Rajgad Fort Information in Marathi राजगड किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला राजगड ज्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हंटले जाते. राजगड हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी येतो तसेच या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यावर नजर देखील ठेवता येते तसेच हा किल्ला अश्या ठिकाणी वसला आहे जिथे डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनदाट झाडीतून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही या करिताच शिवरायांनी हा किल्ला २५ वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला असावा. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय असा किल्ला होता. त्यांनी राजगडावर अनेक वर्षे वास्तव्य केले.
राजगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या आग्नेयेस सुमारे १६ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १३७६ मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याची नैसर्गिक रचनाच अशी आहे कि हा किल्ला काबीज करणे अतिशय अवगड कामगिरी आहे.
राजगड किल्ल्याची माहिती – Rajgad Fort Information in Marathi
राजगड किल्ला | माहिती |
महत्वाचा इतिहास | पहिली राजधानी |
उंची | १३७६ मीटर |
ठिकाण | पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या आग्नेयेस सुमारे १६ कि.मी. अंतरावर |
पूर्वीचे नाव | मुरुंबदेव |
माची नावे | सुवेळा, संजीवनी व पद्मावती |
पायऱ्या | १७३७ |
बुरुज | झुंजार बुरुज, काळेश्वरी बुरुज |
मंदिर | जननीमंदिर, पद्मावती मंदिर |
दरवाजा | गुंजवणे दरवाजा, आळू दरवाजा, पाली दरवाजा |
राजगडाचा इतिहास
साधारण २००० वर्षापासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून म्हटले जाते. राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. इ.स. १६२५ ला मुरुंबदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशाही कडे गेला आणि १६३० च्या सुमारास परत आदिलशाही कडून निजामशाही कडे गेला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. शिवचरित्र साहित्यात एक वृत्त सांगते “शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली आहे.” इ.स. १६४५ ला शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले. त्या डोंगराला तीन सोंडा किवा माच्या होत्या त्यास हे तटबंदी केली. आणि मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवले आणि तीन माच्याना सुवेळा, संजीवनी व पद्मावती हि नावे दिली.
इ.स. १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाची फौज शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी करून आली आणि राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.
इ.स. १६६५ साली मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दौउदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुघल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोघलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी मिर्झा जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. त्यामध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होता.
३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना ठार मारले आणि त्यानंतर मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. पुन्हा मराठ्यांनी राजगड जिंकून घेतला. पुढे ११ नोव्हेंबर १७०३ ला स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. २ डिसेंबर १७०३ ला तो राजगडाजवळ येऊन पोहोचला आणि ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंजेबाच्या हातात पडला. त्याने किल्ल्याचे नाव ‘नाबीशहागड’ असे ठेवले.
२९ मे १७०७ ला गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून पुन्हा मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे किल्ला १७०९ मध्ये शाहूंच्या ताब्यात आला आणि त्यांनी राजगडाची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले.
- शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून लोकांनीशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले.
- शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधन – ५ सप्टेंबर १६५९
- राजाराम महाराजांचे जन्म – २४ फेब्रुवारी १६७०
- इ.स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी सिंहगड किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांना राजगडावरूनच पाठविले.
- सन १६७१-१६७२ साली शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.
राजगडावर कसे जायचे?
राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाउलवाटा आहेत. वेळवंड, मळे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणशी, या मार्गाने गडावर जाता येते. परंतु घनदाट झाडी आणि अतिशय अवगड चढ- उतरणीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या वाटा दुर्लक्षित आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर- वाजेघर, पालखुर्द भोसलेवाडी मार्गे रस्ता चांगला आहे.
- पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्मावती माचीवर येतो.
- वेळवंड खोऱ्यातील भूतांडे गावातून अळू दरवाज्यातून गडावर जाता येते.
- तोरण्याच्या बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा- सात तासात गडावर पोहोचतो.
राजगड किल्ला कुठे आहे?
पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा- वेळवंडी- कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात राजगड हा किल्ला आहे.
माची म्हणजे काय?
माची म्हणजे गडाचा दोन तृतीयांश डोंगर चढल्यावर तटबंदीने वेढलेली सपाट जागा होय. येथून प्रत्यक्ष गडाला सुरुवात होते.
राजगड किल्ला फोटो
राजगड किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी
इ.स. १७०९ ला राजगड किल्ला शाहूंच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी राजगडाची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. त्यामध्ये सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी पवार घराण्यातील सरनोबत, संजीवनी माचीसाठी खोपडे घराण्यातील सरनोबत होते. आणि याशिवाय नाईक आणि सरनाईक हे अधिकारीसुद्धा होते.
राजगडाची वैशिष्ट्ये
- राजगडाचा घेरा तब्बल १२ कोसांचा म्हणजेच जवळ जवळ २० कि.मी. एवढा प्रचंड आहे. घेरा म्हणजे पायथ्याला असलेली गावे व मुलुख.
- गड संरक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे राजगडाच्या मधल्या सपाटीवर चढणीच्या वाटांवर नजर ठेवणारी छोटी तपासणी केंद्रे होती. त्यावर रामोशी, बेरड अशा लोकांची वस्ती असे. वाजेघर गावातून राजगड चढताना भिकुल्यांचे प्रसिद्ध मेट लागते.
- राजगडाला तीन दिशांना तीन माच्या, मध्यभागी बेलाम बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे, ६ चोरदिंड्या, नाळयुक्त तटबंदी, दुहेरी बांधणीचे बुरुज हि गडबांधनीतील वैशिष्ट्ये आहेत.
राजगड गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
सुवेळा माची
गडाच्या पूर्वेला असणाऱ्या सुवेळा माचीची उंची सुमारे २ कि.मी. इतकी लांब आहे. हि माची साधारण सपाट आणि चिंचोळी आहे. या माचीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या खड्या सैन्यातील येसाजी कंक, तानाजी मालुसरे इ. हजारी सरदारांची वास्तव्य स्थाने इथे होती. या माचीला २ टप्पे आहेत.
गुंजवणे दरवाजा
हा शिवकालीन वास्तुनिर्मितीचा नमुना आहे. गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. दगडी चिरे आणि त्यांना साधणारा चुना अशी शिवकालीन अभेद्य रचना तयार केली आहे. हा दरवाजा वास्तूअभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
झुंजार बुरुज
वास्तुशास्त्रीय दृष्टीकोन, लष्करी नियोजन, संरक्षण प्रयोजन, आसमंत टेहळणी असे अनेक पैलू ह्या बुरुजाशी संबंधित आहेत. नैसर्गिक प्रस्तराचा सुरेख वापर करून हा खणखणीत बुरुज बांधला गेला आहे. हा प्रस्तर पूर्वेकडून एका भव्य हत्तीप्रमाणे तर बुरुज अंबारीप्रमाणे भासतो असे अप्रतिम नैसर्गिक वास्तुशिल्प तयार झाले आहे.
तटबंदीयुक्त दुसरा टप्पा
तटबंदी २ टप्प्यात विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे.दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मी. व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच ‘नेढ किंवा हत्तीप्रस्तर’ म्हणतात आणि इथेच पेशवेकालीन गणेशमूर्ती आढळते.
काळेश्वरी बुरुज आणि परिसर
हा परिसर राजगडाच्या दक्षिणेला येतो. इथे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत. या मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमुर्ती अशी शिल्पे आढळतात. रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत.
पद्मावती तलाव
पद्मावती माचीवर सुबक बांधणीचा विस्तीर्ण तलाव आहे. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे.
राजवाडा
या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. पुढे अंबरखाना आहे. त्याच्या समोर सदर आहे, हि गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. वाड्याच्या समोर २५ एकरात महाराजांनी बागही तयार केली त्यास ‘शिवबाग’ असे म्हणत.
पद्मावती मंदिर
२००२ मध्ये या मंदिराचा जिर्णोधार झाला आहे. या मंदिरात ३ मूर्ती आहेत. शेंदूर लावलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी आहे.
पाली दरवाजा
या दरवाज्याचे प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाज्याच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत.
संजीवनी माची
गडाच्या पश्चिमेला असणाऱ्या संजीवनी माचीची लांबी अडीच कि.मी आहे. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. संजीवनी माची ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. येथील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तीन तिहेरी बुरुज लागतात.
आळू दरवाजा
संजीवनी माचीवर जाण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होतो. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. या दरवाज्यावर असणाऱ्या शिल्पात वाघाने एक सांबर उताणे पाडले आहे असे दाखविले आहे.
बालेकिल्ला
राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. या किल्ल्याला साधारण १.५ मी. उंचीची तटबंदी असून बुरुजही ठेवले आहेत. बालेकिल्ल्याच्या दरवाज्याला महादरवाजा असेहि म्हणतात. या दरवाज्याची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक हि शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाज्यातून आत गेले कि जननीमंदिर आहे आणि तेथून पुढे चंद्रतळे लागते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, राजगड किल्ला rajgad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. rajgad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about rajgad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही राजगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या rajgad killa माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही kille rajgad त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट