Rainwater Harvesting Essay in Marathi पावसाच्या पाण्याचे संधारण निबंध आज आपण या लेखामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण या विषयावर निबंध लिहिणार आहे. मानवाला जगण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे आणि पाणी हा कोणत्याही मनुष्याच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे कारण मनुष्य पाण्याशिवाय जगू शकत नाहीत तर मानवाला इतर कारणांच्यासाठी देखील पाण्याची खूप गरज असते. पृथ्वीवर जरी मोठ्या प्रमाणात पाणी असले तरी त्यामधील खूप कमी भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि उरलेला भाग हा खाऱ्या पाण्याच आहे.
पण मनुष्याला वेगवेगळ्या कारणांच्या गोड्या पाण्याचा उपयोग करावा लागतो त्यामुळे मानवाने गोडे पाणी किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर आता आपण रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण या विषयावर निबंध लिहूया.
पावसाच्या पाण्याचे संधारण निबंध – Rainwater Harvesting Essay in Marathi
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण किंवा पावसाचे पाणी भविष्यातील वापरासाठी योग्य पध्दतीने साठवून त्याचा वेगवेगळ्या कारणांच्या साठी उपयोग करणे. पावसाचे पाणी घराचे छप्पर आणि इतर उंच असलेले घन पृष्ठभावरून पाणी गोळा केले जाते तसेच काही वेळा पावसाचे पाणी हे काही वेळा मानवाने निर्माण केलेल्या खड्यांच्यामध्ये साठवले जाते जेणेकरून ते मनुष्याला वापरता येईल. हि एक प्राचीन काळापासून प्रचलित झालेली पध्दत आहे.
जी आज देखील खूप लोकप्रिय आहे. भारत देश हा लोकसंखेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि त्यामुळे वाढत्या लोकसंखेच्या कारणामुळे आणि पाणीपुरवठ्याचा भार हा लक्षात घेऊन शहरी भागामध्ये पाणी पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत हि अनिवार्य करण्याचा निर्णय केला आहे.
कमी पावसाची परिस्थिती आणि कोरडी भूजल पटली हि ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये देखील खूप मोठे अव्हान आहे आणि जर आपल्याला यातून निघायचे असल्यास आपण पावसाच्या ओंयाची साठवण करू शकतो आणि हे साठवलेले पाणी निर्जंतुकीकरण आणि पाणी गाळण्याची प्रक्रिया वापरून आपण ते पाणी वापरू शकतो त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासणार नाही किंवा मग पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा साठ हा कमी होणार नाही.
आपण पावसाचे पाणी हे वेगवेगळ्या प्रकारे साठवू शकतो जसे कि शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पावसाचे पाणी हे घराच्या पृष्ठभागावरून ( सरफेस रनऑफ हार्वेस्टिंग ) जात असते किंवा घराच्या छप्पर ( रुफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग ) वरून खाली येत असते आणि हे पाणी जर आपण वेगवेगळ्या पध्दती वापरून जर पाणी साठवून ठेवले तर ते खूप उपयुक्त ठरते. पूर्वीच्या काळी घराची पन्हाळी किंवा छप्परचा समोरचा भाग असतो तेथून पाणी येत असते आणि हे पाणी साठवण्यासाठी त्या पन्हाळीच्या खाली मोठे ड्रम किंवा भांडी ठेवत होते आणि ते पाणी रोजच्या वापरासाठी वापरत होते.
तसेच ग्रामीण भागामध्ये शेती हि मोठ्या प्रमाणात केली जाते पण शेतामध्ये पिक पिकवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यावेळी नदीचे पाणी किंवा विहिरीचे पाणी वापरले जाऊ शकते परंतु जर ग्रामीण भागातील लोकांनी शेताजवळ एक खड्डा काढून जर त्यामध्ये पाणी साठवले तर ते उन्हाळ्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पावसाचे पाणी साठवाल्यामुळे पाण्याची बचत त्याचबरोबर पाण्याची स्थावान देखील होते त्याचबरोबर आपण जर पावसाचे पाणी साठवले तर आपल्याला आपले त्या दिवशी किंवा ज्यावेळी आपण पाणी साठवून ठेवले आहे.
त्या दिवशी आपल्याला नळ चालू करावा लगता नाही आपण आपल्या वापरासाठी पावसाचे पाणी वापरून कमी खर्च करू शकतो. तसेच हि पध्दत वापरल्यामुळे पाण्याचे बिल देखील कमी येण्यास मदत होते तसेच आयात केलेल्या पाण्याची गरज देखील कमी होते. त्याचबरोबर पावसाचे पाणी साठवाल्यामुळे भूजलाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारते तसेच लँडस्केप सिंचनासाठी गाळण्याची प्रक्रिया किंवा पद्धतीची आवश्यकता नसते.
पाणी साठवण्याच्या ह्या पध्दती ह्या खूप सोप्या, स्थापित आणि वापरण्यास एकदम साध्या आहेत त्यामुळे हा पर्याय खूप सोपा वाटतो. या प्रकारे साठवलेल्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची रसायने किंवा विरघळलेले क्षार आणि सर्व खनिजांच्या पासून मुक्त असणारे एक पाण्याचे स्त्रोत्र आहे. साठवलेले पावसाचे पाणी हे स्वच्छ असते म्हणजेच त्यामध्ये मातीची धूळ नसते किंवा ते पाणी गडूळ किंवा त्यामध्ये खत किंवा कोणतेही धातू मिक्स नसतात म्हणजे हे पाणी प्रदूषित नसते.
त्याचबरोबर अश्या प्रकारे पावसाचे पाणी साठवण्याचे जरी फायदे असले तरी याचे तोटे देखील आहेत कारण या प्रकारच्या पाणी साठवण्याच्या पध्दतीची देखभाल खूप करावी लागते. तसेच या प्रकारच्या पद्धतीच्या स्थापनेसाठी किंवा वापरासाठी आपल्यालाकडे काही कौश्यल्ये अवगत असणे गरजेचे असते. जर आपण पावसाचे पाणी योग्य रित्या साठवले नाही तर हे ते पाणी अस्वच्छ होते आणि त्या पाण्यापासून अनेक जलजन्य रोग होण्याची शक्यता असते.
आपण वेगवेगळ्या पद्धतीने पावसाचे पाणी साठवून ठेवू शकतो पण त्याला मर्यादा असते म्हणजेच आपण पावसाचे पाणी हे भरपूर साठवून ठेवू शकत नाही आणि साठवलेले पाणी हे २ ते ३ दिवसाच्या वापरासाठी वापरू शकतो.
अश्या प्रकारे आपण पावसाचे वेगवेगळ्या प्रकारे पाणी साठवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे पाणी साठवणे आणि पाण्याची बचत करणे हि काळाची गरज आहे कारण पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे स्तोत्र हे खूप कमी आहे पण गोड्या पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे गोड्या पाण्याची साठवण आपण जितकी होईल तितकी केली पाहिजे आणि पाणी साठवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पावसाचे पाणी साठवणे.
आम्ही दिलेल्या rainwater harvesting essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पावसाच्या पाण्याचे संधारण निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rainwater harvesting in essay marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rainwater harvesting in essay marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट