real estate information in marathi – real estate meaning in marathi रिअल इस्टेट म्हणजे काय, रियल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता आणि अनेकांना रियल इस्टेट विषयी काहीच माहिती नसते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये रियल इस्टेटविषयी माहिती पाहणार आहोत. रियल इस्टेटला मराठीमध्ये स्थावर मालमत्ता असे म्हणतात आणि या स्थावर मालमत्तेची व्याख्या जमीन आणि कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी संरचना म्हणजेच घर किंवा कोणत्याही प्रकारची जमिनीची सुधारणा (उदा : शेती).
रियल इस्टेट मध्ये मानवनिर्मित किंवा नैसर्गिक मालामातेचा समावेश होतो म्हणजेच यामध्ये जमीन हे नैसर्गिक आहे आणि घरे किंवा सुधारणा केलेली जमीन हि मानवनिर्मित आहे. जर एखाद्या व्यक्तीला रियल इस्टेट खरेदी किंवा विक्री व्यवहार करायचे असतील तर त्या व्यक्तीला एक एजंट पकडावा लागतो जो सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार पाहतो.
रियल इस्टेटमध्ये व्यक्ती एकत्रित रिअल इस्टेट गुंतवणूक किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक अश्या दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो आणि हि गुंतवणूक तो एजंटच्या मार्फत करू शकतो. चला तर खाली आपण रियल इस्टेट विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.
रिअल इस्टेट म्हणजे काय – Real Estate Meaning in Marathi
रियल इस्टेटमधील गुंतवणूक – investment
ज्यावेळी एखादा व्यक्ती रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असतो त्यावेळी या गुंतवणुकीमध्ये भाड्याने मिळणाऱ्या मालमत्ता (rent basis estate), घर फिक्सिंग (House fixing) आणि घर मालक (house owner) या मार्गांचा समावेश असतो.
रियल इस्टेट मध्ये केलेल्या गुंतवणुकीतू मिळणारा नफा हा भाडेपट्ट्याने मिळणाऱ्या कमाईतून किंवा रियल इस्टेटच्या मिल्ल्यातून मिळते. रियल इस्टेट गुंतवणुकीचे काही फायदे आणि तोटे आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.
फायदे
- रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यामुळे भांडवली प्रशंशा देते.
- यामध्ये गुंतवणूक केल्यावर त्या संबधित व्यक्तीला स्थिर उत्पन्न मिळते.
- त्याचबरोबर लीव्हारेजसह खरेदी करता येते.
तोटे
- हे स्थानिक घटकांच्यावर प्रभावित असते.
- यामध्ये सक्रीय व्यवस्थापनाची आवश्यकता असते.
- त्याचबरोबर यासाठी मोठ्या प्रारंभिक भांडवलाची अवश्यकता असते.
- जास्त प्रमाणात फी आकारली जाते.
रियल इस्टेटमध्ये समाविष्ट असणाऱ्या काही इमारती
अलिप्त घर
जी इमारत एका रिकाम्या ठिकाणी बांधलेली असते आणि त्याला इतर कोणत्याही घराणे किंवा इमारतीने जोडलेले नसते अश्या प्रकारच्या इमारतींना अलिप्त इमारती म्हणतात.
बहु कौटुंबिक घर
अनेक वेळा आपण पाहतो कि एका इमारतीमध्ये ३ ते ४ किंवा त्यापेक्षा अधिक कुटुंबे राहतात आणि ती एकाच इमारती मध्ये राहतात पण त्या इमारतीमध्ये त्यांची घरे वेगवेगळी असतात अश्या इमारतीला किंवा बहु कुटुंब घरांना रियल इस्टेट म्हणून ओळखले जाते.
अपार्टमेंट
अपार्टमेंट मध्ये देखील कुटुंबांना राहण्यासाठी विभाग विभागलेले असतात आणि त्यामुळे हे देखील एक रियल इस्टेटचे उदाहरण आहे.
एकल कुटुंब निवास
जे घर किंवा इमारत हि एका कुटुंबासाठी राहण्यासाठी डिझाईन केलेली असते अश्या प्रकारची मालमत्ता देखील रियल इस्टेटमध्ये समाविष्ट असते.
रियल इस्टेट विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- रियल इस्टेटमध्ये करीं करू इच्छिणाऱ्या लोकांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत म्हणजेच ते रियल इस्टेट एजंट, लीजिंग एजंट, रिअल इस्टेट एप्रेझर, होम इन्स्पेक्टर आणि मॉर्टगेज ब्रोकर आणि इतर प्रकारे संबधित व्यक्ती करिअर करू शकतो.
- रियल इस्टेटमध्ये रियल इस्टेटचे नुतनीकरण म्हणजे कच्ची जमीन विकत घेणे आणि ती विकसित करून त्याची विक्री करणे.
- वास्तविक मालमत्तेच्या हस्तांतरासाठी जे कागदपत्र वापरले जाते त्याला अनुदान डीड किंवा वॉरंटी डीड म्हणून ओळखले जाते.
- रियल इस्टेटमध्ये विकास करणे, दलाली, कर्ज देणे, विक्री व विपणन मध्ये काम करणे आणि मालमत्तेचे व्यवस्थापन करणे अश्या वेगवेगळ्या विभागासाठी काम करते.
- रियल इस्टेट हा रियल मालमत्तेचा एक प्रकार आहे.
- जर एखादा व्यक्ती रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असेल किंवा खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीने रियल इस्टेट एजंट किंवा या प्रकारच्या खरेदी विक्री मध्ये हुशार किंवा निपुण असणाऱ्या वकिलाची मदत घेतली तर त्याला मदत होऊ शकते
- रियल इस्टेट खरेदी केलेला कोणताही व्यक्ती ती मालमत्ता विकत असताना त्यांने खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकू शकतो म्हणजेच तो आपली मालमत्ता उच्च मूल्यावर विकू शकतो.
- जर एखादा व्यक्ती प्रथमच रियल रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक किंवा खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीने रियल इस्टेट एजंट ची मदत घेणे खूप गरजेचे आहे.
- रियल इस्टेट मध्ये एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसताना देखील गुंतवणूक करू शकतो परंतु त्यासाठी काही पध्दती आहेत.
रियल इस्टेटचे प्रकार – types
रियल इस्टेटचे काही प्रकार आहेत ते खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.
जमीन
जमीन या स्थावर मालमत्तेमध्ये मोकळी जागा, अविकसित मालमत्ता किंवा जमीन आणि शेत जमीन यामध्ये फळबागा, कुरण, इतर पिक शेत या सारख्या मालमत्तेचा समावेश होतो.
निवासी रियल इस्टेट
निवासी रियल इस्टेट म्हणजे जी मालमत्ता राहण्यासाठी किंवा निवासासाठी वापरली जाते ज्यामध्ये बहु कुटुंब संस्था, एकत्र कुटुंब घरे, सहकारी संस्था, टाऊनहाऊस या सारख्या मालमत्तेचा समावेश होतो.
विशेष उद्देश
विशेष उद्देशमध्ये जी लोकांच्याकडून जी मालमत्ता लोकांच्याकडून वापरली जाते अनेक प्रकारच्या सरकारी कामांच्यासाठी वापरलेल्या इमारती, ग्रंथालये, स्मशानभूमी, शाळा आणि इतर अनेक इमारती.
व्यवसायिक रियल इस्टेट
व्यावसायिक रियल इस्टेट मध्ये जी जमीन किंवा इमारत व्यवसाय करण्यासाठी वापरली जाते त्याला रियल इस्टेट असे म्हणतात आणि यामध्ये शैक्षणिक इमारती, मॉल्स व शॉपिंग सेंटर्स, वैद्यकीय इमारती, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, अनेक प्रकारची दुकाने आणि या सारख्या अनेक इमारती ह्या व्यवसाय करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्याला रियल इस्टेट म्हणून ओळखले जाते.
औद्योगिक रियल इस्टेट
ज्या इमारती किंवा जमीन हि औद्योग कारणांच्यासाठी वापरली जाते म्हणजेच या प्रकारची इमारत हि उत्पादन आणि वितरणासाठी वापरली जाते त्याला औद्योगिक रियल इस्टेट यामध्ये अनेक प्रकारची औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता, गोदामे आणि इमारती ह्या औद्योगिक रियल इस्टेटमध्ये सामाविष्ट आहेत.
आम्ही दिलेल्या real estate information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रिअल इस्टेट म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या real estate meaning in marathi या real estate agent meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about real estate in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये real estate ads in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट