लाल किल्ला माहिती Red Fort Information in Marathi

Red Fort Information in Marathi लाल किल्ल्याची माहिती इंडो इस्लामिक वास्तू शैलीतून स्थापत्यविशारद उस्ताद अहमद लाहौरी यांच्या विचारातून लहान संगमरवरी दगडातून साकारलेल्या मुघल कालीन ऐतीहासिक किल्ला म्हणजे ‘दिल्लीचा लाल किल्ला’. आपल्या देशाची शान आणि मान असणारा हा किल्ला जुन्या दिल्ली परिसरात वसलेला भव्यदिव्य किल्ला सर्व पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. जवळजवळ 367 वर्षे आयुष्य पूर्ण केलेला किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. हा किल्ला मुघल काळात शहाजहान बादशहाने उभारला. 13 मे 1648 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. या किल्ल्यात प्रवेश करताना दिल्ली गेट मधून जावे लागते.

दरवर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान याच गेटमधून येतात. समोर असणाऱ्या लाहोरी दरवाजासमोर झेंडा वंदन केले जाते आणि पंतप्रधान इथूनच देशवासीयांना संबोधित असतात.

red fort information in marathi
red fort information in marathi

लाल किल्ला माहिती – Red Fort Information in Marathi

लाल किल्लामाहिती
महत्वाचा इतिहास13 मे 1648 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले
उंची18–33 मी (59-1010 फूट)
ठिकाणनेताजी सुभाष मार्ग, लाल किला, चांदनी चौक, नवी दिल्ली, दिल्ली 110006
स्थापत्य शैलीइंडो-इस्लामिक, मोगल
आर्किटेक्टउस्ताद अहमद लाहौरी
क्षेत्रफळ94 एकर म्हणजेच तीन लाख 80 हजार चौरस मीटर
मस्जिदनगिना मस्जिद, मोती मस्जिद
दरवाजादिल्ली दरवाजा आणि लाहोरी दरवाजा

इसवी सन 1911 मध्ये ब्रिटनच्या राजाने इथेच दरबार भरवला होता. भारतीय राजकारणाचे सिंहासन म्हणजे दिल्ली. राजे बदलले, तारखा बदलल्या, कालगणना बदलल्या, राजघराणी बदलली, इतिहास कालीन घराणी बदलली, पण दिल्लीचे स्थान अटळ आहे. मुघल बादशहाने वसविलेले दिल्ली हे शहर आणि या शहराचा मुकुटमणी म्हणजे लाल किल्ला हा किल्ला मुघल काळात लाल वालुकाश्म वापरून बांधला गेला होता. आज मात्र मुघल सैनिकां ची जागा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकांनी घेतली आहे. 

दिल्ली दरवाजा आणि लाहोरी दरवाजा रचनेच्या दृष्टीने जवळ जवळ सारखे आहेत. किल्ल्याभोवती विस्तृत खंदक असल्याने किल्ल्यावर थेट हल्ला चढवणे कठीण होते. किल्ल्याचा परिसर मोठा असून आत विस्तृत बाजारपेठ आहे. या बाजाराचे छट्टाचौक असे नाव आहे. किल्ला नीट पाहण्यासाठी किमान दोन तास लागतात.

रचना – architectural features of red fort

प्रथम दिसणारे बांधकाम म्हणजे नगारखाना किंवा नोबत खाना. लाल किल्ला हा यमुना नदीच्या किनारी उभा आहे. या किल्ल्यावर केलेल्या आश्चर्यकारक कारागिरी साठी आणि खास प्रकारच्या वस्तू कलेसाठी हा किल्ला विशेष ओळखला जातो. हा किल्ला ताजमहाल पासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर उभा आहे. हा किल्ला अतिशय विशाल स्वरूपात आहे.  या किल्ल्याच्या अंतर्भागात परमजीत दिवाने आम जहांगीर महल, मोती मस्जिद आणि परमजीत सोबतच मुघलांना राहण्यासाठी सुंदर सुंदर इमारती आहेत. 

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 15 ऑगस्टला ह्याच किल्ल्यावरुन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्याची बातमी प्रसारित केली होती. भारताचा हा ऐतिहासिक लाल किल्ला आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. मुघल बादशहा शहाजहान यांच्या 1628 ते 1658 या काळात बांधलेला हा किल्ला तत्कालीन वास्तुमधील सर्वोत्कृष्ट असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले. कुराणात स्वर्गाची जसे वर्णन केले आहे ते त्या लाल किल्ल्याशी तंतोतंत जुळते असेही युनेस्कोने म्हटले आहे.

