रुईचे झाड Rui Plant Information in Marathi

rui plant information in marathi रुईचे झाड, रुई हि भारतामध्ये अनेक ठिकाणी सापडणारी सामान्य वनस्पती आहेत आणि आज आपण या लेखामध्ये रुई या वनस्पती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. रुई हि एक वनस्पती आहे ज्याचे वैज्ञानिक नाव कॅलोट्रॉपीस गिगॅन्टिया असे आहे आणि हि वनस्पती भारतामध्ये तर आढळतेच परंतु हि वनस्पती श्रीलंका, पाकिस्तान आणि काही इतर देशांच्यामध्ये देखील आढळते. हि वनस्पती झुडूप प्रकारातील एक वनस्पती असून हि वर्षभर वाढते आणि ह्या वनस्पतीची उंची २.५ मीटर इतकी वाढू शकते.

आणि या वनस्पतीला फुलांचा गुच्छ लागतो जे फिकट जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असते आणि त्याला पाच पाकळ्या आणि मध्यभागी एक लहान मुकुट असतो ज्याला पुंकेसर म्हणतात. चला तर खाली आपण रुई ह्या वनस्पती विषयी आणखीन सविस्तर माहिती घेवूया.

rui plant information in marathi
rui plant information in marathi

रुईचे झाड – Rui Plant Information in Marathi

वनस्पतीचे नावरुई
प्रकारझुडूप वनस्पती
उंची२ ते २.५ मीटर
फुलेपांढऱ्या किंवा फिकट जांभळ्या रंगाची असतात
वैज्ञानिक नावकॅलोट्रॉपीस  गिगॅन्टिया

रुई वनस्पती विषयी महत्वाची माहिती – important information

रुई या वनस्पतीला रुचकी या नावाने देखील ओळखले जाते आणि हि भारतामध्ये आढळणारी सामान्य वनस्पती आहे जी २ ते २.५ मीटर उंच वाढते आणि हे सरळ लहान झाड किंवा झुडुपाच्या स्वरूपामध्ये वाढते.

या घट्ट दांडे आणि पाने असतात आणि हि पाने साधारण राखाडी ते हिरव्या रंगामध्ये असतात आणि हे १० ते २० सेंटी मीटर लांब आणि ४ ते १० सेंटी मीटर रुंद असतात तसेच या वनस्पतीच्या देठांच्यामध्ये दुधाचा रस ज्याला चिक म्हणतात हा असतो आणि या चिकाचा अनेक कारणासाठी वापर केला जातो.

वनस्पतीला फुलांचा गुच्छ लागतो जे फिकट जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असते आणि त्याला पाच पाकळ्या आणि मध्यभागी एक लहान मुकुट असतो आणि या वनस्पतीची फळे १० ते १२ सेंटी मीटर लांब असतात आणि ती राखाडी ते हिरव्या रंगाची असतात आणि हे फळ परिपक्व झाल्यानंतर बिया बाहेर पडतात तसेच त्यामध्ये बियांच्यासोबत पांढरे रेशमी केस असतात.

रुई वनस्पतीची वेगवेगळी नावे – names

या वनस्पतीला वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते म्हणजेच या वनस्पतीला मराठीमध्ये रुई किंवा रुचाकी म्हणतात तसेच संस्कृतमध्ये टूलाफला, अर्का, अलारका आणि विकीराणा या नावाने ओळखले जाते तसेच बंगाली भाषेमध्ये याला आकानड आणि तेलगु भाषेमध्ये याला मंदारम किंवा जीलेडू या नावाने ओळखले जाते.

रुई वनस्पती कोठे आढळते आणि कोणत्या ठिकाणी येते – habitat

रुई हि वनस्पती उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय तसेच अर्ध शुष्क किंवा शुष्क अंतर्देशीय भागामध्ये आणि कोरड्या भागामध्ये आढळतात. या वनस्पती जंगलांच्यामध्ये, रानामध्ये, गवताळ प्रदेशामध्ये, रस्त्याच्या कडेला आणि विस्कळीत ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात.

रुई या वनस्पतीचे वेगवेगळे फायदे आणि वापर – rui plant uses in marathi

रुई हि वनस्पती मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वाढत असली तरी या वनस्पतीचे फायदे अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी होते आणि खाली आपण रुईचे वेगवेगळे फायदे पाहणार आहोत.

rui plant benefits in marathi

  • रुई या वनस्पतीच्या देठामधील लगद्याचा वापर हा कागद बनवण्यासाठी केला जातो.
  • रुईच्या वनस्पतीमध्ये चिक असतो आणि जर ह्या वनस्पतीचा चिक उकळला तर चिकट पदार्थ तयार होतो आणि हा चिकट पदार्थ रबर बनवण्यासाठी उपयोगी होऊ शकतो.
  • या वनस्पतीचा वापर हा ग्लू बनवण्यासाठी देखील केला जातो.
  • रुई वनस्पतीच्या रोपाच्या देठापासून दोरी किंवा धागा बनवला जातो आणि हे बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते.
  • फटाक्यांमधील दारुगोळा तयार करण्यासाठी देखील रुई या वनस्पतीचा वापर होतो.
  • तसेच या वनस्पतीचा वापर हा काही औषधी गुणधर्मांच्यासाठी देखील केला जातो जसे कि वेदनाशामक आणि कानदुखीवर देखील याचा वापर होतो.
  • ताप, उलट्या आणि अतिसार या सामान्य आजारांच्यावर उपचार करण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो.

रुई या वनस्पती विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • रुई हि वनस्पती पूर्वी बागेतील शोभेची वनस्पती म्हणून ओळखली जात होती परंतु नंतर ती विषारी असल्याचे समजल्याने ती एक प्रकारचे तन म्हणून ओळखली जाऊ लागली.
  • या वनस्पतीची प्रजाती मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये पसरलेली आहे आणि मध्य, उत्तर आणि दक्षिन अमेरिका या ठिकाणी देखील या वनस्पतीचे नैसार्गीकरण झाले आहे.
  • ज्या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले लागतात त्या झाडाला पांढरा रुई मंदार म्हणून ओळखले जाते आणि हे अनेकदा शेतजमिनीमध्ये तणासारखे वाढू शकते
  • रुई या वनस्पतीचे फुल हे आकाराने लहान आणि वाटीसारखे असते आणि हे पुरणे पांढऱ्या, फिकट जांभळ्या किंवा पांढऱ्या आणि जांभळ्या अश्या दोन मिक्स रंगामध्ये असते.
  • पूर्वी या झाडाविषयी असे मानले जायचे कि जर रुईचे झाड हे आपल्या घरासमोर असले कि ती शुभ असत त्यामुळे पूर्वी रुईची झाडे लावली जात होती परंतु आज त्याला तन म्हणून ओळखतात.
  • रुईची झाडे १० ते १२ वर्ष जगू शकतात.
  • रुई या झाडाचे मूळ हे भारत, कंबोडिया, चीन, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या देशातील आहेत.
  • भारतामध्ये रुईच्या फुलाला धार्मिक महत्व आहे. कारण हा फुलाचा वापर हा हरतालिकेच्या पूजेमध्ये केला जातो.

आम्ही दिलेल्या rui plant information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रुईचे झाड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rui plant benefits in marathi या Rui plant information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rui plant in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!