Ratan Tata Information in Marathi – Ratan Tata Biography in Marathi रतन टाटा यांची माहिती मराठी लिविंग लेजंड- रतन टाटा!! मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एका अशा महान व्यक्तिमत्वा विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांचे प्रोडक्स आज सर्वांच्याच घराघरात वापरले जातात. ते म्हणजे टाटा उद्योग समूह. टाटा उद्योग समूह हा एक भारतीय उद्योग समूह आहे ज्याचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याविषयी आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. अगदी सकाळी लागणारा चहा ते रसायने, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये टाटा समूहाच्या अनेक कंपन्या आघाडीवर आहेत.
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचा नातू रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
रतन टाटा यांची माहिती मराठी – Ratan Tata Information in Marathi
पूर्ण नाव (Name) | रतन टाटा |
जन्म (Birthday) | २८ डिसेंबर १९३७ |
जन्म गाव (Birth Place) | मुंबई |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | उद्योजक व व्यवसायिक |
जन्म व वैयक्तिक आयुष्य
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईच्या पारशी कुटुंबामध्ये झाला. रतन टाटा हे नवल टाटा यांचे दत्तक घेतलेले पुत्र आहेत. रतन टाटा यांचा स्वभाव अतिशय लाजरा, गोड असा आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना साध जीवन जगायला आवडतं. परंतु त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी साधी नाही. रतन टाटा यांचे विचार असामान्य होते.
ही गोष्ट खरी आहे की जरी त्यांचा जन्म आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या घरात झाला असला तरी त्यांनी स्वतःचे शिक्षण स्वतःच्या पायावर केलं. त्यांनी सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण चॅम्पियन स्कूल मधून पूर्ण केलं. रतन टाटा यांना आर्किटेक्ट बणायचं होतं त्यासाठी ते अमेरिकेला गेले आणि तेथील कॉर्नेल विद्यापीठामध्ये त्यांनी प्रशिक्षण सुरू केलं.
यादरम्यान त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे त्यांनी हॉटेलमधील कधी भांडी घासणे, तर कधी कारकुनाची नोकरी केली. अतिशय साधं असं व्यक्तिमत्व ठेवणारे रतन टाटा अमेरिकेमध्ये स्वतःच्या पायावर शिक्षण घेत होते. तिथे त्यांनी दहा वर्ष वास्तव्य केलं. पुढे हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी देखील घेतली.
खडतर सुरुवात
रतन टाटा यांचं व त्यांच्या भावांचं पालन-पोषण त्यांच्या आजीने केलं. कारण रतन टाटा फारच लहान होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांचे एका अपघातात निधन झाल. रतन टाटा शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि आपल्या आजीची तब्येत बिघडली आहे या कारणास्तव तिला भेटण्यासाठी ते भारतामध्ये पुन्हा आले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला खरी सुरुवात झाली.
त्यावेळेचे तसे तत्कालीन अध्यक्ष जे. आर. डी यांनी रतन टाटा यांना इसवी सन १९६२ मध्ये टाटा उद्योग समूह मध्ये समाविष्ट करून घेतलं. रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे जरी नातू असले तरी रतन टाटा यांनी अगदी खालच्या पदावरून सुरुवात केली.
सुरुवातीला ते जमशेदपुर टाटा स्टील मध्ये कोळसा उचलण्याचा काम करायचे, कधी भट्टीमध्ये काम करायचे असंच इसवी सन १९६२ ते इसवी सन १९७१ पर्यंत रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. आणि १९७१ मध्ये नेल्को या कंपनीची सूत्र रतन टाटा यांच्या हाती सोपवण्यात आली. ही एक तोट्यात गेलेली इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी होती.
या कंपनीच तीन वर्ष कामकाज बघून रतन टाटा यांनी कंपनीचे शेअर दोन टक्क्यांवरून २० टक्क्यांवर नेले. तोट्यात गेलेली कंपनीला त्यांनी अतिशय मेहनतीने, हुशारीने नफा मिळवून दिला. परंतु त्याच दरम्यान देशात आणीबाणी लागू झालेली. आणीबाणी आणि आर्थिक मंदीमुळे कंपनी बंद करावी लागली. रतन टाटा यांना मिळालेल हे सर्वात पहिलं अपयश होत.
परंतु यातूनही हार न मानता पुढे इसवी सन १९७० मध्ये एम्प्रेस मिलची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. ही मिल देखील एक बंद पडायला आलेली मिल होती या मिल मध्ये तांत्रिक यंत्रणांचा तुटवडा होता तर कामगारांची संख्या फार होती रतन टाटा यांनी या मिल ला पुन्हा यशाच्या मार्गावर आण्यासाठी टाटा उद्योग समूहाकडे मिल ला भांडवल पुरवण्यासाठी अर्ज केला.
परंतु टाटा समूहाच्या काही अन्य अधिकाऱ्यांनी तो नाकारला आणि त्यामुळे रतन टाटा यांच्याकडे या मिल ला यशस्वी बनवण्याचा कोणताही मार्ग उरला नाही. आणि ही मिल सुद्धा बंद करण्यात आली. अपयशावर अपयश रतन टाटा यांच्या आयुष्यामध्ये येतच होतं परंतु ते अतिशय बुद्धिमान, जिद्दी, कामासाठी चिकट असे व्यक्ती होते.
