raja ravi varma information in marathi राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी, भारतामध्ये अनेक असे लोकप्रिय चित्रकार आणि कलाकार होऊन गेले ज्यांनी त्यांच्या चित्रकलेने अनेक लोकांचे मने जिंकली तसेच राजा रवी वर्मा हे देखील खूप प्रसिध्द भारतीय चित्रकार आणि कलाकार होते आणि आज आपण या लेखामध्ये त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. राजा रवी वर्मा यांचा जन्म हा २९ एप्रिल १८४८ मध्ये केरळ या राज्यातील किलीमनूर राजवाडा, तिरुवनंतपूरम या ठिकाणी झाला आणि किलीमनुर हा राजवाडा तिरुवनंतपूरम पासून २५ किलो मीटर अंतरावर आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव निलकंदन भट्टथिरीपाद आणि आईचे नाव उमांबा थमपुरत्ती असे होते. राजा रवी वर्मा यांना लहानपणी पासूनच चित्रे काढण्याची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी कोळश्याचा वापर करून वाड्याच्या भिंतीवर चित्रे काढत होते.
वयाच्या १४ व्या वर्षी राजा रवी वर्मा हे आपल्या वडिलांच्या सोबत अयल्यम तिरुनल महाराजांच्या त्रावणकोर राजवाड्यामध्ये गेले आणि मग ते त्याच राजवाड्यामध्ये राहून राजवाड्यातील चित्रकार रामा स्वामी नायडू यांच्याकडून त्यांनी वॉटर पेंटिंग शिकले आणि मग त्यानंतर त्यांनी थिओडोर यांच्याकडून तैलचित्र कसे काढायचे याविषयी धडे घेतले.
इ.स १८७३ मध्ये राजा रवी वर्मा यांनी मद्रास चित्रकला प्रदर्शनामध्ये भाग घेतला आणि त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक जिंकले तसेच त्याच वर्षी म्हणजेच १८७३ मध्ये व्हीएन्ना या ठिकाणी झालेल्या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये त्यांना त्यांच्या चित्रासाठी पुरस्कार मिळाला आणि यामुळे त्यांची जगभरामध्ये लोकप्रियता वाढली.
राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी Raja Ravi Varma Information in Marathi
नाव | राजा रवी वर्मा |
जन्म | २९ एप्रिल १८४८ |
जन्म ठिकाण | किलीमनूर राजवाडा, तिरुवनंतपूरम |
ओळख | चित्रकार आणि कलाकार |
राजा रवी वर्मा यांचा जीवन परिचय – raja ravi varma history in marathi
राजा रवी वर्मा यांचा जन्म हा २९ एप्रिल १८४८ मध्ये केरळ या राज्यातील किलीमनूर राजवाडा, तिरुवनंतपूरम या ठिकाणी झाला आणि हे पूर्वीच्या परप्पानाड, मलप्पुरम जिल्ह्यातील राजघराण्यामध्ये झाला. त्यांना लहानपणी पासून चित्राची आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून चित्र काढण्यास सुरुवात केली आणि मग त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी चित्रकार रामा स्वामी नायडू यांच्याकडून त्यांनी वॉटर पेंटिंग शिकले आणि मग त्यानंतर त्यांनी थिओडोर यांच्याकडून तैलचित्र कसे काढायचे याविषयी धडे घेतले.
इ.स १८६६ मध्ये म्हणजेच त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी राजा रवी वर्मा यांचा विवाह मावेलीकराच्या शाही घराण्यातील १२ वर्षीय भाग्यार्थी मुलीशी झाला. ते विषयांच्या शोधासाठी भारतामध्ये फिरले तसेच त्यांनी भारतीय स्त्रियांचे आणि देवींची देखील चित्रे काढली.
राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्याविषयी माहिती – raja ravi varma paintings information in marathi
राजा रवी वर्मा यांना इतिहासातील महान चित्रकार म्हणून ओळखले जाते. यांनी अनेक साडी नेसलेल्या सुंदर स्त्रियांची चित्रे काढली आहेत तसेच महाभारत आणि रामायण या महाकाव्यातील दृश्यांचे देखील चित्रण त्यांनी चांगल्या प्रकारे केले होते आणि त्या चीत्रांच्यासाठी ते प्रसिध्द आहेत.
महाभारतातील दुष्यंत, नळ, शकुंतला, दमयंती या कथेतील व्यक्तींचे चित्रण हे राजा रवी वर्मा यांनीच केले आहे. ते युरोपियन चित्रांनी देखील मोहित झाले होते आणि त्यांना ती चित्रे भारतीय कलाकृतीशी विसंगत वाटत होती आणि म्हणून त्यांनी भारतीय आणि युरोपियन संमिश्रनाची उत्कृष्ट चित्रे देखील काढली.
राजा रवी वर्मा यांची काही प्रसिध्द चित्रे – drawing
दमयंती हंसाशी बोलत आहे असे चित्रे काढलेले आहे. | मेघनाथाचा विजय |
जटायू हा रामाचा भक्त पक्षी रावण मारतानाचे चित्र | शकुंतला हि राजा दुष्यंताला पत्र लिहित असलेले चित्र |
ऋषी कवनांच्या आश्रमातील मुलगी | शकुंतलेचे चित्र |
विचारात मग्न असणाऱ्या स्त्रीचे चित्र | शंतनू आणि मत्स्यगंधा |
दूत म्हणून भगवान श्री कृष्णांचे चित्र | मंदिरात भिक्षा देणारी महिलेचे चित्र |
भगवान रामांनी वरुणावर विजय मिळवलेले चित्र | भिकाऱ्यांचे कुटुंब |
- दूत म्हणून भगवान श्री कृष्णांचे चित्र : भगवान श्री कृष्ण दूत म्हणून असणारे चित्र राजा रवी वर्मा यांनी १९०५ मध्ये रेखाटले होते आणि हे कॅनव्हासवर तैलचित्र आहे. भगवान श्री कृष्ण ज्यावेळी कौरवांच्या दरबारामध्ये गौरवांचे दूत म्हणून गेले होते त्यावेळीचा क्षण त्यांनी चित्रामध्ये रुपांतरीत केला आहे.
- मिल्कमेड : मिल्कमेड हे देखील राजा रवी वर्मा यांचे प्रसिध्द पेंटिंग आहे आणि हे चित्र त्यांनी १९०४ मध्ये बनवले होते. या चित्रामध्ये त्यांनी एका गावातील मुलगी दाखवली आहे आणि ती तिच्या घरी दुध घेवून जात आहे.
- रहा रवी वर्मा यांचे एका हातामध्ये फळ घेऊन उभी असलेले चित्र देखील खूप लोकप्रिय आहे. हे चित्रा आपल्याला दिल्लीमध्ये नॅशणल गॅलरी ऑफ मॉडर्ण आर्ट या ठिकाणी पाहायला मिळते.
- ज्यावेळी शकुंतला दुष्यंत राजाला पत्र लिहित होती तो क्षण देखील त्यांनी चित्राच्या स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
- ज्यावेळी रावणाने शितेचे अपहरण केले त्यावेळी जटायू जी भगवान रामांचा भक्त पक्षी होता तो सीतेला रावणापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यावेळी रावणाने जटायूचा वाढ केला आणि हा क्षण देखील राजा रवी वर्मा यांनी चित्र काढून त्यांच्या रुपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
कलेसाठी मिळालेले सन्मान आणि पुरस्कार – awards and achievements
- इ.स १८७३ मध्ये राजा रवी वर्मा यांनी मद्रास चित्रकला प्रदर्शनामध्ये भाग घेतला आणि त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक जिंकले.
- १८७३ मध्ये व्हीएन्ना या ठिकाणी झालेल्या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये त्यांना त्यांच्या चित्रासाठी पुरस्कार मिळाला.
- राजा रवी वर्मा हे १८९३ मध्ये शिकागो या ठिकाणी झालेल्या जागतिक कोलंबियन प्रदर्शनामध्ये देखील सहभागी झाले होते आणि त्यांना त्या ठिकाणी एकूण तीन सुवर्ण पदके मिळाली होती.
- १९०४ मध्ये राजा रवी वर्मा यांच्या कलेसाठी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी ब्रिटीश राजा सम्राट यांच्या वतीने राजा रवी वर्मा यांना कैसर-ए-हिंद हे सुवर्णपदक देऊन सन्मानित केले आहे.
- भारतीय कलेतील त्यांच्या लाख मोलाचे योगदान लक्षात घेऊन केरळ सरकारने राजा रवी वर्मा नावाचा पुरस्कार सुरु केला आहे जो चित्रकले मध्ये किंवा कलेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक कलाकारांना दिला जातो.
- केरळ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ मावेलीकारा या ठिकाणी ललित कलांना समर्पित असे महाविद्यालय स्थापन केले आहे.
आम्ही दिलेल्या raja ravi varma information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या raja ravi varma biography in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about raja ravi varma in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये raja ravi varma history in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट