अपंग व्यक्ती अधिनियम कायदा माहिती Pwd Act 1995 in Marathi

pwd act 1995 in marathi अपंग व्यक्ती अधिनियम कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये पीडब्ल्यूडी (PWD) कायदा म्हणजेच person with disabilities act ज्याला मराठीमध्ये अपंग व्यक्ती अधिनियम कायदा असे म्हणतात या विषयी संपूर्ण माहित घेणार आहोत. जे व्यक्ती अंध किंवा ज्यांना कमी दृष्टी आहे, तसेच ज्या व्यक्तींना ऐकायला कमी येते किंवा त्यांची श्रवण शक्ती कमजोर आहे, तसेच जे लोक मानसिकदुष्ट्या कमजोर आहेत किंवा दुर्बल आहेत किंवा जे व्यक्ती हाताने किंवा पायाने अपंग आहेत अशा लोकांच्यासाठी हा कायदा लागू होतो. अपंग व्यक्ती कायदा (person with disabilities act) हा हिवाळी अधिवेशनामध्ये १९९५ मध्ये हा मंजूर केला.

आणि १९९६ मध्ये हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला आणि हा कायदा १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला म्हणून ह्या कायद्याला अपंग व्यक्ती कायदा १९९५ (person with disabilities act १९९५) म्हणून ओळखले जाते. हा कायदा सुरु करण्याचा मुख्य उद्देश हा होता कि देशातील अनेक अपंग व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे. या कायद्यामध्ये अपंग व्यक्तींच्या साठी प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक अश्या दोन्ही गोष्टींची तरतूद केलेली आहे.

जसे कि शिक्षण, रोजगार, संशोधन, प्रशिक्षण, विकास, आरक्षण, अपंग लोकांच्यासाठी बेरोजगार भत्ता इत्यादी. या कायद्यामध्ये केंद्र आणि राज्यस्तरीय समन्वय समित्या आणि कार्यकारिणी निर्माण करण्याची तरतूद आहे. हे अपंग व्यक्तींच्यासाठी कार्यक्रम आणि धोरणांचे परीक्षण आणि मुल्यांकन करते. अपंग व्यक्ती कायदा १९९५ (person with disabilities act १९९५) या कायद्यामध्ये १४ प्रकाराने आणि एकूण ७४ कलम आहेत.

pwd act 2016 in marathi pdf
pwd act 2016 in marathi pdf

अपंग व्यक्ती अधिनियम कायदा माहिती – Pwd Act 1995 in Marathi

कायद्याचे नावअपंग व्यक्ती कायदा १९९५ (person with disabilities act १९९५)
केंव्हा मंजूर केला जातोहा कायदा १९९५ मध्ये मंजूर केला
केंव्हा लागू केलाहा कायदा १९९६ मध्ये लागू केला
कोणासाठी लागू होतोहा कायदा अपंग लोकांच्यासाठी लागू होतो.

अपंग व्यक्ती कायदा १९९५ (person with disabilities act १९९५) कोणासाठी आहे ?

अपंग व्यक्ती कायदा १९९५ (person with disabilities act १९९५) हा कायदा जे व्यक्ती अंध किंवा ज्यांना कमी दृष्टी आहे, तसेच ज्या व्यक्तींना ऐकायला कमी येते किंवा त्यांची श्रवण शक्ती कमजोर आहे, तसेच जे लोक मानसिकदुष्ट्या कमजोर आहेत किंवा दुर्बल आहेत किंवा जे व्यक्ती हाताने किंवा पायाने अपंग आहेत अश्या लोकांच्यासाठी हा कायदा लागू होतो.

अपंग व्यक्ती कायदा १९९५  या कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about person with disabilities act १९९५ 

 • या कायद्यामध्ये अपंग व्यक्तींना समान संधी, हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग दिला आहे
 • राज्यसरकार किंवा स्थानिक प्राधिकरनाद्वारे पुरेसा वित्त पुरवठा हा अपंग व्यक्तींच्या अनेक विकासासाठी केला जावू शकतो.
 • जम्मू आणि काश्मीर हे राज्य वगळता अपंग व्यक्ती कायदा १९९५ ( person with disabilities act १९९५ ) हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू होतो.
 • हा कायदा हिवाळी अधिवेशनामध्ये १९९५ मध्ये हा मंजूर केला आणि १९९६ मध्ये हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला.
 • या कायद्यानुसार अंधत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे दिसत नाही किंवा त्याला खूप अंधुक दिसते किंवा ज्याची अस्पष्ट दृष्टी आहे अश्या व्यक्ती अपंग व्यक्ती कायद्या अंतर्गत येतात.
 • या कायद्यानुसार मानसिक आजार म्हणजे मंद बुध्दी सोडून त्या संबधित व्यक्तीला कोणताही मानसिक आजर असेल तर तो या कायद्याअंतर्गत मिळणारे सर्व लाभ घेवू शकतो.
 • या कायद्यामध्ये अपंग व्यक्तींच्या साठी प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक अश्या दोन्ही गोष्टींची तरतूद केलेली आहे जसे कि शिक्षण, रोजगार, संशोधन, प्रशिक्षण, विकास, आरक्षण, अपंग लोकांच्यासाठी बेरोजगार भत्ता इत्यादी.

अपंग व्यक्ती कायदा १९९५ यामधील तरतुदी

आता आपण या कायद्यामध्ये अपंग व्याक्तीन्च्यासाठी असणाऱ्या काही तरतुदी पाहणार आहोत. चला तर आता आपण तरतुदी पाहूया.

 • या कायद्यामार्फत जे लो शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत अश्या लोकांच्यासाठी समित्या स्थापन केल्या जातात आणि यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे समाजकल्याण मंत्री राष्ट्रपती म्हणून नेमले जातात. या समितींच्या मार्फत अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशिक्षण आणि संशोधन या मध्ये प्रगती करण्यासाठी मदत करतात.
 • ज्या शाळेमध्ये आपण किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत अश्या शाळेमध्ये वेगवेगळ्या उपकरणांची व्यवस्था असावी जेणेकरून त्या शारीरकदृष्ट्या अपंग असणाऱ्या विध्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट शिकण्यास कुतूहल वाटेल किंवा आवड निर्माण होईल.
 • या कायद्यानुसार अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळवून देणे हे केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची जबाबदारी असते. ज्या क्षेत्रामध्ये अश्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो अश्या क्षेत्राचा विकास करून त्या क्षेत्रामध्ये अपंग लोकांना रोजगार मिळवून देणे खूप गरजेचे असते .
 • या कायद्यामध्ये असे सांगितले आहे कि जे लोक किंवा विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या विकलांग किंवा अपंग लोकांना त्यांचे शिक्षण झाल्यानंतर ते नोकरीसाठी प्रयत्न करत असतात अश्यावेळी सरकारी किंवा निमसरकारी नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळण्याची तरतूद असावी. जेणेकरून त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील.
 • अपंग व्यक्ती कायदा १९९५ या कायद्यामध्ये अशी देखील तरतूद आहे कि जे विद्यार्थी अपंग आहेत अश्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाशी संबधित उपकरणे तयार करण्याची जबाबदारी हि केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे.
 • जे व्यक्ती किंवा मुले अपंग आहेत अश्या लोकांच्यासाठी अनेक आरोग्य सुविधा मोफत उबलब्ध करून देणे तसेच अपंग व्यक्तींच्यासाठी वेगवेगळ्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून देणे हि सरकारची जबाबदारी आहे.
 • प्रवासाशी संबधित सुविधांच्या मध्ये अपंग व्यक्तींना इतर सामान्य व्यक्तींच्या पेक्षा कमी शुल्क आकारले पाहिजेत म्हणजेच प्रवासाशी संबधित सुविधांच्या मध्ये अपंग व्यक्तींना सूट दिली पाहिजे.
 • शारीरिकदृष्ट्या जे विद्यार्थी किंवा मुले अपंग आहेत अश्या मुलांच्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने स्वतंत्र्य शाळा निर्माण केल्या पाहिजेत.
 • शरीरिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी शिकवण्याची पध्दत हि सामान्य विद्यार्थ्यांच्यापेक्षा वेगळी असावी जेणेकरून त्यांना ती पध्दत समजेल.

आम्ही दिलेल्या pwd act 1995 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अपंग व्यक्ती अधिनियम कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pwd act 2016 in marathi pdf या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!