ऐतिहासिक राजवटी – red fort history in marathi

इसवीसन 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाली. मराठा व अहमदशाह अब्दाली यांच्यात ते घडले आणि पतीच्या युद्धात मराठ्यांच्या तुलनेने अब्दालीची सेना खूप मोठी होती. मराठ्यांच्या सेनेला दुसऱ्या कुठल्या प्रार्थना कडून मदत देखील मिळाली नव्हती. परिणामी या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. तेव्हा याच लाल किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. इसवीसन 1785 मधील पेशवाई घराण्याचे महादजी शिंदे यांनी या किल्ल्यावर आपले साम्राज्य विस्तारले होते.

त्यानंतर 1803 मध्ये इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. त्यावेळी इंग्रजांनी या किल्ल्यावर आपले साम्राज्य विस्तारले. इंग्रज लोक या किल्ल्याचा वापर आपली खाजगी काम करण्यासाठी करत असत. इसवी सन 1857 चा भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला पहिला लढा. त्यावेळी लाल किल्ल्याला रणांगणाची स्वरूप आणले होते. जवळ जवळ एक शतकापर्यंत इंग्रजांनी या किल्ल्यावर आपली शासन चालविले होते.
15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा लाल किल्ला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला. उत्तर प्रदेशमधील आग्रा या शहरातील यमुना नदीच्या किनारी स्थित असलेल्या या जागतिक वारसा लाभलेला किल्ल्याचा आकार अर्धवर्तुळाकृती आहे. हा विशाल काय किल्ला 94 एकर म्हणजेच तीन लाख 80 हजार चौरस मीटर असा विस्तीर्ण क्षेत्रफळात पसरलेला आहे.

किल्ल्याच्या चारही बाजूच्या भिंती 70 फूट उंचीच्या आहेत. या विस्तीर्ण किल्ल्याच्या आत मध्ये आज वर्तमानात 24 पेक्षा जास्त स्मारक अस्तित्वात आहेत. या किल्ल्याच्या आतील काही इमारती इंग्रज काळात नष्ट केल्या होत्या या किल्ल्याच्या अस्तित्वात असणाऱ्या वस्तू पैकी फक्त अकबरी गेट, दिल्ली गेट आणि बंगाली मोहन आज तागायत अस्तित्वात आहेत. या वस्तू मधून मुघल कालीन वास्तुकलेची कौशल्य व त्यांची नैपुण्य कला असलेल्या कारागिरीचे दर्शन होते या महाविद्यालयात किल्ल्याच्या आत चार प्रमुख द्वार आहेत त्यापैकी नदीच्या मुखाकडील उघडणाऱ्या प्रवेशद्वारास ‘खिद्दी ‘ म्हणतात.

दिल्लीच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजाला ‘दिल्ली दरवाजा’ किंवा ‘दिल्ली गेट’ असे म्हणतात. लाहोरच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजाला ‘लाहोरी दरवाजा ‘ किंवा ‘लाहोरी गेट ‘ म्हणतात. एका दरवाजाला दोन्ही बाजूने विशाल हत्तीची प्रतिकृती आहे, म्हणून त्या दरवाजाला हत्ती पोल म्हणून ओळखतात.

मुघल कालीन लाल किल्ल्या मधील विविध महल

मुघल शासक अकबर याने आपला मुलगा जहांगीर साठी हा ‘ जहांगीर महल’ बांधला होता. या किल्ल्याच्या परिसरात 85 चौ. मी. क्षेत्रफळात किल्ल्याची शोभा वाढवणारा ‘ अंगुरी बगीचा’ बांधला आहे. याच किल्ल्यामध्ये अष्टकोनी स्वरूपात बांधलेले ‘ मुसम्मन बुर्ज ‘ महल, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे छत नाही. अगदी उघड्या मंडपा सारखा याच महालात औरंगजेबाने वडील शहाजहान याला कैद केले होते. कैदेत असताना इथूनच शहाजहान मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेल्या ताजमहालाच दर्शन घेत असे.