इसवी सन १९८१ मध्ये टाटा उद्योग समूहाची संपूर्ण सूत्र रतन टाटा यांच्या हाती सोपवण्यात आली पुढे रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा वीस वर्ष कारभार सांभाळला या कालावधीमध्ये रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा कारभार उत्तम रितीने पार पडला आणि आज भारतातील नंबर वन उद्योजकांच्या यादी मध्ये रतन टाटा यांचे नाव समाविष्ट आहे.
या शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील रतन टाटा यांच्या नावाची व टाटा ग्रूपची विशेष चर्चा चालू आहे. रतन टाटा यांनी कोरस जॅगवार यांसारख्या जगातील नामांकित व प्रसिद्ध अशा कंपन्यांना खरेदी केलं. रतन टाटा यांनी टाटा न्यानो आणि इंडिगो या दोन कारची निर्मिती केली. वाहन निर्मिती मध्ये टाटा आधीपासूनच समाविष्ट होते.
परंतु भारतातील सामान्य जनतेची मर्यादा लक्षात घेत त्यांनी इंडिका या कारची ओळख देशाला करून दिली. ज्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळालं आज टाटा ग्रुप्स रसायने, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कंपन्या निर्माण करून त्या आघाडीवर आहेत. रतन टाटा यांनी land rover ही कंपनीदेखील विकत घेतली.
इसवी सन २००० मध्ये रतन टाटा यांनी टेंटली ही कंपनी विकत घेतली आणि जगातील सर्वात मोठी टि बेग्ज बनवणारी कंपनी घडवली. इतकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रतन टाटा यांनी २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo commercial vehicle ही कंपनी विकत घेतली आणि २००७ मध्ये लंडन मधील कोरस ग्रुप ही कंपनी देखील विकत घेतली.
टाटा ग्रुपचे प्रोडक्स संपूर्ण जगाला ज्ञात आहेत. रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले परंतु आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या कंपनीचे महसूल ४० टक्क्यांनी वाढवले आहे. आपल्या कंपनीला ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळवून दिला. आज टाटा समुहाच्या १०० हून अधिक कंपन्या आघाडीवर आहेत आणि १५० पेक्षा अधिक देशांमध्ये या कंपन्या चालू आहेत.
रतन टाटा यांच्या आपल्या आधुनिक भारताच्या राजकीय व सामाजिक, संस्कृती आणि औद्योगिक जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये रतन टाटा यांनी एक यशस्वी व श्रेष्ठ उद्योजक म्हणून मोलाची भर घातली आहे. रतन टाटा यांच्यासाठी त्यांचे कर्मचारी सर्वस्व आहेत. कर्मचाऱ्यांना ते प्रथम स्थानावर ठेवतात जर आपण आपल्या कर्मचार्यांची काळजी घेतली.
तर त्यांच्याकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तर सर्वांनाच कल्पना आहे या हल्ल्यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला होता. या वेळी रतन टाटा स्वतःहून नुकसान झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला. हीच एक गोष्ट आहे जी रतन टाटा यांना यशस्वी उद्योजक बनवते.
आज टाटा समूहामध्ये सात लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. खरा उद्योजक तोच असतो जो समाजाचं हित पाहतो. रतन टाटा देखील आपल्या नफ्या मधील ६६% वाटा समाजासाठी दान करतात. आज पर्यंत देशावर आलेल्या प्रत्येक अडचणींमध्ये रतन टाटा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आज पर्यंत टाटा समूहाने सामाजिक दृष्टिकोन पुढे ठेवूनच प्रोडक्स तयार केले आहेत.
त्यामुळेच आज संपूर्ण देशात टाटा प्रोडक्सची चर्चा आहे. आज सर्वत्र प्रत्येक घराघरात टाटा प्रोडक्स पाहायला मिळतात. रतन टाटा यांचा भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील त्यांची कारकीर्द पाहता भारत सरकारने भारतातील सर्वोच्च पुरस्कार यांपैकी एक असा “पद्मभूषण” पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला.
इसवी सन २००८ मध्ये रतन टाटा यांना “पद्मविभूषण” पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं. काहीच दिवसांपूर्वी रतन टाटा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ होता रतन टाटा यांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन चा. या व्हिडिओमध्ये रतन टाटा हातामध्ये मावणार देखील नाही इतका छोटा केक घेऊन सेलिब्रेशन करत होते.
अंगावर साधे कपडे. याच्यातून जाणवतं की रतन टाटा यांना इतरांसारखं गोष्टी दाखवून करायला आवडत नाही त्यांना वायफळ गोष्टींवर पैसे उडवायला आवडत नाहीत. अतिशय साधं जीवन जगणारे रतन टाटा यांचे हे गुण एक यशस्वी उद्योजकाची लक्षण आहेत हे निश्चित. रतन टाटा यांनी त्यांच्या कार्यामधून देशभरातील अनेक तरुणांना प्रोत्साहन दिलं आहे. रतन टाटा यांच्या मते जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटेच आला परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे तर सर्वांना सोबत घेऊन चाला.
आम्ही दिलेल्या ratan tata information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रतन टाटा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ratan tata wikipedia in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ratan tata in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ratan tata information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट