rti form in marathi pdf – rti application format in marathi माहिती अधिकार अर्ज नमुना, आज आपण माहिती अधिकार कायदा काय आहे आणि या कायद्याद्वारे माहिती मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला माहिती अधिकार प्राप्त करण्यासाठी कोणता अर्ज करावा लागतो आणि त्यामध्ये काय काय तपशील भरावा लागतो याबद्दल आज आपण पाहणार आहोत. माहिती अधिकार हे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी मदत करतो. माहिती अधिकार कायदा २००५ हा भारत सरकारने तयार केलेला कायदा आहे.
ज्यामध्ये सर्व सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देणे बंधनकारक आहे म्हणजेच हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर हा कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला म्हणजेच माहिती अधिकार कायदा हा भारत सरकारने २००५ मध्ये तयार करण्यात आला आणि जो १२ ऑक्टोबर २००५ पासून अंमलात आला आहे.
अशा प्रकारे माहिती अधिकार कायदा हा भारतामध्ये तयार करण्यात आला आहे. २००५ मध्ये अरुणा रॉय यांनी नॅशनल कम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन माध्यमातून या कायद्याला मंजुरी मिळण्यासाठी एक चळवळ केली आणि ह्या चळवळीला यश मिळाले आणि हा कायदा २००५ मध्ये मंजूर होऊन अमलात देखील आला.
माहिती अधिकार अर्ज नमुना – RTI Form in Marathi Pdf
माहिती अधिकार म्हणजे काय ?
माहिती अधिकार हे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी मदत करतो. माहिती अधिकार कायदा २००५ हा भारत सरकारने तयार केलेला कायदा आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देणे बंधनकारक आहे म्हणजेच हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहितीसाठी अर्ज कसा करावा
केवळ भारतीय नागरिक आरटीआय कायदा २००५ अंतर्गत विनंती करण्यास पात्र आहेत. अशा प्रकारे अर्जदाराला अर्जासोबत त्याचा/तिचा नागरिक दर्जा द्यावा लागतो. आरटीआय कायद्यांतर्गत मागितलेली माहिती स्पष्टपणे नमूद करून माहितीची विनंती लिखित स्वरूपात करावी लागेल. अर्जामध्ये संपर्क तपशील जसे कि टपाल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक किंवा ईमेल पत्ता कारण स्पष्टीकरण/सल्ल्यासाठी किंवा माहिती प्रदान करण्यासाठी परत संपर्क करणे आवश्यक असते.
rti form pdf marathi – rti application format in marathi
माहिती अधिकार अर्ज नमुना मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
आरटीआय कसा दाखल करावा ?
प्रत्येक भारतीयाला आरटीआय फाइलिंगबद्दल माहिती असायला हवी. आरटीआय फाइल करण्याची प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त आहे.
- इंग्रजी /हिंदी /राज्याची अधिकृत भाषा असलेल्या कागदावर अर्ज लिहा किंवा तो टाइप करा आणि हे तुमच्या आवडीनुसार करा म्हणजे तुम्हाला अर्ज लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता किंवा संगणकावर टाईप करू शकता. काही राज्यांनी आरटीआय अर्जांसाठी विहित स्वरूप दिले आहे त्यानुसार अर्ज करावा लागतो
- या अर्जामध्ये तुम्ही कोणत्याही माहितीसाठी त्या माहितीबद्दल विशिष्ट प्रश्न विचारा. ते प्रश्न स्पष्ट आणि पूर्ण असले पाहिजेत आणि गोंधळात टाकणारे नसावेत.
- तुमचे पूर्ण नाव, संपर्क तपशील आणि पत्ता लिहा, जिथे तुम्हाला तुमच्या आरटीआयची माहिती / प्रतिसाद पाठवायचा आहे.
- तुमच्या रेकॉर्डसाठी अर्जाची छायाप्रत घ्या. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल, तर तो नोंदणीकृत पोस्टाने पाठवण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुमच्याकडे तुमच्या विनंतीच्या वितरणाची पोचपावती असेल.
- तुम्ही PIO कडे वैयक्तिकरित्या अर्ज सबमिट करत असल्यास तुम्ही त्यांच्याकडून पावती घेण्याचे लक्षात ठेवा.
ऑनलाइन आरटीआय दाखल करता येतो का ?
सध्या, केंद्र आणि काही राज्य सरकारच्या विभागांमध्ये ऑनलाइन आरटीआय दाखल करण्याची सुविधा आहे. तथापि, अनेक स्वतंत्र वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाइन दाखल करू देतात. ते तुमच्याकडून नाममात्र रक्कम घेतात, ज्यासाठी ते तुमच्या अर्जाचा मसुदा तयार करतात आणि संबंधित विभागाकडे पाठवतात.
आरटीआय (RTI) कायद्याचे उदिष्ठ ?
आरटीआय (RTI) हा एक महत्वाचा कायदा आहे आणि यामुळे लोकांना आवश्यक ती माहिती प्राप्त करता येते. चला तर आता आपण आरटीआय (RTI) ची उदिष्ठ्ये काय आहेत ते पाहूयात.
- प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी मदत करतो
- आरटीआयच्या कायद्याविषयी संपूर्ण ज्ञान असणारा सामान्य माणूस कोणत्याही सरकारी संस्थेकडे माहिती देण्याची मागणी करू शकतो. संस्थेने माहिती देणे बंधनकारक आहे आणि ती देखील ३० दिवसांच्या आत दिली पाहिजे आणि तसे न केल्यास संबंधित अधिकाऱ्याला आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.
आरटीआय अर्जातील तपशील – fields in application
आरटीआय अर्जामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तपशील असते ते आपण खाली पाहूयात. आरटीआय अर्जाची रचना हि खूप सुटसुटीत असते आणि आरटीआयसाठी अर्ज करणे देखील खूप सोपे असते.
- ज्या संस्थेकडून किंवा कंपनीकडून आपल्याला माहिती हवी आहे अश्या संस्थेचे किंवा कंपनीचे नाव व पत्ता लिहावा लागतो.
- तसेच जो व्यक्ती माहिती अधिकारासाठी अर्ज करतात त्यांचे नाव पत्ता आणि पिन कोड नंबर.
- आपण भारतीय भारतीय नागरिक असल्याचा पुरावा.
- आणि तुम्ही मागत असलेली माहिती म्हणजेच तुमचे प्रश्न.
- मग खाली ठिकाण आणि तारीख आणि मग अराजादाराची सही.
माहिती अधिकार कायदा (RTI) अंतर्गत उत्तर मिळण्यासाठी किती दिवस लागतात ?
आपण आता खाली माहिती अधिकार कायदा (RTI) अंतर्गत उत्तर मिळण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी किती वेळ लागतात.
कायद्यानुसार आरटीआयची माहिती ३० दिवसांत द्यावी पण मात्र, काही वेळा सरकारी नोंदी चुकीच्या किंवा गहाळ होतात किंवा तुम्ही ज्या एजन्सीला लिहीले आहे त्यांनी तुम्हाला हवी असलेली माहिती पुरवण्यासाठी दुसऱ्या विभागाशी समन्वय साधण्याची गरज असते. अशा परिस्थितीत, माहिती येण्यासाठी ३० दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
अशा परिस्थितीत, संबंधित पीआयओने तुम्हाला संभाव्य विलंब आणि कारणाबद्दल लेखी सूचना पाठवणे आवश्यक आहे. जर तो / ती तसे करण्यात अयशस्वी झाला आणि तुम्हाला ३० दिवसांच्या आत माहिती प्राप्त झाली नाही, तर प्रकरण अपीलीय अधिकार्यांकडे नेल्यास PIO वर दंड आकारला जाऊ शकतो.
आम्ही दिलेल्या rti form in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माहिती अधिकार अर्ज नमुना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rti application format in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि rti application form in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rti application form maharashtra in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट