करण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि हे पात्रता निकष हे संस्थेनुसार बदलत असतात. खाली आपण पॉलिटेक्निक कोर्स साठी पात्रता निकष कोणकोणते असतात.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला पॉलिटेक्निक कोर्स करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण एका मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेले असले पाहिजे आणि त्यांनी १० वी किंवा १२ वी मध्ये ५० ते ५५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले असले पाहिजेत.
  • जर संबधित विद्यार्थ्याने अकरावी आणि बारावीचे शिक्षण हे जर विज्ञान आणि गणित शाखेतून केले असले तर त्या विद्यार्थ्याला ह्या कोर्ससाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो.
  • जर एखादा विद्यार्थी १० वी नंतर हा कोर्स करणार असेल तर त्याला दहावीमध्ये ५० टक्केहून अधिक गुण मिळालेले असावे,
  • पॉलिटेक्निक कोर्स हा अभ्यासक्रम करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे कमीत कमी १४ च्या वर असले पाहिजे.

पॉलिटेक्निक कोर्ससाठी अर्ज कसा करावा – how to apply

आपल्याला कोणताही कोर्स करण्यासाठी अर्ज भरावा लागतो तसेच संस्थेची जी प्रवेशाची  प्रक्रिया हे ते पार पाडावी लागते तसेच पॉलिटेक्निक कोर्ससाठी अर्ज भरण्यासाठी काही प्रक्रिया आहे ती आपण खाली पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला हा कोर्स करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याने अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ज्यावेळी आपण अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला प्रवेशाचा अर्ज मिळतो आणि त्यामध्ये आपल्याला अर्जातील सर्व माहिती हि इंग्रजीमध्ये भरणे खूप आवश्यक असते.
  • अर्जामध्ये असणारी सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याकडून अनेक कागदपत्रे ( ओळखीचा पुरावा, शैक्षणिक पात्रता आणि पत्ता पुरावा ) मागितली जातात आणि त्याच्या फाईल आपल्याला त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात.
  • तसेच आपला फोटो आणि सही देखील आपल्याला अपलोड करावी लागते.
  • आता सर्व माहिती पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून पहा आणि मग सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
  • तसेच अर्जाची प्रिंट घ्या आणि प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर ते डाऊनलोड करून घ्या.

पॉलिटेक्निक कोर्समधील अभ्यासक्रम – syllabus

पॉलिटेक्निक या कोर्सचा अभ्यासक्रम हा तसा सारखाच असतो परंतु काही वेळा हा अभ्यासक्रम थोडक्याच फरकाने संस्थेनुसार बदलत असतो. चला तर मग आता आपण या अभ्यासक्रमातील विषय कोणकोणते आहेत ते पाहूया.

क्रविषय
 १यांत्रिकी अभियांत्रिकी
 २फॅशन अभियांत्रिकी
 ३स्थापत्य अभियांत्रिकी
 ४संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी
 ५इन्स्टटूमेंटेशान आणि नियंत्रण अभियांत्रिकी
 ६इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
 ७पर्यावरण अभियांत्रिकी
 ८विद्युत अभियांत्रिकी
 ९एरोनॉटिकल अभियांत्रिकी
 १०इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी
 ११उत्पादन अभियांत्रिकी
 १२कृषी अभियांत्रिकी
 १३ऑटोमोबईल अभियांत्रिकी

पॉलिटेक्निक कोर्स कालावधी – duration

पॉलिटेक्निक हा कोर्स पूर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी असतो आणि हा कोर्स सामन्यात सामान्य HSLC निवडण्याऐवजी १० वी पूर्ण केल्यानंतर केला जातो. HSLC हे दोन वर्षाचे असते पण पॉलिटेक्निक डिप्लोमा हे ३ वर्षांचाच असतो. पॉलिटेक्निक कोर्स केल्यानंतर तुम्ही बीई ( B.E ), बी टेक ( B. Tech ) कोर्ससाठी अर्ज करू शकता.

१२ वी नंतर आपण जर बीई ( B.E ), बी टेक ( B. Tech ) करायचे ठरवले तर आपल्याला ४ वर्ष करावे लागते परंतु जर कोणत्याही पॉलिटेक्निक डिप्लोमानंतर आपण बीई ( B.E ), बी टेक ( B. Tech ) करण्यासाठी आपण थेट दुसर्या वर्षामध्ये प्रवेश मिळू शकतो.

पॉलिटेक्निक कोर्स फी ( fee )

आपल्याला कोणत्याही संस्थेमध्ये हा कोर्स करायचा असेल तर आपल्याला त्या संस्थेने ठरवलेली फी भरावी लागते. पॉलिटेक्निक कोर्सची किंमत बीई ( B.E ), बी टेक ( B. Tech ), बी फार्म ( B. Pharm ) इत्यादी इतर अभ्यासक्रमांच्या प्रमाणे जास्त नाही. या कोर्सेसची फी खूप परवडणारी आहे कारण बहुतेक पॉलिटेक्निक कॉलेज राज्यसरकार स्वता चालवतात त्यामुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना फी परवडते. या कोर्सची फी दरवर्षी सुमारे १० हजार ते १२ हजार इतकी असते.

आम्ही दिलेल्या polytechnic information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पॉलिटेक्निक म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diploma in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about polytechnic in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!