याच किल्ल्यात ‘ काचेचा वापर करून एक महल बांधले होते, त्यालाच ‘ शिष’ महल म्हणतात, या महालाचा वापर मुघल शासक कपडे बदलण्यासाठी करत होता. मुघल शासक मोठ्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी अजून एक महल होता. त्याला ‘ दिवाण ए खास’ या नावाने ओळखला जाई. अतिशय मौल्यवान जहांगीरचे सिंहासन याच महालात होते. सर्वसामान्य जनतेसाठी ‘ दिवाण ए आम’ हा महाल बांधला होता. सामान्य जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी हा महाल होता. याच महालाच्या आत ‘ मयुर ‘ सिंहासनाची स्थापना केली होती.

याच किल्ल्याच्या आत केवळ महिलांसाठी ‘नगिना मस्जिद’ बांधली होती. मुघल शासक शहाजहान याच्यासाठी , त्याच्या अल्लाच्या प्रार्थनेसाठी बांधण्यात आलेली खास वास्तू म्हणजे ” मोती मस्जिद ” होय.

लाल किल्ला फोटो

about red fort
about red fort

लाल किल्ल्याबद्दल काही तथ्ये:

  • या किल्ल्याची निर्मिती विशेषतः सैन्याचे रक्षण करण्याकरिता केली होती.
  • या किल्ल्याचे बांधकाम ४००० कामगारांनी दिवसरात्र काम करत ८ वर्षात पूर्ण केले होते.
  • पूर्वी १०८० मध्ये निर्मित हा किल्ला बादलगढ नावाने ओळखला जातो, असे व ‘ बादलसिंग ‘ हे पहिले राजपूत शासक होते.
  • मुघल शासक अकबराने लाल दगडांचा वापर करून या किल्ल्याची पुनर्निर्मिती अठराव्या शतकात केली. तेंव्हापासून त्याला ‘ लाल किल्ला’ म्हणू लागले.
  • इतिहासकालीन ऐतिहासिक मुघल वास्तूचे दर्शन घडवणाऱ्या किल्ल्याला २००४ साली ‘ आगर खान पुरस्कार’ देण्यात आला आहे. आणि भारतीय डाक विभागाने एक तिकीटही काढले आहे. आपल्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांवर ही लाल किल्ला दिमाखात उभा आहे.
  • लाल वाळूच्या खडकाच्या तटबंदी आणि भिंतीमुळे ‘ लाल किल्ला ‘ हे नाव पडले. हा किल्ला सलीम गडच्या पूर्वेकडील बाजूस आहे. या किल्ल्याची एक जाड भिंत १.५ मैल लांबीची असून नदीच्या काठापासून ६० फूट उंचीवर आहे आणि शहरातून ११० फूट उंचावर आहे. लाल किल्ल्याच्या योजना , व्यवस्था आणि सौंदर्य हे मुघल सर्जनशीलतेचे शिरोबींदू आहेत. ब्रिटिश काळात हा किल्ला प्रामुख्याने तळ म्हणूनच वापरला जात असे.  हे दिल्ली शहराचे मुस्लिम नगर होते. याला प्राचीन किल्ला आणि लालकोट म्हटले जायचे. लालकोट १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती.
  • लाल किल्ला हे दिल्ली शहराचे सर्वात प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. हे दिल्लीतील सर्वात मोठे स्मारक आहे. एके काळी या इमारतीत गरामध्ये ३००० लोकं राहत परंतु १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्या नंतर अनेक रहिवासी महल नष्ट झाले.

लाल किल्ला हा भारतातील सर्वात महत्वपूर्ण किल्ला आहे. भारताचे मुघल सरदार बाबर, हुमायु, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब राहत होते, येथूनच हे पूर्ण भारतावर राज्य करत होते. राज्यातील सर्वाधिक खजाना, संपत्ती आणि एकसाल होती. येथेच विदेशी राजदूत यात्री आणि उच्च पदस्थ लोकांचे येणे जाणे होते.

असा हा लाल किल्ला देशाचा मान आणि अभिमान म्हणून देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात दिमाखात उभा आहे, याचा सर्वच भारतीयांना अभिमान वाटतो. जीवनात एकदा तरी ‘ या ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, लाल किल्ला red fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. red fort delhi information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about red fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही लाल किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या red fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “लाल किल्ला माहिती Red Fort Information in Marathi”

  1. hello, i am from kolhapur, i have seen laal killa information on your page. actually we are doing scence based on Laal Killa for ganpati decoration. and the information you mentioned on this page is very excellent for our purpose to awareness about laal killa. but i am not able to copy or save it, can someone please help me.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!