विक्री कर माहिती Sales Tax Information in Marathi

Sales tax information in marathi विक्री कर माहिती, सरकार लोकांच्या कडून वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारात असते आणि त्यामधील एक कर म्हणजे विक्री कर ज्याला इंग्रजीमध्ये सेल्स टॅक्स (sales tax) म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये विक्री कारण म्हणजेच सेल्स टॅक्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विक्री कर हा कोणत्याही विक्रीवर आकाराला जातो म्हणजेच हा किरकोळ विक्री, वस्तूंच्या भाड्यावर आणि भाडेपट्टी आणि अनेक करपात्र असणाऱ्या सेवांच्यावर आकारला जातो.

याचा रथ सोप्या भाषेमध्ये सांगायचा असल्यास भारतामध्ये वस्तू आणि सेवा यांच्या खरेदी आणि विक्रीवर हा कर लादलेला असतो आणि हा कर सामान्यता आपल्या देशामध्ये सरकारच्या मार्फत विक्रेत्यांच्यावर लादला जातो किंवा त्यांच्याकडून आकारला जातो.

आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विक्री कर आकारला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये कर आकारण्याची पध्दत हि वेगळी असू शकते. चला तर खाली आपण विक्री कर विषयी सविस्तर माहिती घेवूया.

sales tax information in marathi
sales tax information in marathi

विक्री कर माहिती – Sales Tax Information in Marathi

विक्री कर म्हणजे काय ?

विक्री कर हा वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर आकारला जातो आणि हा सरकारद्वारे वस्तू आणि सेवांच्यावर आकारला जातो आणि हा पारंपारिकपणे विक्रीवर आकारला जाणारा पारंपारिक विक्री कर आहे.

केंद्रीय विक्री कर कायद्याची  उदिष्ट्ये – objectives

कोणतीही संकल्पना सुरु करताना डोळ्यासमोर काही हेतू आणि उदिष्ट ठेऊन सुरु केले जातात आणि तसेच विक्री कर देखील काही उदिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन सुरु केला आहे आणि त्याची उदिष्ट्ये काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • व्यापार आणि वाणिज्य या साठी काही वस्तू आणि सेवा यांच्या विशेष पध्दतीने वर्गीकरण करण्यासाठी काम करते.
 • वेगवेगळ्या राज्यातील व्यापारामार्फत वस्तूंच्या विक्री मधून जमा होणारा कर आकारणी, संकलन आणि वितरणासाठी संकलन करणे.
 • वस्तूंची विक्री आणि खरेदी केंव्हा होते हे निर्धारित करण्यासाठी तत्वे ठरवणे.
 • वेगवेगळ्या राज्यातील व्यापार विवादाब्चे निराकरण करणे.

विक्री कराचे प्रकार – types

भारतातील विक्री कर हा वेगवेगळ्या प्रकारे आकारला जातो आणि ते विक्री कराचे प्रकार कोणकोणते आहेत, ते खाली आपण पाहणार आहोत.

भारतातील विक्री कर

विक्री कर हा वस्तूंच्या किंवा सेवांच्या कोणत्याही खरेदी विक्रीवर आकाराला जातो आणि हा भारतीय विक्री कराची धोरणे हि केंद्रीय विक्री कर कायदा १९५६ नुसार लागू केली आहेत आणि या प्रकारच्या करामध्ये केंद्र सरकारचा देखील विक्री कर समविष्ट असतो.

घाऊक विक्री कर

जी व्यक्ती वस्तू आणि सेवांचे वितरण हे घाऊक पध्दतीने करते अश्या व्यक्तींना घाऊक विक्री कर लागू होतो आणि त्यांनाच या प्रकारचा कर सरकारला भरावा लागतो.

किरकोळ विक्री कर

ज्यावेळी एखादा ग्राहक हा कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करतो आणि त्यावेळी त्या विक्रीवर देखील कर आकारला जातो आणि या कर आकारणीला किरकोळ विक्री कर म्हणून ओळखले जाते.

उत्पादकांचा विक्री कर

हा कर वस्तूंच्या आणि सेवांच्या उत्पादन आणि निर्मितीवर आकारला जातो.

केंद्रीय विक्री कर कायदा १९५६

केंद्रीय विक्री कर कायदा हा भारतातील महत्वाचा कायदा आहे कारण हा कायदा देशातील प्रत्येक राज्यातील कर आकारणीच्या कायद्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो आणि हा कायदा संपूर्ण देशावर विस्तारित आहे आणि या कायद्यामध्ये विक्री कर संबधित अनेक नियम आणि अटी दिल्या आहेत आणि हा कायदा केंद्र सरकारला विविध प्रकारच्या उत्पादनावर विक्री कर वसूल करण्यास परवानगी देतो.

विक्री कराविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • स्थानिक संस्था आणि नगरपालिका ह्या स्वताचा स्वतंत्र्य कर आकारू शकतात जो पुढे राज्य विक्री करामध्ये आकारला जातो.
 • विक्री कर हा देशभरामध्ये सारखा नसतो हा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा असतो आणि तो राज्य स्तरावर नियंत्रित केला जातो.
 • विक्री कराचे दर हे सतत बदलत असतात.
 • तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्यामध्ये फक्त तुम्ही विक्री कर गोळा करू शकता आणि विक्री कर गोळा करण्यासाठी तुम्ही विक्री कर नोंदणी करणे आवश्यक असते.
 • विक्री कर हा एक कर आकारणीचा एक प्रतिगामी कर आहे जो व्यक्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा काय खरेदी करतात यावर आधारित असतो.

विक्रीकर मधील सवलती – exemptions

प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करामध्ये सवलती दिलेल्या असतात म्हणजेच काही गोष्टींच्यासाठी करमुक्ती असते ते खाली आपण पाहूया.

 • जी उत्पादने शाळांना विकली जातात किंवा धर्मादाय संस्थांना विकली जातात अश्या प्रकारच्या अनेक उत्पादनांना विक्री करातून सवलत मिळू शकते.
 • ज्या वस्तू स्थानिक आणि अत्यावश्यक आहेत त्या वस्तूंच्या यादीला विक्री कर मुक्तीची सवलत मिळू शकते.
 • वास्तविक राज्य पुनर्विक्री प्रमाणपत्र असलेला कोणताही विक्रेता विक्री करापासून करमुक्तीची सवलत मिळवू शकतो.
 • आश्रमांना विकल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंच्यावर कर आकारला जात नाही तर त्यांना विक्री करातून सवलत मिळते.

विक्री कारच्या नियमांचे उल्लंघन – violetion

 • जर एखाद्याने अर्जामध्ये खोटी आणि दिशाभूल करणार माहिती घातली तर ते विक्रीकर नियमांचे उल्लंघन असेल.
 • सीएसटी (CST) कायद्यानुसार नोंदणी मिळवण्यास अयशस्वी ठरणे आणि सीएसटी या कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदींचे पालन न करणे.
 • काही जन नोंदणी नसलेल्या डीलर्स ग्राहकांच्याकडून विक्रीकर वसूल करतात आणि हे उल्लंघन आहे.
 • त्याचबरोबर सवलतींच्या दारात खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूचा गैरवापर करणे.

आम्ही दिलेल्या sales tax information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विक्री कर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sales tax inspector in marathi या sales tax inspector syllabus in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sales tax inspector in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!