रूट कॅनल माहिती Root Canal Treatment Information in Marathi

root canal treatment information in marathi रूट कॅनल माहिती, सध्या आपण पहिले तर अनेक व्यक्तींना दातांच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि अश्या प्रकारच्या एका दातांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी रूट कॅनल हि एक प्रक्रिया आहे आणि आज आपण या लेखामध्ये रूट कॅनल हि प्रक्रिया काय आहे, हि केंव्हा केली जाते, हि कशी केली जाते आणि हि करण्यासाठी किती खर्च येतो या विषयी आपण माहिती घेणार आहोत. रूट कॅनल हि एक दातांच्या समस्येवरील एक प्रक्रिया आहे.

ज्यावेळी आपला दात खराब झाला असेल किंवा संक्रमित झाला असेल त्यावेळी आपला दात काढून टाकण्याऐवजी तो वाचवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात, अश्या प्रकारच्या प्रक्रियेला रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणून ओळखले जाते. रूट कॅनल या प्रक्रियेमध्ये दातांमध्ये छिद्र पाडणे आणि मऊ केंद्र काढून टाकणे ज्याला डेंटल पल्प असे म्हणतात. चला तर मग खाली आपण रूट कॅनल या उपचाराविषयी सविस्तर माहिती घेवूया.

root canal treatment information in marathi
root canal treatment information in marathi

रूट कॅनल माहिती – Root Canal Treatment Information in Marathi

रूट कॅनल हा उपचार केंव्हा केला जातो ?

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा दात हा खराब झाला असेल किंवा वाईट प्रकारे संक्रमित झाला असेल तर म्हणजेच किडणे, हिरड्यांचे रोग, दातांची झीज होणे, दाताला दुखापत होणे या सारख्या अनेक दातांच्या समस्येवर रूट कॅनल हा उपाय करू शकतो. ज्यावेळी दातांचा लगदा खराब होतो.

त्यावेळी दातांच्या आतमध्ये जीवाणू वाढू शकतात आणि यामुळे संसर्ग होऊ शकतो त्यामुळे आपण पूर्वीच दातांची काळजी घेतली पाहिजे नाहीतर दातांचे संक्रमण झाल्यास किंवा समस्या उद्भवल्यास आपल्याला रूट कॅनल हि ट्रीटमेंट घ्यावी लागते.

रूट कॅनल उपचार प्रक्रिया – process

रूट कॅनल हा एक उपचार आहे जो एका पाठीमागे एक प्रक्रिया करून केला आणि ती प्रक्रीया खाली आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

अॅनेस्थेटीक

ज्यावेळी तुम्ही दंत चिकित्सक कडे जाता त्यावेळी ते सर्वप्रथम प्रभावित दाताजवळ तुमच्या हिरड्यावर काही प्रमाणात सुन्न करणाऱ्या औषधांचा प्रयोग करतात आणि मग ते एकदा प्रभावित झाले कि तुमच्या हिरड्यांच्यामध्ये भूल दिली जाईल आणि यावेळी तुम्हाला तीक्ष्ण अशी जळजळ जाणवेल परंतु या प्रक्रियेमुळे तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये वेदना जाणवणार नाहीत.

लगदा काढून घेणे

तुम्हाला तुमच्या दाताचा लगदा हा खराब झाल्यामुळे तुम्हला रूट कॅनल हि प्रक्रिया करून घ्यावी लागते. ज्यावेळी तुमचे दात हे बधीर केलेले असतात त्यावेळी सामान्य दंत चिकित्सक दाताच्या वरच्या बाजूला एक लहान छिद्र पाडतात आणि एकदा संक्रमित किंवा खराब झालेला लगदा दिसला कि फाईल्स नावाच्या साधनाचा वापर करून ते काळजीपूर्वक काढून टाकले जाते आणि यामुळे आपल्या दातातील सर्व मार्ग हे स्वच्छ होण्यास मदत होते.

प्रतिजैविक

यानंतर लगदा काढून टाकल्यानंतर, संसर्ग निघून गेला आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी आणि पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी दंतचिकित्सक स्थानिक अँटीबयोटीक लेप केला जातो. दातांचे निर्जंतुकीकरण झाल्यानंतर दंतचिकित्सक सिलर पेस्ट आणि गुट्टा पर्चा नावाच्या राबरासारख्या गोष्टीने दात भरतो आणि ते सील करतो.

तात्पुरते भरण्याची पध्दत

पुढे दंतचिकित्सक तात्पुरती मऊ सामग्री वापरून दातांच्या शीर्षस्थानी असलेले छिद्र भरून घेते आणि रूट कॅनलची प्रक्रिया समाप्त करते.

रूट कॅनल करण्याची गरज कोणाला आहे ?

  • जर एखाद्या व्यक्तीच्या दातांच्यामध्ये खोल पोकळी असेल किंवा दात फुटला किंवा तुटला असेल तर अश्यावेळी दातांमध्ये बँक्टेरिया प्रवेश करू शकतात त्यामुळे अश्या व्यक्तीला रूट कॅनल ट्रीटमेंट घेण्याची गरज असू शकते.
  • ज्यावेळी संसर्गामुळे हाड कमकुवत बनते आणि ते तुटते आणि त्यावेळी दाताभोवातीचे अस्थिबंधन तुटतात फुगतात आणि त्यावेळी दात फुगतात अश्यावेळी देखील रूट कॅनल या प्रक्रियेची गरज असते.
  • लगद्याच्या दुखापतीमुळे दात उच्च आणि कमी तापमानामध्ये संवेदनशील बनतात आणि अश्यावेळी रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते.
  • दातांचा लगदा हा जखमी किंवा रोगाट झाल्यास रूट कॅनल या प्रक्रियेची दातांना गरज असते.
  • जर आपण दातांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली नाही आणि त्यामुळे आपल्या दातांमध्ये जंतू झाले आणि त्यामुळे दातांना कीड येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुमच्या दाताच्या लागद्याला हानी पोहचते त्यावेळी तुम्हाला रूट कॅनल हि प्रक्रिया करावी लागते.  

रूट कॅनल प्रक्रियेनंतर होणारे परिणाम चांगले कि वाईट ?

रूट कॅनल हि प्रक्रिया केल्यानंतर आपल्या संक्रमित दातांना थोडा आराम मिळतो आणि दातातील वेदना आणि अनेक समस्या दूर होता आणि जर तुम्ही रूट कॅनल नंतर दातांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली तर तुमच्या दातांवर या प्रक्रियेचा परिणाम हा चांगल्या प्रकारे राहू शकतो.

रूट कॅनलचा खर्च किती येतो ?

रूट कॅनल हि एक दातांच्या समस्येवरील प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर बदलत असतो आणि सहसा या प्रक्रियेचा खर्च हा तुलनेने महाग असतो.

दातांचे संक्रमण टाळण्याचे उपाय – remedies

जर तुम्ही दातांचे संक्रमण टाळण्यासाठी रोजच्या रोजच काही उपाय किंवा सवयी पाळल्या तर आपल्याला रूट कॅनल हि प्रक्रिया करावी लागणार नाही.

  • जर तुम्ही रोजच्या रोज दातांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली आणि जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दात घासले तर अश्यावेळी तुमचे दात चांगले राहण्यास मदत होते.
  • महिन्यातून एकदा नियमितपणे दातांची तपासणी करणे देखील तुमचे दात चांगले ठेवण्यास मदत करू शकते.
  • साखरयुक्त पेये आणि अति गोड पदार्थ टाळणे हे खूप गरजेचे आहे.
  • तुम्ही तुमच्या जेवनानंतर चांगल्या प्रकारे चूळ भरा त्यामुळे तुमच्या दातातील अडलेले कन बाहेर येतील आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संक्रमण होणार नाही.
  • दात घासण्यासाठी फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरणे आणि तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी देखील चांगल्या प्रतीचा टूथब्रश वापरणे देखील गरजेचे असते.

आम्ही दिलेल्या root canal treatment information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रूट कॅनल माहिती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या root canal treatment in marathi या root canal meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about root canal in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये painless single visit root canal treatment in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!