गोवर रुबेला माहिती Rubella Disease Information in Marathi

rubella disease information in marathi गोवर रुबेला माहिती, सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग अनेकांना होत असतात आणि त्यावर उपचार करून ते बरे देखील करता येतात आणि तसाच एक प्रकारचा रोग म्हणजे रुबेला रोग आणि आज आपण या लेखामध्ये रुबेला रोगाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रुबेला हा रोग लहान मुलांना किंवा प्रौढ लोकांना होतो आणि हा रोग एक प्रकारचा विषाणूजन्य आणि संसर्गजण्य रोग आहे. जर एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या प्रौढ व्यक्तीला हा रोग झाला तर त्यावेळी त्या संबधित व्यक्तीला सौम्य ताप येतो आणि छोटे छोटे पुरळ देखील उटतात.

रुबेला या रोगाचा संसर्ग हा ज्यावेळी संक्रमित व्यक्ती किंवा ज्याला या रोगाची लागण झालेली आहे असा व्यक्ती ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो, त्यावेळी या रोगाचे जंतू बाहेर पडतात आणि त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण होण्याची शक्यता असते. चला तर खाली आपण रुबेला रोगाविषयी किंवा संसार्गाविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहूया.  

rubella disease information in marathi
rubella disease information in marathi

गोवर रुबेला माहिती – Rubella Disease Information in Marathi

रुबेला रोग म्हणजे काय – what is rubella disease in marathi

रुबेला हा एक संसर्गजण्य रोग आहे जो आरयुव्ही (RUV) या विषाणूंच्यामुळे होतो आणि यामध्ये प्रथम पुरळ उठण्यास सुरुवात होते आणि हि पुरळ सर्वप्रथम तुमच्या चेहऱ्यापासून उठण्यास मदत होते. रुबेला या रोगाला जर्मन गोवर किंवा ती दिवसीय गोवर या नावाने देखील ओळखले जाते.

रुबेला संसर्गाची लक्षणे – govar symptoms in marathi

ज्यावेळी कोणत्याही रोगाची लागण झाल्यानंतर प्रथम काही किरकोळ लक्षणे दिसून येतात आणि पुढे गंभीर लक्षणे दिसू लागतात अश्याच प्रकारे रुबेला रोगामध्ये देखील आहे, परंतु हा रोग अतिभयानक नाही, कारण हा औषध उपचाराने आणि लसीकरणाने बरे करता येतो आणि पुरळ उटणे हे संसर्गाचे पहिले लक्षण असते आणि हा रोग किंवा संसर्ग लहान मुलांच्यामध्ये किंवा प्रौढ व्यक्तींच्यामध्ये होतो.

  • रुबेला संसर्गे झालेल्या व्यक्तीला प्रथम शरीरावर छोटे छोटे पुरळ उटतात.
  • मग नंतर त्या व्यक्तीला सौम्य ताप येतो.
  • डोळ्यांचा रंग गुलाबी होतो आणि साधारण डोळे सुजतात.
  • त्याचबरोबर सर्दी आणि खोकला होतो आणि नाक वाहते.
  • त्याचबरोबर कानाच्या मागे आणि मानेवर ग्रंथी सुजतात.
  • तसेच स्त्रीयांच्यामध्ये या संसर्गाच्या वेळी सांधेदुखीचा त्रास दिसून येतो तसेच त्या संबधित व्यक्तीला अस्वस्थता वाटू शकते.
  • रुबेलामुळे डोकेदुखीचा त्रास देखील होण्यास मदत होते.

रुबेला रोगाचा संसर्ग कसा होतो ?

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला रुबेला रोगाचे संक्रमण होते त्यावेळी त्या व्यक्तीला सर्दी आणि खोकला देखील होतो आणि त्यावेळी ती व्यक्ती काही व्यक्तींच्यामध्ये असल्यानंतर शिंकते किंवा खोकते त्यावेळी रुबेलाचे सूक्ष्मजंतू बाहेर पडतात.

आणि जर दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ असल्यास त्या व्यक्तीला देखील रोगाचा संसर्ग होऊ शकतो. काही वेळा या रोगाचा संसर्ग झालेली लक्षणे दिसून येतात परंतु काही वेळा या रोगाचे संक्रमण झाले आहे याची लक्षणे दिसून येत नाहीत.

गर्भवती स्त्रियांना रुबेला रोग झाल्यास काय होते ?

जर एखादी स्त्री गर्भवती असेल आणि त्या स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाला तर अश्या स्त्रीला गुढघे, मनगट आणि बोटे यामध्ये सांधेदुखी सुरु होते आणि या रोगाची लागण गर्भवती स्त्रीला झाली तर त्या स्त्रीच्या अर्भकाला खूप धोका असू शकतो आणि त्या अर्भकाला जन्मजात सिंड्रोम होण्याची शक्यता निर्माण होते.

आणि अश्या परिस्थितीमध्ये जन्मलेल्या बाळाला अनेक समस्या येतात जसे कि मोतीबिंदूचा त्रास, त्या बाळाच्या वाढीसाठी विलंब होणे, बहिरेपणा, हृदयाच्या वाढीची किंवा विकासाची समस्या आणि इतर अवयवांच्या वाढीची समस्या, मानसिक विकार अश्या अनेक समस्यांना त्या बाळाला सामोरे जावे लागते.

समस्या

  • बहिरेपणा.
  • मानसिक विकास घुंटने.
  • मोतीबिंदूचा त्रास.
  • हृदय वाढ किंवा विकासाची समस्या.

रुबेला रोगावर उपचार – remedy

जरी हा रोग बरा करण्यासाठी कोणताही विशिष्ठ प्रकारचा उपचार जरी नसला तरी या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव कमी करण्यासाठी १२ महिन्यानंतर किंवा लहान मुलांना एमएमआर (MMR) या लसीचे दोन डोस दिले जातात.

रुबेला या रोगाविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • रुबेला हा रोग जगभरामध्ये दरवर्षी २६ हजार लोकांच्यामध्ये आढळतो आणि हा रोग आशिया आणि आफ्रीकामध्ये अगदी सामान्य रोग आहे.
  • लाल रंगाचे पुरळ संपूर्ण अंगावर उटणे हे रुबेला य रोगाचे किंवा संसर्गाचे सामान्य लक्षण आहे परंतु रुबेला संसर्ग झालेल्या ५० टक्के लोकांच्यामध्ये हि लक्षणे दिसत नाहीत परंतु त्यांना या रोगाची लक्षणे दिसून येतात.
  • रुबेला ह्या रोगाची लक्षणे एक आठवडाभर दिसतात.
  • रुबेला हा रोग एक संसर्गजण्य रोग आहे म्हणजेच हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि हा रोग लहान मुलांच्यामध्ये जास्त प्रमाणात होतो आणि हा रोग लहानांच्याकडून प्रौढांच्याकडे किंवा प्रौढांच्या कडून प्रौढांच्याकडे जातो.
  • जर एखाद्या गर्भवती स्त्रीला रुबेला हा रोग झाल्यास अर्भकाला जन्मजात रुबेला सिंड्रोम होण्याचा उच्च धोका असू शकतो आणि बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्या गर्भवतीने रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण करून घेतले तर त्याचा प्रभाव टाळता येतो.
  • रुबेला हा रोग ११ ते १९ वर्षाच्या वयोगटातील लहान मुलांना होण्याचा धोका असू शकतो.

रुबेला रोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाचण्या

कोणत्याही रोगाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात तसेच रुबेला रोगाचे निदान करण्यासाठी देखील काही चाचण्या वापरल्या जातात.

  • रक्त चाचण्या : रक्त चाचणीमध्ये तुमचा प्रदाता छोट्या सुईने तुमच्या हातातातून तुमच्या रक्ताचा नमुना घेतो आणि रुबेलासाठी अँटीबॉडिज शोधतात आणि ते सर्शावते कि तुम्हाला रोगाची लागण झाली आहे कि नाही.
  • मूत्र चाचण्या : तुम्हाला रुबेला रोग आहे काय नाही किंवा त्याची लक्षणे आहेत कि नाही याचे निदान करण्यासाठी तुमच्या लघवीची सँपल काढून घेतली जाते आणि त्याचे परीक्षण करून त्यावरून रोगाचे निदान केले जाते.
  • नाक किंवा घसा स्वॅब : प्रदाता तुमच्या नाकातून किंवा घश्यातून नमुना घेऊन त्याचे परीक्षण करून त्यातून निदान करू शकतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या rubella disease information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोवर रुबेला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या govar rubella disease information in marathi या gover disease in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rubella disease in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rubella disease information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!